×

‘जेएनयू’च्या उमर खालिदवर गोळीबार करणार्‍याला शिवसेनेची उमेदवारी

Published On :    9 Oct 2019  By : MN Staff
शेयर करा:


हरियाणातील बहादुरगड मतदारसंघातून लढणार





हरियाणा : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदच्या हत्येचा प्रयत्न करणार्‍याचा आरोप असलेल्या नवीन दलाल याला शिवसेनेने निवडणुकीचे तिकीट दिले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्येही विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेने खालिदवर गोळीबार करण्याचा आरोप असणार्‍या नवीनला तिकीट दिले आहे. येथील बहादुरगड मतदारसंघातून नवीन शिवसेनेच्या धुनष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.


‘मी सहा महिन्यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवाद आणि गौ संरक्षण हे माझे धोरण आहे,’ असं स्वत:ला गौरक्षक म्हणावणारा नवीन सांगतो. ‘राष्ट्रवाद, गाईंचे संरक्षण आणि आपल्या क्रांतीकारांना ओळख मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे,’ भाजपा आणि कॉंग्रेस सरकारला शेतकर्‍यांचे प्रश्न, शहीदांचे प्रश्न, गाई आणि गोरगरिबांबद्दल कोणताही आस्था नसून त्यांना केवळ राजकारण करायचे आहे अशी टीका नवीनने केली आहे. 


नवीनला तिकीट देण्यात आल्याच्या वृत्तावर हरिणायातील दक्षिण विभागाचे शिवसेनेचे प्रमुख विक्रम यादव यांनी शिक्कामोर्तब केले आहे. ‘नवीन गौ संरक्षण, देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍यांविरोधात आवाज उठवण्याचे काम करत आहे, म्हणून आम्ही त्याची निवड केली आहे,’ असं यादव सांगतात.


१३ ऑगस्ट २०१८ रोजी दर्वेश सापूर आणि नवीन दलाल या दोघांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे उमर खालिदवर गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर हे दोघे घटनास्थळावरुन पळून गेला होता. संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये खालिदवर या दोघांनी गावठी पिस्तुलने उमरवर दोन गोळ्या झाडल्या. मात्र खालिदने तेथून पळ काढल्याने तो बचावला. खालिदवर गोळीबार करुन पळणारा नवीन हा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला.


पोलिसांनी अटक करण्याआधीच या दोघांनी सोशल मिडियावर आपला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. इंकलाब जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा त्यांनी व्हिडिओत दिल्या होत्या. ‘आम्ही सुप्रीम कोर्ट आणि संविधानाचा आदर करतो. पण जेएनयूतील या टोळीचा खात्मा करण्याची गरज आहे. 


आमच्या पूर्वजांनी सांगितले होते की पिसाळलेल्या कुत्र्यांना ठार मारले पाहिजे. उमर खालिदवरील हल्ला ही देशवासियांना दिलेली भेट होती. आम्ही १७ ऑगस्ट रोजी पोलिसांना शरण जाऊ,’ असं या दोघांनी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. दिल्ली पोलिसांच्या ३० जणांच्या पथकाने लुधियानामधून या दोघांना १९ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ब्राम्हणवादी भाजपा सरकारने भारताला लोटले भूकेच्या खाईत
भाजपाच्या संकल्पपत्रात नुसतीच रंगरंगोटी
पेशवा फडणवीसांच्या मंत्र्यांना अच्छे दिन, पाच वर्षात १४
दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद, आरबीआयची कबुली
व्यापारयुध्दामुळे जगापुढे भीषण संकट, आंतरराष्ट्रीय नाण
गायींची गणना झाली ओबीसींची कधी होणार?
धक्कादायक: संयुक्त राष्ट्रांवरच आलीय दिवाळखोरीत जाण्या
देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रुळावर येणार नाही
संविधान न मानणारे सावरकर भारतरत्न कसे होऊ शकतात?
सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यूनंतर रुग्णाच्या डोळ्याला ल
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांवर शाईफेक
बाबरी मशीदच्या जागेवरील सुन्नी वक्फ बोर्डाने दावा सोडल
४ हजार ५०० कुटुंबीयांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा
शिवसेनेच्या स्वस्त वीज योजनेसाठी तिजोरीवर ४ हजार ८०० को
उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी शाळेच्या संरक्षक भिंतीची तोडफ
योगी सरकारच्या निर्णयामुळे २५ हजार होमगार्डवर बेरोजगार
‘भारतीय अर्थव्यवस्थेची खराब कामगिरी’
भाजपच्या संकल्पपत्रात एक कोटी नोकर्‍यांचे आमिष
आधी ‘जेट’मधली नोकरी गेली, मग पीएमसीमध्ये ९० लाख अडकले
देशाचे विभाजन केलेल्या आरएसएसवर बंदी घाला
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper