×

रिझर्व्ह बँकेच्या प्रश्‍नाने खातेदार अचंबित !सरकारकडे दाखवले बोट, पीएमसी बँक घोटाळा

Published On :    31 Oct 2019  By : MN Staff
शेयर करा:


तब्बल १६ लाख खातेदारांचे पैसे अडकून पडलेल्या पीएमसी बँकेला दिवाळखोरीतून बाहेर काढण्याचा प्रश्न ज्या रिझर्व्ह बँकेने सोडवायला हवा तीच रिझर्व्ह बँक खातेदारांनाच प्रश्न विचारू लागली आहे.





मुंबई : तब्बल १६ लाख खातेदारांचे पैसे अडकून पडलेल्या पीएमसी बँकेला दिवाळखोरीतून बाहेर काढण्याचा प्रश्न ज्या रिझर्व्ह बँकेने सोडवायला हवा तीच रिझर्व्ह बँक खातेदारांनाच प्रश्न विचारू लागली आहे. पीएमसी बँक विलीन करून घेण्यास कुठली बँक तयार असेल असे तुम्हाला वाटते असा प्रश्नच रिझर्व्ह बँकेेच्या अधिकार्यांनी  मंगळवारी खातेदारांच्या शिष्टमंडळाला विचारला.


खातेदारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या ७ जणांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी एकीकडे रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांची भेट घेतली व त्याचवेळी बीकेसीतील रिझर्व्ह बँक कार्यालयाबाहेर खातेदारांची निदर्शनेही सुरू होती. शिष्टमंडळाने अधिकार्यांसमोर महत्वाचे मुद्दे मांडले व ठोस उत्तरे मागितली. त्यावर रिझर्व्ह बँकेकडून काही पर्याय समोर येतील अशी आम्हाला आशा होती मात्र पीएमसी बँक विलीन करून घेईल अशी कुठली बँक तुमच्या माहितीत आहे का असा उलट प्रश्न अधिकार्‍यांनी विचारल्याचे शिष्टमंडळातील सदस्य देवेन ओबेरॉय यांनी सांगितले.


पीएमसी बँकेचे संपूर्ण लेखापरीक्षण होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कोणतेही आश्वासन देऊ शकत नाही, असेही या खातेदारांच्या शिष्टमंडळाला ऐकवले गेले. पीएमसी बँक विलीन करण्यासाठी रिझर्व्ह बँक जाहिरात देण्याची सूचना वरिष्ठांसमोर ठेवण्याचे आश्वासन तेवढे अधिकार्‍यांनी दिले. खातेदारांसाठी सरकार पातळीवर काही तात्पुरती व्यवस्था नाही का करता येणार या प्रश्नावर रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांनी सरकारकडेच बोट दाखवले. या शिष्टमंडळातील आणखी एक सदस्य जित्सु शेठ यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या समोर आमच्यासाठी तूर्तास कोणताही उपाय नाही. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सरकारी बँकांचे एनपीए ८० हजार कोटी, बँका गाळात रूतण्याची
‘देशातील बँकांमध्ये सहा महिन्यात ९५८ अब्ज रुपयांचा घोट
शहरांची नावे बदलण्याचा भाजपाच्या योगी सरकारचा सीलसीला
८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, भागलपूर मॉब लिंचिंग प्रकर
जेएनयू : पोलिस कारवाईवरून विरोधक आक्रमक
आधी तिकीटासाठी पैसे द्या आणि नंतर ‘यांची’ भांडी पण घासा
शेतकरी संकटात : सरकारअभावी पीक कर्ज पुनर्गठनाचा निर्णय न
भूकंपाच्या धक्क्याने भुज हादरले
मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
संस्कृतच्या मुस्लीम प्राध्यापकाविरोधात ब्राम्हण विद्
भाजपा सरकारने घाईघाईत निवडणूक बॉंड प्रणाली लादली
मराठा आरक्षण : पुढील सुनावणी जानेवारीमध्ये
देशाचा विकास दर घसरणार, नोकर्‍याही जाणार
भाजपाच्या अंताची सुरूवात महाराष्ट्रातूनच, संजय राऊत या
बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसाठी महत्
महाराष्ट्र राज्याचा गुन्हेगारी अहवाल रखडलेलाच, फडणवीस
राज्यात सत्तासंघर्षाच्या काळात ३०६ शेतकर्‍यांच्या आत्
राज्यभरातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठीचे आरक्षण जाह
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून
रामदेव बाबा नेटकंर्‍याच्या निशाण्यावर, मूलनिवासी संकल्
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper