×

ट्रम्प विरोधातील महाभियोग प्रस्ताव मंजूर, तपासणी प्रक्रिया सुरू

Published On :    3 Nov 2019  By : MN Staff
शेयर करा:


प्रतिनिधी सभेत डेमोक्रेटिक पक्षाचे बहुमत आहे. या पक्षाच्याच नेतृत्वाखाली महाभियोग तपासणी प्रक्रिया सुरू केली गेली आहे.





वॉशिंग्टन : अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग चालविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. या प्रस्तावाच्या बाजूने २३२ मते, तर विरोधात १९६ मते पडली. प्रतिनिधी सभेत डेमोक्रेटिक पक्षाचे बहुमत आहे. या पक्षाच्याच नेतृत्वाखाली महाभियोग तपासणी प्रक्रिया सुरू केली गेली आहे.


या प्रस्तावात म्हटले आहे, की या प्रकरणाची सार्वजनिक तपासणी व्हावी. याचे नेतृत्व अमेरिकन कॉंग्रेसच्या (प्रतिनिधी गृह) गुप्त प्रकरणांच्या समितीचे प्रमुख ऍडम स्किफ यांच्याकडे द्यावे.


समितीचे अध्यक्ष मॅक्गवर्न म्हणाले, की राष्ट्राध्यक्षांनी शक्तीचा दुरुपयोग केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि निवडणूक प्रक्रियेतील गोपनियतेबाबत शंका उपस्थित झाल्या. याबाबतचे सबळ पुरावे आहेत. ट्रम्प यांना पदावरून हटविण्यासाठी २० रिपब्लिकन खासदारांनी त्यांच्याच पक्षाच्या ट्रम्प यांच्या विरोधात मतदान करण्याची गरज आहे; मात्र याची शक्यता कमी आहे.


ट्रम्प यांच्यावर आरोप आहे, की त्यांनी विरोधक ज्यो बिडेन आणि त्यांच्या मुलग्याविरोधात युक्रेनच्या गॅस कंपनीत भ्रष्टाचारप्रकरणी तपास करण्यासाठी युक्रेनवर दबाव टाकला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सहा समित्या करणार आहेत. त्यानतंर सर्व पुरावे न्यायिक समितीकडे पाठवले जातील. यात दोषी न आढळल्यास ट्रम्प सुरक्षित राहतील. दोषी आढळल्यास मतदान होईल. 


कमी मते पडल्यास ट्रम्प यांना काहीही धोका नसेल, तर जास्त मते पडल्यास महाभियोग प्रक्रिया सिनेटकडे जाईल. तेथे सुनावणीनंतर दोषी आढळल्यास मतदान होईल. मतदान विरोधात गेल्यास ट्रम्प यांना पदावरून जावे लागेल; मात्र सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. दोन तृतियांश मते कमी पडली, तर ट्रम्प पदावर राहतील.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
स्वच्छतेसाठी साडेचारशे कोटींचा चुराडा!, ब्रिस्क कंपनील
शेतकर्‍यांची मदत अडकणार सत्तास्थापनेच्या कचाट्यात
महाराष्ट्ररुपी वाघ घेतो आहे युतीचा घास, राज ठाकरेंचे जुन
सरन्यायाधीश माहिती अधिकारात!, सर्वोच्च न्यायालयाचा ऐति
केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका
शबरीमाला मंदिर: महिलांचा प्रवेश फक्त मंदिरापुरता मर्या
विद्यार्थ्यांच्या विरोधापुढे जेएनयू नमले, हॉस्टेल शुल्
अमेरिकेत मुस्लिम, ज्यू आणि शीख हेट क्राईमचे सर्वाधिक बळी
आंदोलनाला परवानगी देत नाही पण हुक्का बार चालू ठेवता, आमद
बाजार समित्या बरखास्त केल्यास राज्यातील व्यवस्था कोलमड
सत्तावाटपाची चर्चा शहांनी मोदींपासून लपवली, संजय राऊत य
‘आरसेप’बाहेर राहिल्यास भारतात एकही बहुराष्ट्रीय कंपनी
शाळांच्या तपासणीसाठी विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव
बाबा तुझा आयुर्वेदावर भरोसा नाय कायं?
कलम ३७०, जम्मू-काश्मिरात शंभराव्या दिवशीही जनजीवन विस्क
२०१६ मधील शेतकरी आत्महत्यांबाबतचा डेटा ३ वर्षांनंतर प्
‘जेएनयू’ आंदोलनात शिक्षकांचीही उडी, आंदोलन चिघळण्याची
कर्नाटकातील सतरा आमदार अपात्रच, पण पोटनिवडणूक लढवता येण
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे एमएचआरडी कमी करणार का?
भारतात प्रदूषणामुळे हृदयाच्या आजाराचा धोका
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper