×

एअर इंडियाच्या खासगीकरणाला कर्मचारी संघटनांचा विरोध, केंद्र सरकारपुढे पेच

Published On :    7 Nov 2019  By : MN Staff
शेयर करा:


एअर इंडियाच्या कर्मचारी संघटनांनी राष्ट्रीय विमान कंपनीच्या खासगीकरणाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचार्‍यांच्या पगार व पेन्शन देण्यासह विविध विषयांवर अद्याप स्पष्टता नाही. संघटनांनी उचललेल्या या पावलापुढे सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.





नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचारी संघटनांनी राष्ट्रीय विमान कंपनीच्या खासगीकरणाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचार्‍यांच्या पगार व पेन्शन देण्यासह विविध विषयांवर अद्याप स्पष्टता नाही. संघटनांनी उचललेल्या या पावलापुढे सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.


कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे असे आहे की, जेव्हा सरकार तोट्यात जाणार्‍या एअर इंडियाच्या प्रस्तावित विनिवेशाच्या अंतिम चौकटीवर काम करत आहे. मुंबईतील विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सर्व केंद्रीय कामगार संघटना आणि आंतरराष्ट्रीय परिवहन कामगार महासंघाला (आयटीएफ) खासगीकरणाविरूद्ध पत्र लिहण्याचा निर्णयही घेण्यात आला. यात वैमानिक, क्रू मेंबर्स, अभियंता आणि ग्राउंड स्टाफसह इतरांचे प्रतिनिधित्व करणारे युनियन नेते सहभागी होते.


युनियनने खासगीकरणाला विरोध करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेतला जाईल. यावर्षी जुलैमध्ये एअर इंडियाच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने कंपनीतील मोठ्या प्रमाणावर सर्व नेमणुका व पदोन्नती थांबवण्याचे निर्देश दिले होते. 


गेल्या टर्ममध्ये निविदा काढण्यात अपयशी ठरलेले मोदी सरकार या कालावधीत एअर इंडियाला खासगी हातात देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. खासगीकरणाच्या प्रक्रियेत निर्णय घेण्यासाठी सरकारने मंत्र्यांच्या गटाची पुन्हा स्थापना केली. ज्याचे अध्यक्ष अमित शहा बनले होते. ही समिती एअर इंडियाच्या खासगीकरणासंदर्भात निर्णय घेईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्य व रेल्वेमंत्री पियुष गोयल, नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी हे सदस्य आहेत.


एअर इंडियावर एकूण ५८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. राष्ट्रीय विमान कंपनीचा एकूण तोटा ७० हजार कोटी रुपये आहे. यावर्षी ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात विमान कंपनीला ७ हजार ६०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. खासगीकरणाच्या मुद्यावर नागरी उड्डयन मंत्र्यांनी एअर इंडिया वाचविण्यासाठी त्याचे खासगीकरण करावे लागेल असे सांगितले आहे. गेल्या वर्षी सरकारने एअर इंडियामधील ७६ टक्के हिस्सा विकण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. परंतु एका खासगी क्षेत्राने निविदा प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात रस घेतला नाही, त्यामुळे ही योजना अपयशी ठरली.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
स्वच्छतेसाठी साडेचारशे कोटींचा चुराडा!, ब्रिस्क कंपनील
शेतकर्‍यांची मदत अडकणार सत्तास्थापनेच्या कचाट्यात
महाराष्ट्ररुपी वाघ घेतो आहे युतीचा घास, राज ठाकरेंचे जुन
सरन्यायाधीश माहिती अधिकारात!, सर्वोच्च न्यायालयाचा ऐति
केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका
शबरीमाला मंदिर: महिलांचा प्रवेश फक्त मंदिरापुरता मर्या
विद्यार्थ्यांच्या विरोधापुढे जेएनयू नमले, हॉस्टेल शुल्
अमेरिकेत मुस्लिम, ज्यू आणि शीख हेट क्राईमचे सर्वाधिक बळी
आंदोलनाला परवानगी देत नाही पण हुक्का बार चालू ठेवता, आमद
बाजार समित्या बरखास्त केल्यास राज्यातील व्यवस्था कोलमड
सत्तावाटपाची चर्चा शहांनी मोदींपासून लपवली, संजय राऊत य
‘आरसेप’बाहेर राहिल्यास भारतात एकही बहुराष्ट्रीय कंपनी
शाळांच्या तपासणीसाठी विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव
बाबा तुझा आयुर्वेदावर भरोसा नाय कायं?
कलम ३७०, जम्मू-काश्मिरात शंभराव्या दिवशीही जनजीवन विस्क
२०१६ मधील शेतकरी आत्महत्यांबाबतचा डेटा ३ वर्षांनंतर प्
‘जेएनयू’ आंदोलनात शिक्षकांचीही उडी, आंदोलन चिघळण्याची
कर्नाटकातील सतरा आमदार अपात्रच, पण पोटनिवडणूक लढवता येण
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे एमएचआरडी कमी करणार का?
भारतात प्रदूषणामुळे हृदयाच्या आजाराचा धोका
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper