×

महापुरूषांचा वारसा नष्ट करण्याच्या षड्यंत्राविरोधात बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मैदानात

Published On :    7 Nov 2019  By : MN Staff
शेयर करा:


दि. १७ नोव्हेंबरला पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय धम्म प्रशिक्षण शिबीर





पुणे : वर्तमान स्थितीत शासक वर्गाकडून मूलनिवासी महापुरूषांचा वारसा व विचारधारा नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. शासक वर्गाची ही षड्यंत्रे हाणून पाडण्यासाठी बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मैदानात उतरले आहे. बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी समाजकल्याण केंद्र, रंग भवन जवळ, सिव्हील लाईन्स, सोलापूर येथे पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय धम्म प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.


या कार्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून मायनॉरिटी मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, नवी दिल्लीचे संचालक, प्रा. विलास खरात उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन संगमेश्‍वर कॉलेज सोलपूरचे माजी प्राचार्य डी.डी.पुजारी यांच्याहस्ते होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.औदुंबर म्हस्के प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.


बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. तथागत गौतम बुध्द व सम्राट अशोक मोर्यांचा वारसा जपण्यासाठी जागृत व कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे. वर्तमान स्थितीत शासक वर्गाकडून मूलनिवासी महापुरूषांचा वारसा व विचारधारा नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. शासक वर्गाची षड्यंत्रे हाणून पाडणे व विविध मुद्यांवर संघर्ष करण्यासाठी बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची निर्मिती आहे.


मौर्य कालीन प्राचीन भोन-बौध्द स्तूप सरकार नष्ट करण्याच्या तयारीत, पवनी स्तूप, अडम स्तूप, सोपारा स्तूप, कोल्हापूरचा मौर्यकालीन बौध्द स्तुपाचे जतन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत बुध्दांचे आधुनिक भारतात बनवलेले पहिले बुध्द विहार-देहू रोड बुध्द विहार नष्ट होण्याच्या मार्गावर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावर भाजपा सरकारची अघोषित बंदी, महात्मा ज्योतीराव फुले, शाहू छत्रपती महाराज व सत्यशोधक साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची हेळसांड, दिल्ली येथील संत रविदास मंदिर यांच्या प्रतिमेची विटंबना करीत मनुवाद्यांनी रविदास मंदिर तोडले, बौध्दांची नेमकी संख्या किती हे जणगणना आयोग हेतूपूर्वक दडवते व त्याबाबत जनतेत संभ्रम निर्माण करते. 


२०२१ च्या जनगणनेत बौध्दांची खर्‍या अर्थाने जनगणना करण्याबाबत, विश्‍वधरोहर बुध्दगया विहार, दीक्षाभूमी बौध्दांच्याच ताब्यात असली पाहिजे या विविध मुद्यांना बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने हात घातला आहे. त्यासाठीच हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाऊसाहेब कांबळे, मंदाकिनी तळभंडारे, शारदा गजभिये, शांताराम रणश्रृंगारे, एस.पी.कडलक, डॉ.अर्जुन ओहळ, उत्तम क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या प्रशिक्षण शिबीराला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
स्वच्छतेसाठी साडेचारशे कोटींचा चुराडा!, ब्रिस्क कंपनील
शेतकर्‍यांची मदत अडकणार सत्तास्थापनेच्या कचाट्यात
महाराष्ट्ररुपी वाघ घेतो आहे युतीचा घास, राज ठाकरेंचे जुन
सरन्यायाधीश माहिती अधिकारात!, सर्वोच्च न्यायालयाचा ऐति
केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका
शबरीमाला मंदिर: महिलांचा प्रवेश फक्त मंदिरापुरता मर्या
विद्यार्थ्यांच्या विरोधापुढे जेएनयू नमले, हॉस्टेल शुल्
अमेरिकेत मुस्लिम, ज्यू आणि शीख हेट क्राईमचे सर्वाधिक बळी
आंदोलनाला परवानगी देत नाही पण हुक्का बार चालू ठेवता, आमद
बाजार समित्या बरखास्त केल्यास राज्यातील व्यवस्था कोलमड
सत्तावाटपाची चर्चा शहांनी मोदींपासून लपवली, संजय राऊत य
‘आरसेप’बाहेर राहिल्यास भारतात एकही बहुराष्ट्रीय कंपनी
शाळांच्या तपासणीसाठी विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव
बाबा तुझा आयुर्वेदावर भरोसा नाय कायं?
कलम ३७०, जम्मू-काश्मिरात शंभराव्या दिवशीही जनजीवन विस्क
२०१६ मधील शेतकरी आत्महत्यांबाबतचा डेटा ३ वर्षांनंतर प्
‘जेएनयू’ आंदोलनात शिक्षकांचीही उडी, आंदोलन चिघळण्याची
कर्नाटकातील सतरा आमदार अपात्रच, पण पोटनिवडणूक लढवता येण
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे एमएचआरडी कमी करणार का?
भारतात प्रदूषणामुळे हृदयाच्या आजाराचा धोका
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper