×

आर्थिक मंदीचा सरकारच्या तिजोरीलाही फटका, वित्तीय तूट वाढणार, फिच सॉल्युशन्सनचे अनुमान

Published On :    8 Nov 2019  By : MN Staff
शेयर करा:


देशातील आर्थिक जगतात आलेल्या सुस्तीचे परिणाम आता दिसू लागले असून, या आर्थिक सुस्तीचा फटका आता सरकारच्या तिजोरीलाही बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विविध आर्थिक मुद्यांवर सल्ला देणारी कंपनी फिच सॉल्युशन्सने भारताच्या वित्तीय तुटीबाबतचे आपले अनुमान वाढवले आहे.





नवी दिल्ली : देशातील आर्थिक जगतात आलेल्या सुस्तीचे परिणाम आता दिसू लागले असून, या आर्थिक सुस्तीचा फटका आता सरकारच्या तिजोरीलाही बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विविध आर्थिक मुद्यांवर सल्ला देणारी कंपनी फिच सॉल्युशन्सने भारताच्या वित्तीय तुटीबाबतचे आपले अनुमान वाढवले आहे. 


२०१९-२० या चालू आर्थिक वर्षात भारताची एकूण वित्तीय तूट ही सकल घरेलू उत्पन्नाच्या (जीडीपी) ३.६ टक्के राहील, असा अंदाज फिच सॉल्युशन्सने वर्तवला आहे. यापूर्वी याच कंपनीने भारताची वित्तीय तूट ३.४ टक्के राहील, असे म्हटले होते. मात्र आता आपल्या अंदाजात ०.२ टक्क्यांनी वाढ करत तो ३.६ पर्यंत नेला आहे.  


यावर्षी जुलै महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने वित्तीय तूट ३.३ टक्क्यांपर्यंत मर्यादित राखण्याचे निश्चित केले होते. मात्र ही वित्तीय तूट वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीवर असलेली सुस्ती आणि जीएसटीच्या माध्यमातून येणार्‍या महसुलात झालेली घट, तसेच कॉर्पोरेट टॅक्समध्ये केलेल्या कपातीमुळे सरकारी तिजोरीत जमा होणारा महसूल घटण्याचा अंदाज फिच सॉल्युशनने वर्तवला आहे.

 
आर्थिक मंदीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशांतर्गत कंपन्यांसाठीच्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे २०१९ ते २० या काळात सरकारला सुमारे १ लाख ४५ हजार कोटी रुपयांचा महसूल गमवावा लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, जीएसटीच्या माध्यमातून येणारे उत्पन्नही घटले आहे. तसेच सरकारच्या अंदाजापेक्षाही हे उत्पन्न खाली गेले आहे.


त्याबरोबरच सरकारच्या महसुलात होणार्‍या वाढीबाबतच्या आकड्याचा अंदाजही फिचने बदलला आहे. या आर्थिक वर्षात सरकारच्या महसुलात १३.१ ऐवजी ८.३ टक्के एवढीच वाढ होईल, असा सुधारित अंदाज फिचने व्यक्त केला आहे. हा आकडा सरकारने व्यक्त केलेल्या १३.२ टक्के अंदाजापेक्षा फार कमी आहे.  



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
स्वच्छतेसाठी साडेचारशे कोटींचा चुराडा!, ब्रिस्क कंपनील
शेतकर्‍यांची मदत अडकणार सत्तास्थापनेच्या कचाट्यात
महाराष्ट्ररुपी वाघ घेतो आहे युतीचा घास, राज ठाकरेंचे जुन
सरन्यायाधीश माहिती अधिकारात!, सर्वोच्च न्यायालयाचा ऐति
केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका
शबरीमाला मंदिर: महिलांचा प्रवेश फक्त मंदिरापुरता मर्या
विद्यार्थ्यांच्या विरोधापुढे जेएनयू नमले, हॉस्टेल शुल्
अमेरिकेत मुस्लिम, ज्यू आणि शीख हेट क्राईमचे सर्वाधिक बळी
आंदोलनाला परवानगी देत नाही पण हुक्का बार चालू ठेवता, आमद
बाजार समित्या बरखास्त केल्यास राज्यातील व्यवस्था कोलमड
सत्तावाटपाची चर्चा शहांनी मोदींपासून लपवली, संजय राऊत य
‘आरसेप’बाहेर राहिल्यास भारतात एकही बहुराष्ट्रीय कंपनी
शाळांच्या तपासणीसाठी विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव
बाबा तुझा आयुर्वेदावर भरोसा नाय कायं?
कलम ३७०, जम्मू-काश्मिरात शंभराव्या दिवशीही जनजीवन विस्क
२०१६ मधील शेतकरी आत्महत्यांबाबतचा डेटा ३ वर्षांनंतर प्
‘जेएनयू’ आंदोलनात शिक्षकांचीही उडी, आंदोलन चिघळण्याची
कर्नाटकातील सतरा आमदार अपात्रच, पण पोटनिवडणूक लढवता येण
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे एमएचआरडी कमी करणार का?
भारतात प्रदूषणामुळे हृदयाच्या आजाराचा धोका
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper