×

आता कन्नन गोपीनाथन यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा

Published On :    8 Nov 2019  By : MN Staff
शेयर करा:


काश्मीर निर्बंधांचा निषेध केल्याने शिस्तभंगाची नोटीस





नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये घालण्यात आलेले निर्बंध म्हणजे तेथील नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशी भूमिका घेत या निर्बंधांच्या निषेधार्थ राजीनामा देणारे आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांच्याविरोधात केंद्रीय गृह मंत्रालयाने शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस काढली आहे. सरकारविरोधात भूमिका घेणार्‍या अधिकार्‍यांविरोधात चौकशीचा ससेमिरा लावून सरकार त्यांचे एकप्रकारे उट्टे काढत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.


गोपीनाथन हे सन २०१२ च्या तुकडीतील अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोरम आणि केंद्रशासित प्रदेशांच्या केडरचे अधिकारी आहेत. जम्मू-काश्मीरला कलम ३७० अंतर्गत दिलेला विशेष दर्जा हटवल्यानंतर तिथे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ त्यांनी ऑगस्टमध्ये राजीनामा दिला होता.


गृह मंत्रालयाने पाठवलेली नोटीस गोपीनाथन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली आहे. सरकारच्या धोरणाबाबत मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल माध्यमांशी बेकायदा संवाद साधून केंद्र सरकारच्या अन्य देशांसह इतर यंत्रणांसोबतच्या संबंधांना अडचणीत आणल्याचा आरोप गोपीनाथ यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


अखिल भारतीय सेवा नियम १९६९ च्या नियम ८ अन्वये शिस्तभंगप्रकरणी गोपीनाथन यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. गोपीनाथन यांच्या राजीनाम्यावर विचार सुरू असून त्यावर निर्णय झालेला नाही, त्यांनी १५ दिवसांत यावर आपले उत्तर द्यावे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
पीएम केअर्स फंड माहितीच्या अधिकारात आणा
राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार
राज्य सरकार कर्जाच्या खाईत, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी
कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारतात आणलं जाणार
बॉम्बे हायकोर्टचे नामांतर महाराष्ट्र हायकोर्ट करा, सेव
अमेरिकेतील आंदोलनाने भारतातील घुसखोर ब्राम्हणांना जाग
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना गोळ्या घालू, सोशल मीडियावरू
वन कर्मचार्‍यांना पिटाळले, आदिवासी वनपट्टेधारकांचा संत
पीएम केअर्स फंड : नागपूर खंडपीठाची केंद्राला नोटीस
राजभवनावर येणार्‍या ‘चक्रम वादळां’पासून सावध राहा
ब्राम्हण असलेल्या माजी जिल्हाधिकार्‍याचा प्रताप
देशातील तीनपैकी एक लघुउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ऑ
मुंबईतील हिंदुजा, जसलोक, बॉम्बे, लीलावती रुग्णालयांना नो
नावात काय असतं?
देशाचं नाव हिंदुस्थान करण्यासाठी याचिका दाखल करणारा पड
धक्कादायक! भीम ऍपच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, ७० लाख युजर
स्थलांतराचा प्रश्‍न मजुरांच्या उतावीळपणामुळे चिघळला, ग
चक्रीवादळ उद्या हरिहरेश्‍वरला : मुंबई, ठाणे, पालघरला रेड
बेरोजगारी वाढली ; मे महिन्यात लाखो जणांची नोकरी गेली, सें
सायबर गुन्हे लपवण्याकडे ८० टक्के विद्यार्थ्यांचा कल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper