×

आता वाराणसी, अमृतसरसह ६ विमानतळांच्या खासगीकरणाचा सपाटा

Published On :    2 Dec 2019  By : MN Staff
शेयर करा:


विमानतळ प्राधिकरणाची शिफारस





नवी दिल्ली: भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अमृतसर, वाराणसी, भुवनेश्‍वर, इंदूर, रायपूर आणि त्रिची (तिरुचिराप्पल्ली) विमानतळांचे खासगीकरण करण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत ऑपरेशन, व्यवस्थापन आणि विकासासाठी लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, मंगलुरू, तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी मधील विमानतळांचे खासगीकरण केले आहे.


यावर्षी फेब्रुवारीमध्ये सहा विमानतळांचे खासगीकरण करण्यात आले असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. एएआयने दि. ५ सप्टेंबरला संचालक मंडळाच्या बैठकीत आणखी सहा विमानतळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. यात अमृतसर, वाराणसी, भुवनेश्‍वर, इंदूर, रायपूर आणि त्रिची यांचा समावेश आहे.


 संचालक मंडळाने निर्णय घेतल्यानंतर ही शिफारस नागरी उड्डयन मंत्रालयाकडे पाठविली गेली. भारतीय विमानतळ प्राधिकरण देशभरात १०० हून अधिक विमानतळांची देखभाल करते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये खासगीकरणाच्या पहिल्या फेरीत अदानी समूहाला सर्व ६ विमानतळ चालवण्याचे कंत्राट मिळाले. एएआयने ‘प्रति प्रवासी शुल्क’ तत्त्वावर निवड केली.


यापूर्वी सरकारच्या वतीने एअर इंडिया आणि पवन हंसमधील भागभांडवल विक्रीबद्दलही चर्चा होती. या संदर्भात, विमानचालन क्षेत्राशी संबंधित तज्ञांचे म्हणणे आहे की, विकासाचा दबाव, व्यावसायिक व्याज आणि सुरक्षा दबाव या क्षेत्राचे मुख्य प्रश्न आहेत. 


विमानतळाचे खासगीकरण झाल्यानंतर ते अधिक चांगले काम करू शकतील असा सरकारचा तर्क आहे. सरकारच्या उत्पन्नात वाढ झाल्याने प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. देशातील ६ विमानतळ खासगी हातात देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचे सरकारने संसदेत दावा केला आहे. याचा फायदा अधिकारी व प्रवाशांना झाला आहे. सरकारने लखनौ, अहमदाबाद, जयपूर, गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि मंगलूरू ही विभानतळे खाजगी हातात दिले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकर्‍यां
भारतात मंदीची समस्या गंभीर, मोदींनी मान्य करायलाच हवी
हैदराबाद एन्काऊंटरची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ग
हैद्राबाद पोलिसांचे कृत्य कायदाविरोधी
वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत, एक लाख रोजगार बुडाले
भारतात हाताने, डोक्यावरून मैला वाहण्याची प्रथा आजही काय
तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा
९० टक्के जाळलेल्या तरुणीचा अखेर मृत्यू, उन्नाव बलात्कार
काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला १५ हजार कोटींचा फटका
अयोध्या निकालाविरोधात चार फेरविचार याचिका दाखल
२०२२ पर्यंत भारत ५ हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणे
चीनने २० लाखांपेक्षा अधिक मुस्लिमांना जबरदस्तीने ठेवले
एनआरसीमध्ये १०८ कोटींचा आर्थिक घोटाळा?
झारखंडमध्ये निवडणुकीदरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू
बुध्दीस्टांनी अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गैरव्यवहाराच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्
‘राष्ट्रनिर्माते’
देशात पाण्याचे संकट गहिरे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper