×

माणसातील माणूस हरवला...!

Published On :    3 Dec 2019  By : MN Staff
शेयर करा:


हैदराबाद तेलंगणा येथे एक पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या तरूणीवर बलात्कार करून तिला जीवंत जाळण्यात आले. या प्रकाराने सारा देश हादरला आहे. त्या तरूणीचा काय गुन्हा की तिला एवढी मोठ्या शिक्षेला सामोरे जावे लागले.





हैदराबाद तेलंगणा येथे एक पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या तरूणीवर बलात्कार करून तिला जीवंत जाळण्यात आले. या प्रकाराने सारा देश हादरला आहे. त्या तरूणीचा काय गुन्हा की तिला एवढी मोठ्या शिक्षेला सामोरे जावे लागले. त्या तरूणीच्या भळभळत्या जखमा मानवी मनाच्या ओरखड्यावर उठणार आहेत की नाही? माणसे एवढी असंवेदनशील कशी काय होतात? कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी म्हटले आहे की, ‘माणसा माणसा कधी होशील रे तू माणूस’..! त्यावेळी उपस्थित केलेला प्रश्‍न आजही तंतोतत लागू पडत आहेत.


भारतात महिलांना आजही दुय्यम लेखले जाते. चूल आणि मूल या भूमिकेपलिकडे तिच्या वाट्याला काहीच येत नाही. महिला प्रधान असलेला भारत पुरूष प्रधान झाला. त्या पासून महिलांना दुय्यमच लेखले गेले. तिच्या वाट्याला सोशिकता आली. त्यातच व्यवस्थेने तिच्या माथी पोथी, पुराण, उपावासाचे थोतांड मारले. त्यामुळे एकेकाळी विद्रोह करणारी महिला ही अगदी सोज्वळ व शांत झाली. महिला गुलाम झाली की अख्खे कुटुंब गुलाम बनते. 


महिलांना गुलामीच्या बेडीतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. याचे सर्व श्रेय फुले दाम्पत्याला जाते. महिलांनी आकाश कवेत घेता कामा नये ही पुरूषी मानसिकता असल्याने नको त्या घटना घडत असतात. 


आज सर्रास देशात कुठेना कुठेतरी महिलांवरील बलात्कार वाढत चालले आहेत. त्यामागेही पुरूषी अहंकार कारणीभूत आहे. त्या तरूणीचे लचके तोडताना तिच्या किंकाळ्यांनी आसमंत जरूर भेदरला असेल. परंतु त्या हैवानांच्या शारिरिक हव्यासापोटी तिची किंकाळी हवेतच विरली.


मुलींनी अथवा तरूणींनी कसे वागावे याचे ढोल बडवले जातात. परंतु जे तरूण हैवान होतात त्यांच्यासाठी काही त्यांच्यासाठी काही आचारसंहिता आहे की नाही? मुलींनी रात्रीच्यावेळी घराबाहेर पडू नये. तिने सायंकाळी ७ च्या आत घरात आले पाहिजे. एवढेच कशाला तिने कपडे कसे घालावे, तिची केशभूषा कशी असली पाहिजे अशी नानाप्रकारे प्रवचने झोडली जातात. म्हणजे तरूणीला जगण्याचे स्वातंत्र्य नाही का? एकप्रकारे तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम पुरूषप्रधान संस्कृतीकडून केली जाते. 


एवढेच कशाला मासिक पाळी दरम्यान त्या तरूणीने देवळात अथवा मंदिरात जाऊ नये, तिने घराच्या बाहेर बसावे असा अलिखित दंडकच आहे. हे कशाचे लक्षण आहे? जी मासिक पाळी नव सृजनाचा अविष्कार आहे, तिला विटाळ मानणे हीदेखील व्यवस्थेने लादलेली बुरसट अशी कल्पना आहे. तेलंगणात झालेली घटना ही मानवी हृदयाला भोके पाडणारी आहे. ते तरूण बलात्कारच करून थांबले नाहीत तर त्या तरूणीला जीवंत जाळले. ही कृती म्हणजे माणसातील माणूस हरवल्याची घटना आहे. 


माणसाने माणसाप्रमाणे वागायला हवे. तशीच त्याच्याकडून कृती झाली पाहिजे. परंतु माणूस एखाद्या पशुप्रमाणे वागत आहे. त्यामुळेच अशा घटना वारंवार घडताना दिसत आहे. अशा घटना घडण्यामागे मानसिक विकार कारणीभूत असू शकतात. या घटनांना पायबंद घालण्यासाठी मनोविज्ञानावर अभ्यास करायला हवे. तरच यातून काहीतरी मार्ग निघू शकतो. नाहीतर पुन्हा एकदा तेलंगणा घडू शकते.


दिलीप बाईत

९२७०९६२६९८



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकर्‍यां
भारतात मंदीची समस्या गंभीर, मोदींनी मान्य करायलाच हवी
हैदराबाद एन्काऊंटरची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ग
हैद्राबाद पोलिसांचे कृत्य कायदाविरोधी
वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत, एक लाख रोजगार बुडाले
भारतात हाताने, डोक्यावरून मैला वाहण्याची प्रथा आजही काय
तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा
९० टक्के जाळलेल्या तरुणीचा अखेर मृत्यू, उन्नाव बलात्कार
काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला १५ हजार कोटींचा फटका
अयोध्या निकालाविरोधात चार फेरविचार याचिका दाखल
२०२२ पर्यंत भारत ५ हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणे
चीनने २० लाखांपेक्षा अधिक मुस्लिमांना जबरदस्तीने ठेवले
एनआरसीमध्ये १०८ कोटींचा आर्थिक घोटाळा?
झारखंडमध्ये निवडणुकीदरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू
बुध्दीस्टांनी अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गैरव्यवहाराच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्
‘राष्ट्रनिर्माते’
देशात पाण्याचे संकट गहिरे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper