×

फडणवीसांनी महाराष्ट्र बुडवला कर्जाच्या खाईत

Published On :    3 Dec 2019  By : MN Staff
शेयर करा:


पावणेपाच लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर





मुंबई : कर्जाच्या डोहात बुडालेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढून राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचे फार मोठे आव्हान महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे. यासाठी श्‍वेतपत्रिकेचा आधार घेतला जात असून, ती काढण्यासाठी मंत्रालयातील वित्त विभागात हालचाली सुरू आहेत. राज्याच्या डोक्यावर सध्या पावणेपाच लाख कोटींचे कर्ज आहे. राज्यातील शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणे, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तत्काळ मदत करणे, हे ठाकरे यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे.


राज्यातील पूर्वीच्या सरकारच्या कारकिर्दीतील अर्थव्यवस्थेची दशेची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेणे पुढील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणे, यासाठी श्‍वेतपत्रिका काढण्यात येते. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारातील शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून पुढील वाटचाल करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे.


भाजपच्या आणि नंतर शिवसेना सहभागी झालेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, मुंबई, पुणे, नागपूर या शहरांत मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे वारेमाप खर्च करावा लागला आहे. परिणामी, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून राज्यावर कर्जाचा डोंगर उभार राहिला आहे.


फडणवीस यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला म्हणजे २०१५-१६ मध्ये शिल्लक कर्ज ३ लाख २४ हजार कोटी होते. तर २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होताना हा आकडा ४ लाख ७१ हजार कोटींवर गेला आहे. कर्जाचा हा वारसा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या खांद्यावर येऊन पडला आहे. बुलेट ट्रेनचा खर्च १ लाख कोटी, समृद्धी महामार्गाचा खर्च ४८ हजार कोटी, मेट्रो प्रकल्पांचा खर्च ३० हजार कोटी इतका आहे. फडणवीस यांच्या कालावधीत महसुली जमेपेक्षा खर्च सातत्याने वाढत गेला. त्यामुळे सतत तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागला होता. महसुली जमा वाढवण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्या समोर आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकर्‍यां
भारतात मंदीची समस्या गंभीर, मोदींनी मान्य करायलाच हवी
हैदराबाद एन्काऊंटरची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ग
हैद्राबाद पोलिसांचे कृत्य कायदाविरोधी
वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत, एक लाख रोजगार बुडाले
भारतात हाताने, डोक्यावरून मैला वाहण्याची प्रथा आजही काय
तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा
९० टक्के जाळलेल्या तरुणीचा अखेर मृत्यू, उन्नाव बलात्कार
काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला १५ हजार कोटींचा फटका
अयोध्या निकालाविरोधात चार फेरविचार याचिका दाखल
२०२२ पर्यंत भारत ५ हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणे
चीनने २० लाखांपेक्षा अधिक मुस्लिमांना जबरदस्तीने ठेवले
एनआरसीमध्ये १०८ कोटींचा आर्थिक घोटाळा?
झारखंडमध्ये निवडणुकीदरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू
बुध्दीस्टांनी अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गैरव्यवहाराच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्
‘राष्ट्रनिर्माते’
देशात पाण्याचे संकट गहिरे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper