×

मोदी सरकारचा जाहिरातीबाजीवर ४ हजार ३४३ कोटींचा खर्च

Published On :    15 May 2018  By : MN Staff
शेयर करा:


नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने मागील ४६ महिन्यात जाहिरातींवर तब्बल ४ हजार ३४३.२६ कोटी रूपये खर्च केले आहेत.





नवी दिल्ली: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने मागील ४६ महिन्यात जाहिरातींवर तब्बल ४ हजार ३४३.२६ कोटी रूपये खर्च केले आहेत. मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर टीका झाल्यानंतर यंदाच्या वर्षी यावर २५ टक्के कमी खर्च करण्यात आला आहे. 


२०१६-१७ मध्ये मोदी सरकारने एकूण १ हजार २६३.१५ कोटी रूपये जाहिरातीवर खर्च केले होते. माहिती अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे.


माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रधानमंत्री कार्यालयाकडून केंद्र सरकार सत्तेवर आल्यापासून आजपर्यंत विविध जाहिरातींवर झालेल्या खर्चाची माहिती मागितली होती. केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशन विभागाचे आर्थिक सल्लागार तपन सूत्रधर यांनी १ जून २०१४ ते आतापर्यंत देण्यात आलेल्या जाहिरातींची माहिती दिली. 


यामध्ये १ जून २०१४ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान ४२४.८५ कोटी रूपये मुद्रित माध्यम, ४४८.९७ कोटी रूपये इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि ७९.७२ कोटी रूपये बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आले आहे. यापूर्वी हा खर्च यापेक्षा जास्त होता.


वर्ष २०१५-२०१६ आर्थिक वर्षांत ५१०.६९ कोटी रूपये मुद्रित माध्यम, ५४१.९९ कोटी रूपये इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि ११८.४३ कोटी रूपये बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आले. वर्ष २०१६-१७ मध्ये ४६३.३८ कोटी रूपये मुद्रित माध्यम, ६१३.७८ कोटी रूपये इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि १८५.९९ कोटी रूपये बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आला. 


मागील वर्षींच्या आकडेवारीनुसार यंदा जाहिरातींवरील खर्च थोडा कमी झाल्याचे दिसते. १ एप्रिल २०१७ ते ७ डिसेंबर २०१७ दरम्यान ३३३.२३ कोटी रूपये मुद्रित माध्यम. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ दरम्यान इलेक्ट्रॉनिक माध्यमावर ४७५.१३ कोटी रूपये तर बाह्य खर्चावर १४७.१० कोटी रूपये खर्च करण्यात आला. 


हा १ एप्रिल २०१७ ते ३१ जानेवारी २०१८ पर्यंतचा खर्च आहे. मोदी सरकारने २०१७-१८ मध्ये या खर्चांत कपात केल्याचे दिसून येते. वर्ष २०१६-१७ मध्ये एकूण १ हजार २६३.१५ कोटी रूपये खर्च करणार्‍या सरकारने वर्ष २०१७-२०१८ मध्ये ९६६.४६ कोटी रूपये खर्च केले आहेत. मोदी सरकारने २५ टक्के म्हणजे ३०८ कोटी रूपये खर्चांत कपात केली आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा! शरद पवार यां
कर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे
गडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे
पुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्
शिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का ? राजू शेट्टी
वर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष
नोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे? पृथ्वी
राष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’
सुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा
फेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली
‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख
राज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि
‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह
६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड
जिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब
यूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू!
मोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर
शिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.
सव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper