×

लोक विद्रोह करतील या भीतीने ब्राम्हण-बनिया मीडिया चिडीचूप

Published On :    15 May 2018  By : MN Staff
शेयर करा:


सिल्लोड येथील परिवर्तन यात्रेत बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांची टीका





सिल्लोड: संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, प्रसारमाध्यमे या लोकतंत्राच्या चारही स्तंभावर ब्राहणांचे वर्चस्व आहे. देशात लोकतंत्र नसून ब्राम्हणतंत्र असल्याचे लोकांच्या लक्षात आले तर लोक विद्रोह करतील या भीतीने ब्राम्हण-बनिया मीडिया चिडीचूप असल्याची टीका बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केली. 


सिल्लोड येथील परिवर्तन यात्रेच्या आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होतेे. यावेळी विचारमंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी कॉंग्रेसची कशी स्थापना झाली आणि कॉंग्रेसने काय दिवे लावले यावर मेश्राम यांनी भाष्य केले. ११८५ मध्ये ज्यावेळी कॉंग्रेसची स्थापना झाली त्यावेळी महादेव गोविंद रानडे राष्ट्रपिता जोतिराव फुले यांना भेटायला गेले व तुम्ही कॉंगेसमध्ये या असे आमंत्रण दिलेे. 


यावर फुले यांनी रानडे यांचा खरपूस समाचार घेत अरे ही कसली राष्ट्रीय महासभा ही तर भटा-ब्राम्हणांची सभा. त्यामुळे मी काही कॉंगेसमध्ये येत नाही असे सांगितले. बाळ गंगाधर टिळक हे राजर्षी शाहू महाराजांकडे गेले आणि म्हणाले, शाहू महाराज आपण कॉंगेसमध्ये यावे, यावर महाराज म्हणाले, टिळक तुम्ही ब्राम्हण लोक माझ्यासारख्या राजाला जगू देत नाही. 


शेळ्या-मेंढ्या तुमच्यासारख्या लांडग्यांच्या कळपात घुसल्या तर त्यांची काय अवस्था होईल या विचारानेच माझ्या अंगावर शहारे येत आहेत. तर लाला लजपतराय हे विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कॉंगेसमध्ये आणण्यासाठी गेले. 


त्यावेळी बाबासाहेबांनी ठासून सांगितले,  इंग्रजांनी भारतीयांना गुलाम बनवले आहे, हे तुम्ही सांगत आहात ते चुकीचे आहे. कॉंगेसचा सिध्दांत चुकीचा आहे. यामुळे ब्राम्हण स्वातंत्र्य होतील परंतु ते आम्हांला स्वातंत्र्य करतील याची खात्री काय?  


त्यामुळे मीसुध्दा कॉंगेसमध्ये येणार नाही. जे शहाणे लोक होते ते कॉंगेसमध्ये गेले नाहीत, परंतु आता कॉंगेसमध्ये जाण्याची घाई लागते. आता जे लोक कॉंगेसमध्ये जातात त्यांची काय लायकी आहे याचे अवलोकन करण्याचे मी तुमच्यावर सोडतो असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


लोकांना वाटते की, आपल्या देशात लोकतंत्र आहे, कारण दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. परंतु या देशात लोकतंत्र नसून ब्राम्हणतंत्र आहे. एक ब्राम्हण जातो आणि दुसरा ब्राम्हण सत्तेचा ताबा घेतो. हे सर्व संविधानाच्याविरोधात सुरू आहे. 


त्यामुळे निडणुकीच्या माध्यमातून बदल होणे संभव नाही. जे साधे ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकत नाहीत ते देशाचे प्रधानमंत्री ठरवत आहेत. गेल्या अडीच हजार वर्षापासून डोक्यावर ब्राम्हण बसला आहे तो उतरायचे नाव घेत नाही, अशा शब्दात मेश्राम यांनी ब्राम्हणी व्यवस्थेवर हल्ला चढवला. 


निवडणुका होतात म्हणजे लोकतंत्र आहे असे मानणेच चुकीचे आहे. राज्यशास्त्रात निवडणुकीवरील लोकतंत्र समजावले जात नाही. लोकतंत्र सत्तेच्या विभाजनावर उभे आहे. हे विभाजन म्हणजे लोकतंत्रातील चार स्तंभ. परंतु या चारही स्तंभावर ब्राम्हणांनी कब्जा केला आहे.


भाजपा बदमाश तर कॉंगेस महाबदमाश आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठीच कायदे बनवले जात आहेत. सर्व निर्णय  हे मूलनिवासींच्या विरोधात घेतले जात आहेत. संसदेत आजच्या घडीला ४११ खासदार हे ब्राम्हणांचे आहेत. तर प्रथम श्रेणी अधिकारी ७९.२ टक्के आहेत. 


न्यायपालिका व प्रसारमाध्यमांमध्ये ९७ टक्के ब्राम्हण आहेत.  तर प्रसारमाध्यंंमाच्या चार विभागात इलेक्ट्रॉनिक, मुद्रीत, पारंपरिक व व्होकल यावरही ब्राम्हणांनी नियंत्रण मिळवले आहे. या देशात ७.५ हजार बोलीभाषा मूलनिवासी बहुजन समाजातील लोक बोलतात, परंतु या बोलीभाषांना मान्यता नाही. 


तर ब्राम्हण ग्रंथभाषा बोलतो व लिहतो त्याला मान्यता आहे. आसाराम बापू, मुरारी बापू यासारखे खिसेकापू हे ब्राम्हणवादाचे प्रचारक आहेत.  शेटजी आणि भटजी हे शेतकर्‍यांचे दोन शत्रू आहेत हे राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी सांगितले होते. 


शेटजी व्यापाराच्या व भटजी सत्तेच्या माध्यमातून शेतकर्‍यांवर वर्चस्व गाजवतात. त्यामुळे आत्महत्येशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय नाही. कारण जागोजागी शेतकर्‍यांविरोधात कायदे केले जात आहेत. 


भारताला तथाकथित स्वातंत्र्य मिळाले आणि आतंकवादी कारवाया वाढल्या. नक्षलवादाने डोके वर काढले. भूकमरी वाढली. सर्वाधिक भ्रष्टाचार वाढला व मतदाराला खरेदी करून अल्पसंख्य असलेला ब्राम्हण देशाचा शासक बनत आहे, असे मेश्राम यांनी सांगितलेे.


नेहरू प्रधानमंत्री झाले आणि गांधीची हत्या-

मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर तीनवेळा हल्ला झाला. दोनवेळा त्यांना इंग्रजांनी वाचवले, परंतु जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होताच गांधी यांची हत्या झाली. याचा अर्थ गांधींचा बहुजनविरोधात वापर करून घेतला आणि गरज संपल्याने त्यांची हत्या करण्यात आली असा दाखला मेश्राम यांनी दिला.


.....आणि पेरीयार रामास्वामी यांनी कॉंग्रेस सोडली-

तामिळनाडू प्रांतात पेरीयार रामास्वामी यांनी ब्राम्हणविरोधी आंदोलन सुरू केले. यावर मोहनदास करमचंद गांधी यांनी रामास्वामी यांना सांगितले की, तुम्ही ब्राम्हणविरोधी आंदोलन थांबवा. 


कारण ब्राम्हणविरोधी आंदोलन चालवणे कॉंग्रेसचा अजेंडा नाही. यावर रामास्वामी म्हणाले, मी ब्राम्हणविरोधी आंदोलन थांबवणार नाही तर आजपासून कॉंग्रेसलाच सोडून देतो आणि त्यांनी कॉंग्रेसपासून फारकत घेतली.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’
दप्तराचे ओझे कमी होईना
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ ५० कोटी लोकांना मिळणार?
पुणे कराराचा धिक्कार व इतर मागण्यांसाठी
देशाचे आर्थिक मॉडेल बदलण्याची गरज, डॉॅ. एस.एस. मंठा यांचे
राफेल खरेदी प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी करा
आयुष्यमान भारत योजना खाजगी विमा कंपन्यांच्या फायद्यासा
मोदींसाठी देश नाही, सत्ता महत्त्वाची-जितेंद्र आव्हाड बर
मोदींसाठी देश नाही, सत्ता महत्त्वाची-जितेंद्र आव्हाड बर
नोकरी गेल्यावर एचआर अधिकारी बनला चोरांचा सरदार!
जात कळण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हाताला बा
अच्छे दिन’च्या घोषणेत फसली जनता-आ.गोपालदास अग्रवाल
शेअर बाजारात भूकंप कर्ज खाती बुडीत खात्यात जाण्याची शक्
तिहेरी तलाक अध्यादेशाला लवकरच आव्हान देणार
बामसेफ आणि वामन मेश्राम यांच्याविरोधात आरएसएसचे राष्ट्
कुपोषित बालकांच्या आरोग्यासाठी समृद्धम फाउंडेशनचा पुढ
२६ सप्टेंबरला राष्ट्रव्यापी धरणे प्रदर्शन
‘कमल का फूल, बडी भूल’
एक हजाराच्या नोटांच्या तुलनेत दोन हजारांच्या नोटा भरमस
धोकादायक संघटनांमध्ये भाकप (माओवादी) चौथी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper