×

‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो!

Published On :    15 May 2018  By : MN Staff
शेयर करा:


भाजपाच्या कर्नाटक विजयावर राज ठाकरे यांनी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त करत उभे केले प्रश्‍नचिन्ह





मुंबई: ईव्हीएम मशिनचा विजय असो एवढीच मार्मिक प्रतिक्रिया देत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाच्या कर्नाटक विजयावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. 


गेले काही महिने भाजपावर घणाघाती टीका करताना राज ठाकरे यांनी जर कर्नाटकमध्ये भाजपा जिंकली तर तो ईव्हीएम मशिनचा म्हणजे ईव्हीएम घोटाळ्याचा विजय असेल असे उद्गार काढले होते. आज कर्नाटकमध्ये भाजपा जिंकेल असे दिसत असताना ठाकरे यांनी याचा पुनरुच्चार फेसबुकच्या माध्यमातून केला आहे.


भाजपा सरकारवर टीकेचा भडीमार करताना राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला तसेच मनसैनिकांनी पाकिस्तानी साखरेविरोधात आंदोलन केले. पंतप्रधान मोदींचा उल्लेख तर राज ठाकरे यांनी गुजरातचे प्रधानमंत्री असा करत ते गुजरातच्या बाहेर विचार करत नाहीत असे सुचवले. 


नितिन गडकरी करोडो रुपयांचे आकडे नुसते तोंडावर फेकतात मग कामे का दिसत नाहीत असे सांगत त्यांनी गडकरी यांच्यावरही टीका केली आहे. सुरूवातीला नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे राज गेल्या काही वर्षांमध्ये कट्टर भाजपा विरोधक झाले असून त्याचे प्रत्यंतर त्यांच्या भाषणांमधून, व्यंगचित्रांमधून व मुलाखतींमधून येत असते. 


सुरूवातीला सोशल मीडियापासून फटकून राहणारे राज यथावकाश फेसबुकवर आले आणि त्या माध्यमातून त्यांनी संवाद साधायला सुरूवात केली. आता फेसबुकचाच आधार घेत त्यांनी भाजपाचा कर्नाटक विजय हा ईव्हीएम घोटाळा असल्याचे म्हटले आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बुलेट ट्रेनला गुजरातच्या शेतकर्‍यांचाही विरोध
अमित शहांचे मनसुबे उधळवून लावणारे मंत्री शिवकुमार ‘ईडी
हिंदु धर्मातील अनिष्ट प्रथांवर सोशल मीडियातून टीका हा ग
तुझा पाय तोडेन
ओएनजीसीसाठी दिल्लीतील कृषी भवनात बनावट मुलाखती
राज्यावर भारनियमनाचे सावट
महागाईचा पुन्हा भडका
राष्ट्रीय परिवर्तन यात्रेला ब्रम्हादेखील रोखू शकत नाही
मोहनदास गांधीना नेता मानल्याने ओबीसींची वाताहात
स्वत:च्या वर्चस्वासाठी ब्राम्हणांनी ११ वेळा केले भारता
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार?
सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निल
२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द
परराज्यातील ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण द्या
साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची ४०० कोटींची फसवणूक?
नरेंद्र मोदी ठरले ‘प्रसिध्दी विनायक’
बँकांचे १ हजार २२४ कोटींचे कर्ज थकवले
राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात
करार कमी दरात असेल तर १२६ ऐवजी ३६ राफेल का खरेदी केले
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper