×

२०१८ मध्ये दरदिवशी १०९ बालकांचे लैंगिक शोषण

Published On :    13 Jan 2020  By : MN Staff
शेयर करा:


महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात सर्वाधिक घटना, एनसीआरबीचा अहवाल





नवी दिल्ली : भारतात २०१८ मध्ये दरदिवश्ी सरासरी १०९ बालकांचे लैंगिक शोषण झाले असून, २०१७ च्या तुलनेत अशा घटना २२ टक्क्यांनी वाढल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालात म्हटले आहे. एनसीआरबीने अलीकडेच जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये अशा ३२,६०८ घटना घडल्या होत्या; तर २०१८ मध्ये पोक्सोतहत अशा ३९,८२७ घटना नोंदवल्या गेल्या.


लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि अश्‍लील साहित्य छायाचित्र अशा गुन्ह्यांपासून बालकांचे रक्षण करणारा कायदा (पोक्सो-२०१२) सर्वंकष आहे. बालकांच्या लैंगिक शोषणासंबंधीचे खटले निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय, विशेष विधिज्ञ आणि पीडित बालकांना भावनात्मक आधार देत मदत करणार्‍या व्यक्तींची गरज असते. चाईल्स राईटस् ऍण्ड यू (क्राय)च्या धोरण व समर्थक संचालक प्रीती महरा यांनी सांगितले की, बालकांवर अत्याचार करण्याचे गुन्हे वाढणे, ही बाब चिंताजनक आहे, तर दुसरीकडे अशा घटनांबाबत तक्रारी नोंदविण्याची वाढती प्रवृत्ती बघता लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास वाढल्याचे दिसते.


२०१८ मध्ये बालकांचे अपहरण करण्याचे गुन्ह्यांचे प्रमाण ४४.२ टक्के होते, तर पोस्कोतहत घडलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण ३४.७ टक्के होते. अश्‍लील साहित्य चित्रासाठी बालकांचा वापर करणे किंवा बालकांशी संबंधित अश्‍लील साहित्य-चित्रे संग्रहित करण्याच्या ७८१ घटना घडल्या. २०१७ च्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. एनसीआबीच्या आकडेवारीनुसार देशभरातील सर्व प्रकारच्या गुन्ह्यांपैकी बालकांशी संबंधित गुन्ह्यांच्या राज्यनिहाय प्रमाणानुसार उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहारमध्ये ५१ टक्के आहे.


बालकांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण सहापटीने वाढले

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये बालकांवर बलात्कार करण्याच्या २१,६०५ घटना घडल्या. यापैकी २१,४०१ बालिका होत्या, तर २०४ बालक होते. बालकांवर बलात्कार करणार्‍या सर्वाधिक २,८३२ घटना महाराष्ट्रात घडल्या. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. २०१८ मध्ये उत्तर प्रदेशात २०२३, तामिळनाडूत १,४५७ घटना घडल्या. २००८ ते २०१८ या दहा वर्षांत बालकांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण सहापटीने वाढले आहे. २००८ मध्ये २२,५००, तर २०१८ मध्ये १,४१,७६४, असे गुन्हे घडले. २०१७ मध्ये १,२९,०३२ अशा घटना घडल्या होत्या.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
जागतिक अर्थव्यवस्थेवरही भारतीय मंदीचा परिणाम
‘एनपीआर’लाही केरळचा विरोध
निवडणूक रोख्यांना स्थगिती नाही
भारतात युध्द करण्यासारखी आजची हालत निर्माण करण्यात आली
५० लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार
५० लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार
उत्तराखंडमध्ये उर्दूऐवजी संस्कृतसाठी पायघड्या
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे घाटकोपरमध्ये राष्ट्रीय स
शाहीनबाग : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलनाला
रोजगार अन् बेरोजगारांच्या आत्महत्येत वाढ
देशद्रोहाच्या आरोपाखाली हार्दिक पटेल यांना अटक
लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी देशाची खरी समस्या
सीएए, एनपीआर, एनआरसीविरोधात २९ जानेवारीच्या भारत बंदमध्
भीमा-कोरेगाव दंगलीनंतर बामसेफच्या कार्यक्रमांना काऊंट
प्रधानमंत्री मोदी ऐकत नाहीत, अन्यथा २०१५ मध्ये आपण चीनला
दिवाळखोरीच्या मार्गावर केंद्रातील भाजपा सरकार
माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांना अटक
हे तर चोर! अंथरुणं जप्त करणार्‍या पोलिसांविरोधात महिला आ
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पंजाब विधानसभेत ठराव
कलबुर्गी हत्या प्रकरणात दोन प्रमुख आरोपींना शोधण्यात अ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper