×

जेएनयूचे कुलगुरूच मास्टरमाइंड

Published On :    13 Jan 2020  By : MN Staff
शेयर करा:


तथ्यशोधन समितीचा अहवाल





नवी दिल्ली: दि. ५ जानेवारी रोजी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणार्‍या तथ्य शोधन समितीने या विद्यापीठात झालेला हिंसाचार हा विद्यार्थ्यांवर दहशत माजवण्यासाठी होता आणि या हल्ल्याला विद्यापीठाच्या कुलगुरूंचा पाठिंबा व उत्तेजन होते अशा नोंदी आपल्या अहवालात केल्या आहेत.


या तथ्य शोधन समितीची निरीक्षणे व त्यांना मिळालेले पुरावे हे या घटनेची चौकशी करणार्‍या समितीशी मिळतेजुळते आहेत. जेएनयूमध्ये हिंसाचार करण्यासाठी गुंडांची शिस्तबद्ध जमवाजमव झाली होती, या गुंडांना विद्यापीठात तसा प्रवेशही देण्यात आला आणि जेएनयूची सुरक्षा व्यवस्था पाहणार्‍या ‘सायक्लोप्स पी लिमिटेड’ या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी या गुंडांना मदत केली होती. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मारहाण व मालमत्तांची तोडफोड करणार्‍यांमध्ये विद्यापीठातील काही शिक्षकही सामील होते असे चौकशी समितीला आढळून आले आहे. ही निरीक्षणेही तथ्य शोधन समितीला आढळलेली आहेत.


तथ्य शोधन समिती व या प्रकरणाच्या चौकशीच्या अहवालात उजव्या विचारसरणीचे काही लोक जेएनयूत हिंसाचार करण्यासाठी आले होते असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. ‘जेएनयूत हिंसा घडवण्याअगोदर व्हॉट्स अप ग्रुपवर ‘फ्रेंड्स ऑफ आरएसएस’ व ‘युनिटी अगेंस्ट लेफ्ट’ असे दोन ग्रुप तयार करण्यात आले होते. या ग्रुपच्या माध्यमातून जमाव जमा केला गेला व त्यांना हिंसेला उद्युक्त करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये काही प्राध्यापकही सामील होते व त्यांनीही विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करणारे संदेश टाकले होते’, असे या अहवालात निरीक्षण आहे.


या तथ्य शोधन समितीने जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश कुमार हेच या एकूण हिंसाचारामागचे कर्तेधर्ते (मास्टरमाइंड) असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. ‘२०१६मध्ये जगदीश कुमार यांची जेएनयूच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अत्यंत शिस्तबद्धरित्या उजव्या विचारसरणीच्या काही शिक्षकांना विद्यापीठात नियुक्त केले. त्यातील काहींकडे पर्याप्त ‘मेरिट’ही नव्हते. आपल्या जवळच्यांना त्यांनी बढतीही दिली. एवढेच नव्हे तर विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर त्यांनी अनेक निर्णय जबरदस्तीने लादले. हे निर्णय लादण्याअगोदर विद्यार्थी संघटनांची मते त्यांनी अजमावून घेतली नाहीत. त्यांच्याशी चर्चा केली नाही. निवडणुकांच्या माध्यमातून निवडून आलेल्या विद्यार्थी सदस्य व शिक्षक संघटनांशीही त्यांनी कधी जुळवून घेतले नाही की त्यांच्याशी चर्चा केली नाही, असे या अहवालात आढळून आले आहे.


दि. ५ जानेवारी २०२० रोजी विद्यापीठात हिंसाचार झाल्यानंतर कुलगुरूंनी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. या निवेदनात त्यांनी विद्यापीठात दुपारी ४.३० वाजता पोलिसांना बोलावल्याचे म्हटले आहे पण पोलिसांनी दिलेल्या निवेदनात कुलगुरुंनी पोलिसांना ७.४५ वाजता विद्यापीठात प्रवेश दिल्याचे म्हटले आहे. ही विसंगती या अहवालात नोंदली गेली आहे. अशा अनेक विसंगती ज्या चौकशी समितीला आढळल्या आहेत तशाच त्या तथ्यशोधन समितीलाही आढळून आल्या आहेत.


चौकशी समितीच्या अहवालात विद्यापीठातील सर्व्हरची वीज गेल्याचा एक मुद्दा आहे. दि. ५ जानेवारीला सर्व्हर नादुरुस्त झाला होता पण चौकशी समितीपुढे ही वीज कशी गेली याची कारणे कुलगुरू देऊ शकलेले नाहीत. उलट सर्व्हर नादुरुस्त झाल्याने विद्यापीठातील सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग झाले नाही आणि याचा फायदा बाहेरच्या गुंडांना झाला. त्यामुळे संशयांची आणखी एक सुई कुलगुरूंवर जाते. एवढेच नव्हे तर जेव्हा विद्यापीठात गुंड हिंसाचार करत होते, विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ले करत होते तेव्हा दिल्ली पोलिस शांतपणे हा दंगा, हिंसाचार पाहात होते. अनेक विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या आपात्कालिन क्रमांकावर संपर्क साधला पण त्याला पोलिस कक्षातून प्रतिसाद मिळालेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.


पोलिसांच्या असे संशयास्पद वागण्याचा एक अर्थ असा की, केंद्रीय गृहमंत्रालयही यात सामील होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए व एनआरसीवर विरोध करणार्‍या ‘तुकडे तुकडे गँग’ला धडा शिकवण्यात येईल अशी धमकी जाहीररित्या दिली होती. ती धमकीही या हल्ल्याला उत्तेजन देणारी आहे का, याचीही नोंद या अहवालात घेतली गेली आहे.


समितीच्या सूचना

२७ जानेवारी २०१६ या दिवशी जेएनयूच्या कुलगुरूपदी जगदीश कुमार यांची नियुक्ती झाली होती. या दिवसांपासून आजपर्यंत जगदीश कुमार यांच्या सर्व आर्थिक व प्रशासकीय निर्णयांची चौकशी करणे व त्यांचे ताबडतोब निलंबन करणे अशा सूचना तथ्यशोधन समितीने दिल्या आहेत. त्याचबरोबर जगदीश कुमार व जेएनयू विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था प्रदान करणार्‍या कंपनीवर गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी करावी, त्याचबरोबर हिंसाचारात सामील असणार्‍या काही शिक्षकांचीही चौकशी करावी अशा सूचना समितीने दिल्या आहेत. शिवाय दिल्ली पोलिस आयुक्त व त्यावेळी कर्तव्यावर असलेले जे अधिकारी जेएनयूतील परिस्थिती हाताळू शकले नाहीत त्यांच्याही निलंबनाची मागणी या अहवालात करण्यात आलेली आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमध
‘राजगृह’वरील हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडीओ, आता कायम
नीरव मोदीची ३२९.६६ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई,
ब्राम्हणवादाचा प्रचार करणार्‍या इंदोरीकर महाराजांच्य
‘महाजॉब्स पोर्टल’ सुरू पण, रोजगारासाठी ‘डोमिसाइल’ चिंत
मुस्लीमांना दंगलखोरांकडून निवडून मारले जात होते, दिल्ल
स्थलांतरित कामगारांची दशा: सर्वोच्च न्यायालयाने महाराष
धक्कादायक ! दहा लाख लोकांसाठी फक्त ५०० डॉक्टर, कोरोना काळ
ईव्हीएम असेपर्यंत देशात ईमानदारीने निवडणुका असंभव
पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘र
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद कोर्टात,
..तरीही भाजपाकडून अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे ध
जीव्हिके अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीक
मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नागरिकत्व, राष्ट्रवाद, धर्म
राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही
राजगृहाच्या तोडफोडप्रकरणी वामन मेश्राम यांनी केला निषे
निजामुद्दीन मरकझ: दिल्ली कोर्टाकडून १२२ मलेशियन नागरिक
सरकारी शाळांमधील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या शर्यती
बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालक
‘लॉकडाऊन’चे चटके; अर्थव्यवस्थेचे ३४ हजार कोटींचे नुकसा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper