×

डीएनएबेस एनआरसीच्या मुद्याला डायव्हर्ट करण्यासाठी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तक

Published On :    13 Jan 2020  By : MN Staff
शेयर करा:


‘ब्राम्हीन्स हॅव अ ब्रेन इन द ब्रेन’चा पुन्हा एकदा षड्यंत्रकारी मुखवटा समोर





पुणे: मूलनिवासी वृत्तसंस्था

एनआरसी असावी परंतु डीएनएबेस असा मुद्दा बहुजन क्रांती मोर्चाने लावून धरल्याने ब्राम्हणांची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे डीएनएबेस एनआरसीच्या मुद्याला डायव्हर्ट करण्यासाठी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ अशाप्रकारे पुस्तक लिहून संघ व भाजपा परिवाराचा खटाटोप चालला आहे. परिणामी जय भगवान गोयल यांना पुढे करून ब्राम्हण आपला षड्यंत्रकारी मुखवटा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न आहे अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करताना दिसत आहेत. अशाप्रकारे पुस्तक प्रकाशित करून ‘ब्राम्हीन्स हॅव अ ब्रेन इन द ब्रेन’चा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.


केंद्रातील भाजपा सरकारने आसाममध्ये एनआरसी लागू करून १९ लाख लोकांना बाहेर काढले. या १९ लाख लोकांपैकी ५ लाख मुसलमान सोडले तर १४ लाख एससी, एसटी, ओबीसी आहेत. या १४ लाख एससी, एसटी, ओबीसींना ब्राम्हणांचे गुलाम बनवण्याचे कारस्थान आहे. एनआरसी मुद्दा मुस्लीमविरोधी असल्याचे भासवले जाते. परंतु तसे काही नसून एससी, एसटी, ओबीसीला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. एकदा धार्मिक ध्रुवीकरण झाले की सत्तास्थानी पोहचता येते हा यामागे छुपा अजेंडा आहे.


एनआरसी असावी परंतु डीएनए बेस असा मुद्दा बहुजन क्रांती मोर्चाने लावून धरला आहे. त्यामुळे ‘दूध का दूध पानी का पानी’ होणार आहे. येथील मूलनिवासी बहुजनांनाच विदेशी ठरवण्याचा प्रयत्न त्यामुळे ब्राम्हणांच्या अंगलट येणार आहे. कारण डीएनए बेस एनआरसीच्या बहुजन क्रांती मोर्चाच्या मुद्याला देशभरातून समर्थन मिळत आहे. एससी,?एसटी, ओबीसीच नव्हे मुस्लीम समुदायही एकत्र येताना दिसत आहे. सर्वच मूलनिवासी बहुजन समाज एकत्र आला तर ब्राम्हणी व्यवस्था धोक्यात येईल हे ब्राम्हण ओळखून आहेत. त्यामुळे डीएनए बेस एनआरसीच्या मुद्याला डायव्हर्ट करण्यासाठी नवनवीन संघ व भाजपा परिवाराकडून उपस्थित केले जात आहेत. परिणामी जय भगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे पुस्तक लिहून या मुद्याकडे लक्ष वेधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. याच मुद्यावर चर्चा झाली की डीएनए बेस एनआरसीचा मुद्दा बाजूला पडेल असा त्यांचा होरा आहे. परंतु बहुजन क्रांती मोर्चाने डीएनएचा बेस एनआरसीचा मुद्दा लावून धरल्याने त्या चक्रव्युहात ब्राम्हण अडकला आहे. त्याला त्यातून सुटताच येणार नाही अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


दरम्यान ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तुंग व्यक्तिमत्व असल्याने त्यांची कोणाशीही तुलना केली जाऊ शकत नाही, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी व सामान्य माणसाकडून येऊ लागल्या. राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या तुलनेवर आक्षेप घेत ‘जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही,’ असे ट्विट केले आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी.. असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोयल. ज्यांनी  दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!’ असा संताप व्यक्त केला.


संजय राऊत यांनी नंतर आणखी एक ट्विट करून भाजपमध्ये गेलेल्या संभाजीराजे व उदयनराजेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. या ट्विटमध्ये त्यांनी ‘जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?’ असा खोचक सवाल या दोन नेत्यांना उद्देशून केला आहे.


कॉंग्रेसचे नेते राजीव सातव यांनीही भाजपवर टीका करत ‘भाजपने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केलं ज्यात मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली आहे. ज्या महापुरुषाने आम्हाला आमची ओळख दिली त्यांचा अपमान भाजपने केला. महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. ही तुलना करणं हे बौद्धिक दिवाळखोरीच लक्षण आहे. ह्या प्रवृत्तीचा निषेध.’ असे ट्विट केले आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमध
‘राजगृह’वरील हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडीओ, आता कायम
नीरव मोदीची ३२९.६६ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई,
ब्राम्हणवादाचा प्रचार करणार्‍या इंदोरीकर महाराजांच्य
‘महाजॉब्स पोर्टल’ सुरू पण, रोजगारासाठी ‘डोमिसाइल’ चिंत
मुस्लीमांना दंगलखोरांकडून निवडून मारले जात होते, दिल्ल
स्थलांतरित कामगारांची दशा: सर्वोच्च न्यायालयाने महाराष
धक्कादायक ! दहा लाख लोकांसाठी फक्त ५०० डॉक्टर, कोरोना काळ
ईव्हीएम असेपर्यंत देशात ईमानदारीने निवडणुका असंभव
पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘र
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद कोर्टात,
..तरीही भाजपाकडून अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे ध
जीव्हिके अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीक
मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नागरिकत्व, राष्ट्रवाद, धर्म
राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही
राजगृहाच्या तोडफोडप्रकरणी वामन मेश्राम यांनी केला निषे
निजामुद्दीन मरकझ: दिल्ली कोर्टाकडून १२२ मलेशियन नागरिक
सरकारी शाळांमधील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या शर्यती
बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालक
‘लॉकडाऊन’चे चटके; अर्थव्यवस्थेचे ३४ हजार कोटींचे नुकसा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper