×

आज के शिवाजी’ पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना

Published On :    14 Jan 2020  By : MN Staff
शेयर करा:


शिवसेनेनं भाजपाला फटकारले





मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारं ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात आलं आहे. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी पुस्तक मागे घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल रात्री उशिरा दिली. मात्र यावरुन शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. ‘आज के शिवाजी’ पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना अशा शब्दात शिवसेनेनं भाजपाला फटकारले आहे.


‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन शिवसेनेनं महाराष्ट्र भाजपावर थेट निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढार्‍यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. यावर महाराष्ट्रातील भाजप पुढार्‍यांनीच बोलायचे आहे. ११ कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना प्रधानमंत्री मोदी यांच्याबरोबर करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची वावटळ उठली आहे, त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोर्‍या चमच्याने लिहिले. त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात झाले. महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेला हे अजिबात आवडले नाही. मोदींना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय? याचे उत्तर एका सुरात ‘नाहीनाही!’ असेच आहे. त्यांची तुलना जे शिवाजी महाराजांशी करतात त्यांना छत्रपती शिवाजीराजे समजलेच नाहीत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएए, एनआरसीविरोधात मुस्लीमांसहित शिख, ईसाईदेखील एकवटल
भाजपाचा आयटीसेलप्रमुख असलेल्या ब्राम्हणाला मानहानीची
जागतिक अर्थव्यवस्थेवरही भारतीय मंदीचा परिणाम
‘एनपीआर’लाही केरळचा विरोध
निवडणूक रोख्यांना स्थगिती नाही
भारतात युध्द करण्यासारखी आजची हालत निर्माण करण्यात आली
५० लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार
५० लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार
उत्तराखंडमध्ये उर्दूऐवजी संस्कृतसाठी पायघड्या
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे घाटकोपरमध्ये राष्ट्रीय स
शाहीनबाग : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलनाला
रोजगार अन् बेरोजगारांच्या आत्महत्येत वाढ
देशद्रोहाच्या आरोपाखाली हार्दिक पटेल यांना अटक
लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी देशाची खरी समस्या
सीएए, एनपीआर, एनआरसीविरोधात २९ जानेवारीच्या भारत बंदमध्
भीमा-कोरेगाव दंगलीनंतर बामसेफच्या कार्यक्रमांना काऊंट
प्रधानमंत्री मोदी ऐकत नाहीत, अन्यथा २०१५ मध्ये आपण चीनला
दिवाळखोरीच्या मार्गावर केंद्रातील भाजपा सरकार
माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांना अटक
हे तर चोर! अंथरुणं जप्त करणार्‍या पोलिसांविरोधात महिला आ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper