×

तब्बल नऊ कोटींचा मंडप अन् ६० लाखांचे बॅनर्स

Published On :    14 Jan 2020  By : MN Staff
शेयर करा:


निवडणुकीतील खर्चाची चौकशी होणार, निवडणूक विभागाकडून घोटाळा?





बीड : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात निवडणूक विभागाकडून झालेल्या खर्चाची रक्कम ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणाच्या मंडपाचं बिल दहापटीने वाढलं असून हे बिल तब्बल नऊ कोटी रुपये आहे. तर मतदारांच्या जनजागृती पत्रकांच्या प्रिंटींगचा खर्च ६० लाख रुपये करण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक विभागाकडून झालेल्या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे पत्र अवर सचिव आणि उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिलंय.


ऍड. अजित देशमुख यांनी अवर सचिव शोभा बोरकर यांच्याकडे या संदर्भामध्ये तक्रार केली होती. यावरुन औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीतील प्रशिक्षणासाठी आलेल्या कर्मचार्‍यांसाठी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये जेमतेम दहा ते बारा दिवसाचा मंडप लावण्यात आला होता. त्याचे बिल नऊ कोटी रुपयांच्या घरात गेलं आहे, अशी माहिती अजित देशमुख यांनी दिली आहे.


केवळ मंडपातच नाही तर निवडणुकीदरम्यान जे काही होर्डींग जिल्ह्यामध्ये लावण्यात आले होते. सोबत पॅम्पलेट छापण्यात आले होते, याचाही खर्च ६० लाख रुपये झाला आहे. आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे. आणखी निवडणूक विभागातील खर्चामध्ये कुठे वाढ झाली आहे का? त्याचीही माहिती मागवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.


निवडणूक विभागाकडून घोटाळा?

निवडणुकीदरम्यान कर्माचार्‍यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी मंडप, होर्डींग, पॅम्पलेटसह अनेक साहित्यांची गरज असते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशीही निवडणूक केंद्रांवर अनेक साहित्यांची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक मतदारसंघानुसार विशिष्ट रक्कम दिली जाते. मात्र, बीड जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण, फक्त मंडपाचा खर्च ९ कोटी रुपये झाला आहे. तर, पॅम्पलेटचा खर्च ६० लाख रुपये झाला आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
जागतिक अर्थव्यवस्थेवरही भारतीय मंदीचा परिणाम
‘एनपीआर’लाही केरळचा विरोध
निवडणूक रोख्यांना स्थगिती नाही
भारतात युध्द करण्यासारखी आजची हालत निर्माण करण्यात आली
५० लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार
५० लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार
उत्तराखंडमध्ये उर्दूऐवजी संस्कृतसाठी पायघड्या
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे घाटकोपरमध्ये राष्ट्रीय स
शाहीनबाग : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलनाला
रोजगार अन् बेरोजगारांच्या आत्महत्येत वाढ
देशद्रोहाच्या आरोपाखाली हार्दिक पटेल यांना अटक
लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी देशाची खरी समस्या
सीएए, एनपीआर, एनआरसीविरोधात २९ जानेवारीच्या भारत बंदमध्
भीमा-कोरेगाव दंगलीनंतर बामसेफच्या कार्यक्रमांना काऊंट
प्रधानमंत्री मोदी ऐकत नाहीत, अन्यथा २०१५ मध्ये आपण चीनला
दिवाळखोरीच्या मार्गावर केंद्रातील भाजपा सरकार
माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांना अटक
हे तर चोर! अंथरुणं जप्त करणार्‍या पोलिसांविरोधात महिला आ
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पंजाब विधानसभेत ठराव
कलबुर्गी हत्या प्रकरणात दोन प्रमुख आरोपींना शोधण्यात अ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper