×

मागील वर्षी सफाईदरम्यान ११० कर्मचार्‍यांचा मृत्यू

Published On :    12 Feb 2020  By : MN Staff
शेयर करा:


समाजकल्याण राज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती





नवी दिल्ली: मागील वर्षी गटारे व सांडपाण्याच्या टाक्यांची सफाई करताना सुमारे ११० कर्मचार्‍यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. सफाई कर्मचार्‍यांच्या मृत्यूचा २०१५ नंतरचा हा सर्वांत जास्त आकडा असल्याचेही ते म्हणाले.


२०१५ मध्ये ५७ सफाई कर्मचार्‍यांचा गटारे व सांडपाण्याच्या टाक्या स्वच्छ करताना मृत्यू झाला होता. २०१६ मध्ये ४६, २०१७ मध्ये ९३ आणि २०१८ मध्ये ६८ कर्मचारी हे काम करताना मृत्युमुखी पडले होते, असे आठवले यांनी लेखी उत्तरात नमूद केले. मागील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २१ सफारी कर्मचार्‍यांचा स्वच्छतेदरम्यान मृत्यू झाला, तर त्यापाठोपाठ महाराष्ट्रात १७, गुजरातमध्ये १६ आणि तामिळनाडूमध्ये १५ कर्मचार्‍यांना आपला जीव गमवावा लागला, असेही ते म्हणाले.


२०१९ मध्ये सफाईदरम्यान मृत्यू झालेल्यांपैकी ४४ कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना पूर्ण भरपाई देण्यात आली, तर ६१ जणांच्या कुटुबीयांना अर्धी रक्कम मिळाली. ६ डिसेंबर २०१९ ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान देशभरात हाताने मैला साफ करणार्‍या सुमारे ६२ हजार ९०४ कर्मचार्‍यांची नोंद झाली. विचित्र पद्धतीने बांधण्यात आलेल्या शौचालयांमुळे अशी सफाई करावी लागते, असे आठवले म्हणाले. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत अशी शौचालये शोधून ती सुधारण्यात आल्याचेही यांनी सांगितले. हाताने मैला साफ करण्यास प्रतिबंध करणार्‍या कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना एक वर्षाचा तुरुंगवास किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते, असे आठवले यांनी यावेळी नमूद केले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कपिल मिश्रांनी भडकावला हिंसाचार, जावेद अख्तर यांनी फटका
मालेगाव बॉम्बस्फोट : सहा महिन्यांत केवळ १४ जणांची साक्ष
बिहार विधानसभेत एनआरसीविरोधात प्रस्ताव संमत
स्टार्टअप इंडिया फ्लॉप, ४ वर्षांपासून सतत घट
कपिल मिश्राने लावली घराला आग, आमचा मुलगाही गेला
दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक क
आरएसएस व भाजपाच्या गुंडांनी मशिदीला लावली आग
धार्मिक धु्रवीकरण करणार्‍या सीएएसारख्या कायद्यांना प्
दिल्ली हिंसाचार: ‘तैनात केलेले ते जवान आमचे नाहीत’
‘शाहीन बाग मध्यस्थांच्या अहवालात ‘जर आणि पण’ याचाच अधिक
सतत नोटा हाताळणं आरोग्यासाठी घातक, विद्यार्थ्यांचं संश
ट्रम्पना भारतातील उपासमारी दिसत नाही का?
मतभेद असणे राष्ट्रविरोधी कसे? सरकार नेहमीच बरोबर असते अस
मुलांच्या संगोपनात भारत इराक आणि उत्तर कोरियाच्याही मा
केंद्राने आश्वासने पूर्ण केलीच नाहीत; बीएसएनएल कर्मचार
दिल्ली हिंसा: भाजपा नेता कपिल मिश्राला अटक करण्याची मागण
राज्यातील दीड हजार ग्रामपंचायतीसाठी २९ मार्चला निवडणूक
कोरेगाव भीमा : शरद पवार यांचीही साक्ष नोंदवणार
‘सीएए’च्या निषेधार्थ ‘कफन ओढो’ आंदोलन, २१ दिवसानंतरही प
भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगरची आमदारकी रद्द
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper