×

अर्थव्यवस्थेचे चित्र अधिक गंभीर

Published On :    13 Feb 2020  By : MN Staff
शेयर करा:


अन्नधान्याच्या किमतीमुळे महागाईवाढ; औद्योगिक उत्पादन दर डिसेंबरमध्ये शून्यात





नवी दिल्ली: आधीच सुखावह नसलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे चक्र आणखी मंदावले आहे. वाढत्या अन्नधान्याच्या किमतीने महागाईत इंधन ओतले, तर औद्योगिक उत्पादन गेल्या डिसेंबरअखेर शून्यानजीक आले.


जानेवारी २०२० मधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर थेट ७.५९ टक्क्यांवर झेपावला आहे. हा दर मे २०१४ नंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सहनशील अशा ४ टक्के दराच्या जवळपास दुप्पट हा दर आहे.


निर्मिती क्षेत्राची घसरण कायम असून, डिसेंबर २०१९ मध्ये देशाचा औद्योगिक उत्पादन दर ०.३ टक्क्यांनी घटला.  महागाई दर डिसेंबर २०१९ मध्ये ७.३५ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी तो १.९७ टक्के होता.  वर्षभरापूर्वीच्या २.५ टक्के व आधीच्या महिन्यातील १.८ टक्क्यांच्या तुलनेत यंदाचा औद्योगिक उत्पादन दर घसरती ऊर्जानिर्मिती, भांडवली वस्तुनिर्मितीमुळे शून्यानजीक रेंगाळला आहे. एप्रिल ते डिसेंबर दरम्यानही औद्योगिक उत्पादन दर ०.५ टक्केच राहिला आहे.


औद्योगिक उत्पादन शून्याच्या तळात

 ऊर्जा, वस्तू उत्पादन निर्मितीतील सुमार प्रवासामुळे देशातील औद्योगिक उत्पादन दर पुन्हा एकदा शून्याच्या तळात विसावला आहे. गेल्या वर्षअखेरीस, डिसेंबर २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ०.३ टक्के नोंदला गेला आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये १.८ टक्के उंचावल्यानंतर पुढील महिन्यात औद्योगिक उत्पादन दर पुन्हा एकदा घसरणीकडे झुकला आहे. यापूर्वी ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये तो सलग उणे स्थितीत राहिला होता. वर्षभरापूर्वीच्या, डिसेंबर २०१८ मधील २.५ टक्क्यांच्या तुलनेत यंदा औद्योगिक उत्पादन दर खूपच मागे पडला आहे.


यंदाच्या डिसेंबरमध्ये निर्मिती क्षेत्र १.२ टक्क्यानेच विस्तारले आहे. तर ऊर्जानिर्मिती ०.१ टक्क्याने कमी झाली आहे. चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते डिसेंबरदरम्यान औद्योगिक उत्पादन दर ०.५ टक्के नोंदला गेला आहे. तो वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ४.७ टक्क्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. दिल्लीतील निवडणुका संपताच घरगुती विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत सरकारने बुधवारी मोठी वाढ लागू केली. यानुसार १४.२ किलो वजनाच्या एका एलपीजी सिलिंडरमागे थेट १४४.५० रुपयांची वाढ होऊन त्याची किंमत ८५८.५० रुपये करण्यात आली.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कमाईपेक्षा अधिक द्यावा लागला रिफंड
भारतात १ हजार ४०४ लोकसंख्येमागे केवळ १ डॉक्टर, १.७ नर्सेस
एअर इंडिया जाणार टाटा ग्रुपच्या घशात?
भडकाऊ व समाजात द्वेष पसरवणारे टीव्हीवरील डिबेट्स थांबव
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण
अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश
‘ईडी’चा मोर्चा सुशांतच्या सहकार्‍यांकडे
दहावी-बारावी नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑक्टोबर म
१ हजार कोटींच्या हवाला रॅकेटचे चीन कनेक्शन, आयकर विभागा
१७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भक मृत्यू
आत्मनिर्भरचा वाजला बोर्‍या
‘पीएनबी’ घोटाळ्यात राजेश जिंदाल या ज्येष्ठ अधिकार्‍याल
स्वत: विदेशी असलेल्या मोहन भागवतांनी चीनची उचलून धरली तळ
आता महाराष्ट्र बँकेने बड्या कर्जदारांचे ७ हजार ४०२ कोटी
आश्रम शाळातील विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन शिक्षणाचा खोडा
राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून तीन टप्प्यात देश
नागरिकत्व सिध्द करण्यासाठी आसाममध्ये आता लागणार १९५१ प
सोलापुरी टेक्स्टाईल उद्योगाला ५०० कोटींचा फटका
मराठा आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्यांच्या वारसांना मद
भाजपच्या जवळचे उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स जि
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper