×

१४ लाख अनिवासी भारतीयांवर विशेष लक्ष, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांची माहिती

Published On :    25 Mar 2020  By : MN Staff
शेयर करा:


भारतात अलिकडच्या काळात तब्बल १४ लाख लोक परदेशातून आले आहेत. यातील सर्वाधिक ९० हजार पंजाबमध्ये आहेत. यातील बहुतांश कोरोना बाधित देशांतून आले आहेत. या सर्वांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे अशी, माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.





नवी दिल्ली: जगभरात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दिवसागणिक चिंता वाढत असून, भारतात अलिकडच्या काळात तब्बल १४ लाख लोक परदेशातून आले आहेत. यातील सर्वाधिक ९० हजार पंजाबमध्ये आहेत. यातील बहुतांश कोरोना बाधित देशांतून आले आहेत. या सर्वांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे अशी, माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.


आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी बैठक घेऊन देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी मागील काही दिवसांमध्ये परदेशातून एकूण १४ लाख लोक आल्याची माहिती दिली. या बरोबरच सरकारच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये एकूण ८ हजार लोक दाखल करून घेण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. ही परिस्थिती पाहता ज्या लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.



हे पण वाचा: देश लॉकडाऊनची किंमत ९ लाख कोटी! अर्थतज्ज्ञांचा अंदाज



पंजाब राज्यात या महिन्यात परदेशातून आलेल्यांची संख्या तब्बल ९० हजार असून त्यातील अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. अनेकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असून, आतापर्यंत २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्याची परिस्थिती अधिक चिंताजनक झाली असून २० कोटींचा मुख्यमंत्री मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. तर केंद्राकडे १५० कोटींची मागणी करण्यात आली आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.


पंजाब सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी कडक नियोजन केले आहे. सरकारतर्फे मोठ्या संख्येने आयसोलेशन वार्ड उभारले जात आहेत. केंद्र सरकारकडून पंजाब सरकारला किमान दीडशे कोटींचा अतिरिक्त निधी लागणार आहे. पंजाबमधील बरीचशी मंडळी कॅनडा, अमेरिका, इंग्लंड स्पेन आणि इटलीत स्थायिक आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमध
‘राजगृह’वरील हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडीओ, आता कायम
नीरव मोदीची ३२९.६६ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई,
ब्राम्हणवादाचा प्रचार करणार्‍या इंदोरीकर महाराजांच्य
‘महाजॉब्स पोर्टल’ सुरू पण, रोजगारासाठी ‘डोमिसाइल’ चिंत
मुस्लीमांना दंगलखोरांकडून निवडून मारले जात होते, दिल्ल
स्थलांतरित कामगारांची दशा: सर्वोच्च न्यायालयाने महाराष
धक्कादायक ! दहा लाख लोकांसाठी फक्त ५०० डॉक्टर, कोरोना काळ
ईव्हीएम असेपर्यंत देशात ईमानदारीने निवडणुका असंभव
पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘र
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद कोर्टात,
..तरीही भाजपाकडून अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे ध
जीव्हिके अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीक
मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नागरिकत्व, राष्ट्रवाद, धर्म
राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही
राजगृहाच्या तोडफोडप्रकरणी वामन मेश्राम यांनी केला निषे
निजामुद्दीन मरकझ: दिल्ली कोर्टाकडून १२२ मलेशियन नागरिक
सरकारी शाळांमधील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या शर्यती
बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालक
‘लॉकडाऊन’चे चटके; अर्थव्यवस्थेचे ३४ हजार कोटींचे नुकसा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper