×

कोरोना रूग्णांना वाचवणार्‍या डॉक्टरांना घरे खाली करण्यास घरमालकांचा दबाव, केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार

Published On :    26 Mar 2020  By : MN Staff
शेयर करा:


कोरोना विषाणू संक्रमणाचे आव्हान स्वीकारून शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणार्‍या दिल्लीतल्या डॉक्टर, नर्स व रुग्णालयातील कर्मचार्‍यांना घरे सोडून जावे यासाठी त्यांच्या घरमालकांकडून धमकावले जात असल्याच्या घटना दिसून आल्या आहेत.





नवी दिल्ली:  कोरोना विषाणू संक्रमणाचे आव्हान स्वीकारून शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणार्‍या दिल्लीतल्या डॉक्टर, नर्स व रुग्णालयातील कर्मचार्‍यांना घरे सोडून जावे यासाठी त्यांच्या घरमालकांकडून धमकावले जात असल्याच्या घटना दिसून आल्या आहेत. या प्रकरणी एम्सने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र पाठवून एम्समध्ये काम करणार्‍या व भाड्याने राहात असलेल्या डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना त्यांचे घरमालक घर सोडून जाण्यासाठी त्रास, धमकी व प्रसंगी जबरदस्तीने घर खाली केले जात असल्याची तक्रार केली आहे.


या घटनेमुळे त्रस्त झालेल्या अनेक डॉक्टरांनी मंगळवारी रस्त्यावर निदर्शने केली. त्यांच्या मते रात्री कामावरून परत आल्यानंतर त्यांना इमारतींमध्ये प्रवेशच दिला गेला नाही. काहींना लगेचच घर खाली करण्यास घरमालक सांगत आहेत, तर काहींचे सामान रस्त्यावर दिसून आले. आमच्याकडे रहिवाशी, शेजारी संशयित नजरेने पाहात असून आमच्यामुळे कोरोनाचे संक्रमण पसरत असल्याचा हे लोक, घरमालक दावा करत आहेत, अशी तक्रार अनेक डॉक्टरांची, नर्स व अन्य आरोग्य सेवकांची आहे.


हे पण वाचा:  चीन, इटली नव्हे, तर अमेरिका कोरोनाचे केंद्रबिंदू, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा



मंगळवारी एम्सचे संचालक डॉ. आदर्श प्रताप सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहून या डॉक्टरांची व आरोग्य सेवकांची व्यथा त्यांच्याकडे मांडली आणि घरमालकांना असे आदेश देण्यावाचून सरकारने रोखावे अशी विनंती त्यांनी अमित शहा यांना केली. या पत्राची दखल घेत शहा यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांना डॉक्टरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी व जे लोक आरोग्य सेवकांशी योग्य तर्‍हेने वर्तन करत नसतील त्यांना समज द्यावी असे निर्देश दिले आहेत.


एम्समध्ये दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांशी डॉक्टर, नर्स व अन्य आरोग्य कर्मचार्‍यांचा संपर्क राहत असल्याने त्यांच्याकडून इमारतींमधील अन्य रहिवाशांमध्ये ही साथ पसरू शकते, असे या घरमालकांचे म्हणणे आहे. कोलकात्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एंटेरिक डिसीझ या संस्थेत काम करणार्‍या ३० वर्षाच्या आरोग्य कर्मचारी महिलेला कोरोनाच्या भीतीमुळे घरमालकाने घरातून सामान खाली करण्यास सांगितले होते. त्यावर या संस्थेच्या प्रशासनाने हस्तक्षेप करून घरमालकाला समजावले. गुजरातमध्ये सूरत शहरातील न्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या डॉ. संजीवनी पाणीग्रही यांना त्या राहात असलेल्या बिल्डिंगमधील रहिवाशांच्या रागाला सामोरे जावे लागले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
..अन्यथा थोबाड फोडो आंदोलन
खासदार संभाजीराजेंची तीन पत्रे केराच्या टोपलीत?
५ ते ६ टक्क्यांचा विकासदर गाठण्यासाठी भारतीय अर्थव्यवस
आदिवासी विद्यार्थ्यांवर राज्य सरकारची वक्रदृष्टी
चिपळूण ते मुंबई प्रवासासाठी रुग्णवाहिकेचा दर तब्बल ३५ ह
अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराला पत्
२४ सप्टेंबर १८७३ सत्यशोधक समाजाची स्थापना- राष्ट्रपिता
देशात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार वाढले
सीएए विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची पुन्ह
कोरोना काळात जगभरात गेल्या ५० कोटी नोकर्‍या
वात पेटली आहे त्याचा भडका कधीही होऊ शकतो
गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेणार
विजय मल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करा
मी चिथावणीखोर भाषण दिले नाही
देश आर्थिक दिवाळखोरीकडे मात्र मोदींच्या विदेश दौर्‍याच
मुंबईत डॉक्टर्स ४७ आणि पॅरा मेडिकलची ४३ टक्के पदे रिकामी
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यावर आली मोलमजुरीची वेळ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper