×

कोरोना, चक्रीवादळानंतर आता टोळधाडींचे संकट, मध्य प्रदेशमधील १५ जिल्ह्यांमधील शेतकरी हैराण

Published On :    22 May 2020  By : MN Staff
शेयर करा:


देशामधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच पूर्वेकडील पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना अम्फन चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अशातच महाराष्ट्राच्या शेजारील मध्य प्रदेश राज्यालाही एका नैसर्गिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. बुधवारी संध्याकाळी मध्य प्रदेशच्या पश्‍चिमेकडील १५ जिल्ह्यांमधील अनेक गावांवर टोळधाड पडली.





नवी दिल्ली: देशामधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच पूर्वेकडील पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना अम्फन चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अशातच महाराष्ट्राच्या शेजारील मध्य प्रदेश राज्यालाही एका नैसर्गिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. बुधवारी संध्याकाळी मध्य प्रदेशच्या पश्‍चिमेकडील १५ जिल्ह्यांमधील अनेक गावांवर टोळधाड पडली. मध्य प्रदेशमधील पानबिहार जिल्ह्यातील राणा हेडा गावातील झाडांवर हजारोच्या संख्येने टोळ दिसून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात टोळधाड पडल्याने राजस्थानमध्ये पडलेल्या टोळधाडींच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. या टोळीधाडीसंदर्भातील वृत्त आयएएनएस वृत्तसंस्थेने दिलं आहे.


पानबिहारमधील अनेक गावांमध्ये हजारोंच्या संख्येने टोळ दिसून आले. येथील रणहेरा गावात टोळांची संख्या इतकी होती की सरकारी यंत्रणांनी येथे औषध फवारणी केली.  या टोळांवर नियंत्रण मिळवण्यासाठी १२ स्वेअर किलोमीटरच्या परिसरात औषधांची फवारणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या उपसंचालिका नीलम सिंह यांनी दिली. 


हे टोळ राजस्थानमधून मध्य प्रदेशमध्ये आल्याचे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैन, मंदसौर, नीमच, अगर-मालवा आणि इतर जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांना या टोळधाडींचा फटका बसला आहे. पानबिहारबरोबरच नीमचच्या बाजूने पडलेल्या टोळधाडींमुळे हनुमंतिया, गुर्जर खेडी, खोर, नयागाव, केशरपुरा, कनका, सगराना या ठिकाणी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. याआधी टोळधाड कधीही न पाहिलेल्या शेतकर्‍यांमध्ये या हल्ल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे.


बुधवारी सकाळी शेतांवर मोठ्या संख्येने टोळधाडी पडताना पाहून सुरुवातील शेतकरी गोंधळले. त्यानंतर टोळांना पळवून लावण्यासाठी आणि पिकं वाचवण्यासाठी शेतकर्‍यांनी वेगवेगळ्या गोष्टी वाजवून आवाज करण्यास सुरुवात केली. काहींनी मशाली पेटवून शेतामध्ये धाव घेत पिकं वाचवण्याचा प्रयत्न केला. राजस्थानला लागून असलेल्या मध्य प्रदेशच्या सीमा भागामध्ये टोळांचे नऊ मोठे गट सक्रीय झाल्यची माहिती कृषी विभागाने दिली आहे.


जिरण तहसीलमधील बरखेडा गुर्जर, अर्निया बोराणा, सकराणी जागीर, धौकखेडा, कुचाडौड या गावांमध्येही टोळांनी मोठ्या संख्येने शेतमालाची नासधूस केली. मल्हागडमधून या टोळांनी मध्य प्रदेशमध्ये शिरण्यास सुरुवात केली. 


पाहता पाहता काही तासांमध्ये  भाऊसाखेडा, निनोरा, खोखरा, अमरपुरा गावांमध्ये हे टोळ पोहोचले. येथील शेतकर्‍यांनी ढोल, डीजे वाजवून या टोळांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. नंतर या टोळांनी सोनी, खोख्रा, निनोरा, चांदवासा अशा अनेक गावामध्ये नुकसान केलं. बुधवारी रात्री हे टोळ मुल्तानपुरा, गुरडिया देडा येथील शेतांमध्ये दिसून आले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
लॉकडाऊनदरम्यान तोडले बुध्दस्तूप, साकेत मुक्तीसाठी बुध्
बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या साकेत मुक्ती आंदोलनाल
न्यायालयानेही केली गुजरात सरकारची खुशमस्करी
पुन्हा एकदा गॅस सिलेेंडरच्या महागाईचा भडका, भाजपा सरकार
राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला अन् नियमावली केली प्रसिद्
अत्यावश्यक सेवेशिवाय विमाने चालवणार नाही, एअर इंडियाच्
सीएम रिलीफ फंडमध्ये जमा झाले ३४२ कोटी तर कोरोनावर २५ टक्
मुले व महिलांची उपासमार करून भारत स्वावलंबी बनवू शकतो? ज
तेव्हा सरकार तरले ते आता काय कोसळणार? संजय राऊतांचा फडणव
पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी महागणार, सामान्य नागरिक महाग
शंभर कंपन्या स्थापन करून काळा पैसा ‘पांढरा’ करण्याचे कप
जय श्री राम न बोलल्यास ठार मारू, युवकाला धमकावल्याबद्दल
पीएम केअर फंड पब्लिक अथॉरिटी नसल्याने माहिती देऊ शकत ना
ठग ब्राम्हणांची बँक खाती गोठवली, ३ कोटी ९६ लाखांपेक्षा
कोरोनाच्या कोरोनाच्या रुग्णांचे आकडे लपवून मला लोकांना
बेरोजगारीला कंटाळून यूपीमधील एका व्यक्तीची रेल्वेखाली
अमित शहांना झाली तबलीगी मरकजची कावीळ, पुन्हा एकदा ओकली ग
महाराष्ट्रात सरकारी कर्मचार्‍यांसाठी थर्मल स्क्रिनिं
कोरोनावरुन गुजरात सरकारवर ताशेरे ओढणार्‍या उच्च न्याया
लॉकडाऊनचे नियम मोडल्याने भिडे यांच्याविरोधात FIR, सांगली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper