×

राम मंदिराच्या बांधकामासाठी खोदाई करताना सापडले बुध्दकालीन अवशेष

Published On :    22 May 2020  By : MN Staff
शेयर करा:


अयोध्या रामजन्मभूमी असल्याचा दावा खोटा, ब्राम्हण पुन्हा एकदा तोंडावर आपटले





नवी दिल्ली: भारतातील प्रत्येक संसाधनांवर आक्रमण करत येथील सिंधु सभ्यता नष्ट करून ब्राम्हणी संस्कृती मारून मुटकून रूजवण्याचा ब्राम्हणांचा आटापिटा आजही सुरू आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी खोदाई करताना बुध्दकालीन अवशेष सापडले आहेत. त्यामुळे ब्राम्हण पुन्हा एकदा तोंडावर आपटले असून अयोध्या रामजन्मभूमी असल्याचा त्यांचा दावा खोटा ठरला आहे.


उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या येथे राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी या परिसरात सपाटीकरण त्याचबरोबर खोदाईचे काम सुरू आहे. ही खोदाई करताना मंदिराच्या संबंधित अवशेष मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु हा दावा सर्रास खोटा असल्याचे समोर येत आहे. जे अवशेष मिळाले आहेत त्याचा मंदिराशी काहीच संबंध नाही. रामाचे मंदिर ज्याठिकाणी बांधण्यात येत आहे त्या परिसरात मिळालेले असशेष राम मंदिराचे नसून तथागत बुध्दांच्या संबधित आहेत. मशीद-मंदिर विवादित जमीन क्षेत्रात पाच फुटाचे शिवलिंग, तुटलेल्या मूर्ती, खांब सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.


राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने पडदा टाकला होता. त्यावर निर्णय देण्यासंबंधी स्थगिती देण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या एकतर्फी निकालानंतर राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.  या परिसरात ११ मे पासून सपाटीकरणाचे काम सुरू आहे. दि. ९ नोव्हेंबर २०१९ ला तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय देताना राम मंदिर न्यासाला झुकते माप दिले. २.७७ एकर जमीन रामलल्लाला द्या असे सांगितले. या निर्णयानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त करत एकतर्फी निर्णय दिल्याचे म्हटले. 


सर्वोच्च न्यायालयाने ब्राम्हणांच्या भल्यासाठी निर्णय दिला असला तरी या परिसरात रामाचे कुठलेही अवशेष सापडत नाहीत तर तथागत बुध्दांच्या संबंधित अवशेष सापडत आहेत. त्यामुळे या परिसरात रामाचा जन्म झाला हा ब्राम्हणांचा दावा पूर्णत: खोटा ठरत आहे. राम जन्मभूमी आहे तर तेथे रामाचे अवशेेष का सापडत नाहीत याचा अर्थच हे सारे खोटे आहे. एवढेच कशाला राम जन्मभूमी ट्रस्ट बनवला त्या ट्रस्टच्या १५ सदस्यांपैकी १ एससी, ८ ब्राम्हण स्थायी व ६ अस्थायी सदस्य आहेत.

ब्राम्हणांच्या बाजूने निर्णय दिल्याने गोगोई राज्यसभेवर
अयोध्या परिसर हा रामजन्मभूमी असल्याचा एकतर्फी निकाल देत रंजन गोगोई यांनी पुरातत्वीय इतिहासाच मागोवा घेतला नाही. केवळ ब्राम्हणांना खुश करण्यासाठीच त्यांनी आपले निर्णय दिले. मग तो राम मंदिर-मशीद वाद, तिहेरी तलाक, काश्मिर कलम-३७० या विषयावर सारे निर्णय ब्राम्हणांना अनुकूल असणारे दिले. याचा विचार करून अखेर राज्सभेचा खासदार म्हणून गोगोई यांना बक्षीस देण्यात आले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
लॉकडाऊनदरम्यान तोडले बुध्दस्तूप, साकेत मुक्तीसाठी बुध्
बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या साकेत मुक्ती आंदोलनाल
न्यायालयानेही केली गुजरात सरकारची खुशमस्करी
पुन्हा एकदा गॅस सिलेेंडरच्या महागाईचा भडका, भाजपा सरकार
राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला अन् नियमावली केली प्रसिद्
अत्यावश्यक सेवेशिवाय विमाने चालवणार नाही, एअर इंडियाच्
सीएम रिलीफ फंडमध्ये जमा झाले ३४२ कोटी तर कोरोनावर २५ टक्
मुले व महिलांची उपासमार करून भारत स्वावलंबी बनवू शकतो? ज
तेव्हा सरकार तरले ते आता काय कोसळणार? संजय राऊतांचा फडणव
पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी महागणार, सामान्य नागरिक महाग
शंभर कंपन्या स्थापन करून काळा पैसा ‘पांढरा’ करण्याचे कप
जय श्री राम न बोलल्यास ठार मारू, युवकाला धमकावल्याबद्दल
पीएम केअर फंड पब्लिक अथॉरिटी नसल्याने माहिती देऊ शकत ना
ठग ब्राम्हणांची बँक खाती गोठवली, ३ कोटी ९६ लाखांपेक्षा
कोरोनाच्या कोरोनाच्या रुग्णांचे आकडे लपवून मला लोकांना
बेरोजगारीला कंटाळून यूपीमधील एका व्यक्तीची रेल्वेखाली
अमित शहांना झाली तबलीगी मरकजची कावीळ, पुन्हा एकदा ओकली ग
महाराष्ट्रात सरकारी कर्मचार्‍यांसाठी थर्मल स्क्रिनिं
कोरोनावरुन गुजरात सरकारवर ताशेरे ओढणार्‍या उच्च न्याया
लॉकडाऊनचे नियम मोडल्याने भिडे यांच्याविरोधात FIR, सांगली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper