×

देशात वैद्यकीय उपकरणासंबंधित उत्पादनांची बोंबाबोंब

Published On :    25 Jun 2020  By : MN Staff
शेयर करा:


पीएम केअर्स फंडअंतर्गत ६ टक्के व्हेंटिलेटरचे उत्पादन-एक अहवाल





नवी दिल्ली: केंद्रातील भाजपा सरकार सर्व आघाडीवर फेल होताना दिसत आहे. मग ती देशाची अथवा लोकांची सुरक्षा असो. या सरकारला केवळ आरएसएसचा अजेंडा कसा राबवायचा याचीच चिंता जास्त आहे. या चिंतेने ग्रासल्याने दिवसेंदिवस आरएसएसचाच अजेंडा राबवला जात आहे. पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून ५० हजार स्वदेशी व्हेंटिलेटरचे बनवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. परंतु आतापर्यंत केवळ ६ टक्के व्हेंटिलेटर बनवण्यात आले आहेत. ही बाब देशातील वैद्यकीय उपकरणासंबंधित उत्पादनांची बोंबाबोंब असल्याचे दर्शवते.


इंडियन एक्सप्रेसच्या अनुसार मंगळवारी प्रधानमंत्री कार्यालयामार्फत एक विधान जारी करण्यात आले होते की, पीएम केअर्स फंडाच्या माध्यमातून ५० हजार स्वदेशी व्हेंटिलेटर बनवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. परंतु आतापर्यंत केवळ २ हजार ९२३ व्हेंटिलेटर म्हणजेच ६ टक्के बनवण्यात आले आहेत. 


त्यामधील १ हजार ३४० व्हेंटिलेटर प्रथम राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात पाठवण्यात आले आहेत. ज्या राज्यांमध्ये हे व्हेंटिलेटर पाठवण्यात आले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र २७५, दिल्ली २७५, गुजरात १७५, बिहार १००, कर्नाटक ९०, राजस्थान ७५ अशा राज्यांचा समावेश आहे.जून २०२० च्या अखेरिस अतिरिक्त १४ हजार व्हेंटिलेटर सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात पाठवले जातील.


अहवालाचा हवाला देऊन सांगण्यात आले आहे की, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत,  उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाचे सचिव गुरूप्रसाद मोहपात्रा, रक्षा अनुसंधान व विकास संघटनेचे चेअरमन डॉ.सतीश रेड्डी यांनी देशातील वैद्यकीय उपकरणासंबंधित उत्पादनांच्या कमतरतेबाबत ११ जूनला सरकार आणि उद्योग जगतातील संभाषणादरम्यान आवाज उठवला होता. 


या कार्यक्रमात प्रधान वैज्ञानिक सल्लागार डी.विजयराघवन यांनीही भाग घेतला होता. अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ई-कॉन्फरन्समध्ये वरिष्ठ अधिकारी, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय उपकरणांचे उत्पादकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.


कॉन्फरन्समध्ये व्हेंटिलेटर मिळत नसल्याचा मुद्दा उठवण्यात आला होता. उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नसल्याने व्हेंटिलेटर पोहचवण्यास उशीर लागत आहे असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले होते. ११ जूनला झालेल्या बैठकीदरम्यान मोहपात्रा म्हणाले होते की, मागणी वाढत असल्याने केंद्रातील भाजपा सरकारने चार भारतीय व्हेंटिलेटर उत्पादक कपन्यांना ६० हजार व्हेंटिलेटर बनवण्याची ऑर्डर दिली होती. परंतु त्यांचे पार्ट उपलब्ध न झाल्याने व्हेंटिलेटर पाठवण्यास उशीर झाला. 


पार्ट विदेशातून आयात करावे लागतात. उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाच्या अधिकार्‍यांनी एसी-डीसी कंवर्टर, फिल्टर, थर्मो इलेक्ट्रीक डिव्हाईस, प्रेशर पंप, सेंसर्स, ऑप्टिकल एनकोडर, ऑक्सिजन सेंसर्स, फ्लो सेंसर्स, सबटेंस वॉल्व असे पार्ट खरेदीसाठी भारतीय उत्पादकांना काय समस्या आहेत यावर चर्चा करण्यात आली. 


अमिताभ कांत म्हणाले, व्हेंटिलेटरचे काही पार्ट भारतात बनवले जात नाहीत. ते बाहेरून आयात करावे लागतात. त्यामुळे उत्पादन आणि पुरवठा यामध्ये उशिर लागतो असे सांगत त्यांनी कानावर हात ठेवले. यावरून भाजपा सरकारला वैद्यकीय उपकरणांबाबत गांभीर्य आहे का? असा सवाल उपस्थित होतो. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चीनच्या न्यूज ऍपवर बंदीसाठी इंडियन न्यूज पेपर सोसायटीच
किती दिवस धान्य पुरवणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प ब
कोकणात तुटपुंजी मदत, अनेक खेडी अंधारात
अर्थव्यवस्थेच्या चक्राने घेतला वेग
तबलीगी जमातीबाबत केंद्र सरकारचा दुराग्रह, कोरोना पसरवल
वीज दरवाढीमुळेच घरगुती ग्राहकांची बिले फुगली
मोदींचे निकटवर्तीय उद्योगपती अदानींचा चीनी कंपनीशी व्य
जनतेत संभ्रम निर्माण केल्यास पतंजलीवर कारवाई
मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत सरकारची अपुरी तयारी, मरा
इंदुरीकर महाराज हाजीर हो, ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्या
एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची आश्‍वासनांवरच
सरकारी शाळांवरील आरोप कशासाठी ?
शाळा सुरू, शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच; अ
शाळांच्या फी माफीसाठी आठ राज्यातील पालक एकवटले, सर्वोच
मुस्लिम फोटोग्राफर नको, शिवसेनेच्या माजी आमदाराच्या भू
चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये
केंद्रातील भाजपा सरकारचा खासगीकरणाचा सपाटा
मुंबई विमानतळ विकासात घोटाळा
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अवस्था बिकट
सरकारी कर्मचार्‍यांचा पगार करणं कठीण, येऊ शकते कर्ज काढण
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper