×

कॉंग्रेसने नव्हे तर छत्रपती शाहू महाराजांनी चालवले घुमंतू जनजातीच्या मुक्तीचे आंदोलन

Published On :    28 Jun 2020  By : MN Staff
शेयर करा:


राष्ट्रीय जनजाती घुमंतू मोर्चाचे राष्ट्रीय सहसंयोजक अनिलकुमार माने यांचे प्रतिपादन

पुणे: कॉंग्रेस, गांधी आणि नेहरूने मुक्त केले नसून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घुमंतू जनजातीच्या मुक्तीचे आंदोलन चालवले अशा शब्दात राष्ट्रीय जनजाती घुमंतू मोर्चाचे राष्ट्रीय सहसंयोजक अनिलकुमार माने यांनी प्रतिपादन केले. घुमंतू जनजातींसाठी छत्रपती शाहू महाराजांचे योगदान या विषयावर ते एमएनटीव्हीशी बोलत होते.


यावेळी माने यांनी छत्रपती शाहू महाराजांचे घुमंतू जनजातीसाठी किती आणि कसे योगदान आहे याचे विविध दाखले देत कॉंग्रेस व भाजपाचा बुरखा टराटरा फाडला. भारतात १२ कोटींच्या आसपास घुमतूं जनजातीची लोकसंख्या आहे. इंग्रजांच्या अगोदर येथील जंगल, जमीन, जल यावर ब्राम्हणांनी कब्जा केला. देशात जमीनदारी पध्दत ब्राम्हणांनी रूजवली.परंतु इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी ब्रिटीश कायदे लागू केले. त्यावेळी १९८ गुन्हेगारी जाती असल्याची यादी देण्यात आली होती. 


१८७१ मध्ये क्रिमीनल ट्राईब ऍक्ट लागू झाला. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी केली. सर्वप्रथम फुलेंनी घुमंतू जनजातीला संघटित करण्याचे काम केलेे. सत्यशोधक समाजात तात्यासाहेब रोडे हे रामोशी जातीचे प्रमुख पदाधिकारी होते. सावित्रीबाई रोडे या सत्यशोधक समाजाच्या सचिव होत्या. नेतृत्व विकास करण्याचे धोरण सत्यशोधक समाजाने आखले होते. त्यानंतर कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घुमंतू जनजातींना संघटित केले. त्यांना संघटित करून एक वेगळा आयाम दिला. कॉंग्रेसने दलाल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस-गांधी-नेहरूने घुमंतू जनजातींना मुक्त केले नाही तर छत्रपती शाहू महाराजांनी मुक्क्तीचे आंदोलन चालवले. ब्राम्हणांनी हा इतिहास दाबून  ठेवला होता तो आम्ही समोर आणत आहोत. 


घुमंतू जनजाती गुन्हेगार का? याचे अध्ययन कोल्हापूर संस्थानात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केले. त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. परिणामांवर चर्चा न करता कारणांवर चर्चा केली. जल, जंगल, जमीनीपासून वंचित करण्यात आले होते. जगण्याचे कुठलेही साधन-संसाधन नव्हते.  घुमंतू जनजातीला संघटित करायला हवे असे शाहू महाराजांच्या मनात आले. शाहू महाराजांनी योजना आखली. सप्टेंबर १९०८ मध्ये कोरवी जातीसमूहाला जमीनीचे वाटप केले. त्यांना वेगवेगळी कामे दिली. राधानगरी धरण याच घुमंतू जनजातीच्या घामातून उभे राहिले आहे. कोरवी, कैकाडी यांनाही जमीनी दिल्या. त्यांना स्थिरस्थावर होऊ दिले. केवळ जमीन देऊन थांबले नाहीत तर त्यांना रोजगार दिला. शिक्षण दिले. त्यांना सन्मानाने वागणूक देऊन गुन्हेगारीपासून परावृत्त केले. शाहू महाराजही घुमंतू जनजातीला हिंदू मानत नव्हते. त्यांना खरा इतिहास माहित होता. घुमंतू जनजाती हिंदू कसे? त्यांनी सिध्द करावे असे आव्हान माने यांनी मोहन भागवत यांना दिले.


ते म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी घुमंतू जनजातीत माणुसकी रूजवली. वडार जातीसमूहाला जमीन देण्याचे आदेश दिले. शिक्षणाचा अधिकार दिला. शिक्षण कम्पलसरी असेल. उपाशीपोटी शिक्षण घेता येत नाही म्हणून त्यांना रोजगार दिला. परंतु आजचे सरकार काय करत आहे तर घुमंतू जनजातीसाठी फंड ठेवत नाही. त्यांना देशोधडीला लावण्याचे काम आजच्या सरकारने केले आहे. एलपीजीच्या माध्यमातून सारे समाप्त करण्यात आले आहे. घुमंतू जनजातीकडे आज रोजगार, जमीन नाही. शिक्षण नाही. याला सरकारची धोरणे कारणीभूत आहेत अशी टीका माने यांनी केली.


१६ नोव्हेंबर १९१२ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी फासेपारधी समाजासाठी घरबांधणी करण्याचा आदेश दिला. शाहू महाराजांनी त्यांना घरेही बांधून दिली. परंतु त्यांनी घरासमोरच झोपड्या उभारल्या. कारण ही मानसिकता ब्राम्हणी धर्माने थोपवली आहे. घुमंतू जनजातीने एका जागेवर स्थिरस्थावर राहता कामा नये असे मनुस्मृतीत लिहले आहे. आजही घुमंतू जनजाती एकाच जागेवर स्थिर नाही. म्हणजेच मनुस्मृती आजही जीवंत आहे. 


घुमंतू जनजातीला शाहू महाराजांनी भिंती बांधणे आणि पाडणे असे काम दिले. यावरून ब्राम्हणांनी त्यांना ट्रोल केले. छत्रपत्री शाहू महाराज सरकारी खजाना उडवत आहेत असा आरोप ब्राम्हणांनी केला. परंतु शाहू महाराज ऐकले नाहीत. म्हणजे घुमंतू जनजातीने मिळून-मिसळून काम करायला हवे असे त्यांनी कृतीतून दाखवून दिले होते. आज घुमंतू जनजातीच्या संदर्भात ब्राम्हणांनी चर्चा करायला हवी, आम्ही त्यांना निश्‍चितच धडा शिकवू असे माने यांनी इशारा दिला.


१० जुलै, १९१५ रोजी २०० एकर पारधी यांच्यासाठी शाहू महाराजांनी जमीन दिली. तेथे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सोडवला. आंबेजोगाई परिसरातही जमीन देण्यात आली होती. ती जमीन पारधी यांच्यासाठीच राखीव असल्याचा निर्णय न्यायालयाने देऊनही त्यांना तेथून हुसकावून लावण्याचे काम निंबाळकर याने केले. ३ पारध्यांची हत्या करण्यात आली. आजही घुमंतू जनजातींना गाव, शहरात बसू देत नाहीत.  जाती व्यवस्थेत त्यांनाही बंदिस्त करण्यात आले. 


ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेत घुमंतू जनजातीचा एकही प्रतिनिधी नाही. सर्व प्रकारच्या व्यवस्थेतून बाहेर फेकण्यात आले. घुमंतू जनजाती या ब्राम्हणांच्याविरोधात आहेत. म्हणून त्यांचे आजही ब्राम्हणीकरण झालेले नाही. कारण या मार्शल रेस आहेत. या घुमंतू जनजातीने आवाज उठवला तर ब्राम्हणी व्यवस्था धोक्यात येऊ शकते. एवढी ताकद त्यांच्यात आहे. कॉंग्रेसने रेणके आयोगाचे गाजर दाखवले. रेणके आयोग लागू केला का? असा सवाल करत बामसेफने याबाबत पुण्यात कार्यक्रम लावून लोकांना जागृत केले असे माने यांनी सांगितले.


विश्‍वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी संविधान लिहत होते त्यावेळी  त्यांनी घुमंतू जनजातीची राज्यानुसार यादी मागितली होती. परंतु त्यावेळी यादी देण्यात आली नाही. त्यामुळे आजही घुमंतू जनजातीला चाचपडत रहावे लागले आहे. शाहू महाराजांनी पारधी समुदायाला जमीन देऊन त्यांची वसाहत निर्माण केली. घुमंतू जनजातीत जागृती निर्माण करावी लागणार आहे. 


कारण दिवसेंदिवस मॉब लिंचिंगच्या घटनाही वाढीस लागल्या आहेत.  मग ते मानवत येथील हत्याकांड, नागपूर येथील हत्याकांड, राईनपाडा, पालघरमधील नाथपंथी डवरी गोसावींची हत्या झाली. ज्यांचे कुठलेही संघटन होत नाही त्यांना मारले जाते. म्हणून संघटित पध्दतीने लढावे लागेल. संघटित शक्तीवर हल्ला होत नाही. राष्ट्रीय घुमंतू जनजाती मोर्चाने मामला संपणार नाही. त्यासाठी नेतृत्व निर्माण करायला हवे. उद्दीष्ट साध्य करण्यासाठी झोकून देऊन काम करावे लागेल. 


शाहू महाराजांनी १९ फेब्रुवारी १९१६ मध्ये गुन्हेगारी जनजातीसाठी परिपत्रक काढले. त्यावेळी एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी बंदी होती. परंतु परिपत्रक काढल्याने त्यांना एका राज्यातून दुसर्‍या राज्यात परवानगी मिळाली. कोणी अडवले तर कायदेशीर कारवाई करण्याचा दमही शाहू महाराजांनी भरला होता. म्हणजे त्यांनी मुक्त संचाराला वाव दिला होता. शिकार करणारेही लोक होते. त्यांच्यासाठी वनविभागाला पत्र पाठवून वनविभागात हे लोक आले तर त्यांना अटक करू नये असे बजावले होते. त्यांयाजवळ चित्तेही आहेत अशी भीती दाखवण्यात आली होती. कोल्हापूर संस्थानात शाहू महराजांनी घुमंतू जनजातीला संघटित केले असे माने यांनी स्पष्ट केले.


शाहू महाराजांनी घुमंतू जनजातीसाठी फार मोठे काम केले. मोठमोठ्या हुद्यावर पोहचवले. ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी गुणवत्ता सिध्द होते. परंतु आज संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, मीडियाचा कार्यक्रम हा पूर्वग्रही आहे. त्यामुळे न्याय मिळत नाही. शाहू महाराजांनी जातीची ओळख मिटवून टाकण्यासाठी घुमंतू जनजातीतील लोकांना आडनावे दिली. पवार, जाधव, भोसले, माने ही आडनावे शाहू महाराजांनी दिली आहेत. ब्राम्हणांनी दिलेली नाहीत. 


जातीत भेदभाव राहू नये म्हणून त्यांनी धनगर-मराठा असा विवाह लावून दिला. जातीविरोधी चळवळ शाहू महाराजांनी राबवली. १९१७ मध्ये शाहू महाराजांनी लॉर्ड वेलिंग्टन यांना पत्र लिहून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला पाहिजे अशी मागणी केली. जसे त्यावेळी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यात आली होती तशीच आजही आम्हांलाही स्वतंत्र मतदारसंघ हवा अशी मागणी आम्ही करत आहोत. त्यासाठी राष्ट्रीय घुमंतू मोर्चा काम करणार आहे.


२२ जुलै १९१८ रोजी क्रिमीनल ट्राईब हजेरी माफ करण्यात आली. हजेरी बंद करण्याचा शाहू महाराजांचा निर्णय होता. २१, २२ मार्च रोजी झालेली माणगाव परिषद ही बहुजन समाजाची परिषद होती. त्याचे अध्यक्षस्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवले होते. दरम्यान आजही घुमंतू जनजातीला बहिष्कृत केले जात आहे. 


किमान शाहू महाराजांचा दृष्टीकोन लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय या विविध क्षेत्रातून घुमंतू जनजातीला बेदखल करण्यात आले आहे. म्हणून या बेदखल लोकांना संघटित करणार आहोत. आम्हांला संधी मिळाल्यास सरकारची जमीन ही घुमंतू जनजातीसाठी देण्यात येईल. त्याचबरोबर ऍट्रोसिटी ऍक्टही करण्यात येईल असे माने यांनी शेवटी सांगितले.PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चीनच्या न्यूज ऍपवर बंदीसाठी इंडियन न्यूज पेपर सोसायटीच
किती दिवस धान्य पुरवणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प ब
कोकणात तुटपुंजी मदत, अनेक खेडी अंधारात
अर्थव्यवस्थेच्या चक्राने घेतला वेग
तबलीगी जमातीबाबत केंद्र सरकारचा दुराग्रह, कोरोना पसरवल
वीज दरवाढीमुळेच घरगुती ग्राहकांची बिले फुगली
मोदींचे निकटवर्तीय उद्योगपती अदानींचा चीनी कंपनीशी व्य
जनतेत संभ्रम निर्माण केल्यास पतंजलीवर कारवाई
मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत सरकारची अपुरी तयारी, मरा
इंदुरीकर महाराज हाजीर हो, ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्या
एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची आश्‍वासनांवरच
सरकारी शाळांवरील आरोप कशासाठी ?
शाळा सुरू, शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच; अ
शाळांच्या फी माफीसाठी आठ राज्यातील पालक एकवटले, सर्वोच
मुस्लिम फोटोग्राफर नको, शिवसेनेच्या माजी आमदाराच्या भू
चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये
केंद्रातील भाजपा सरकारचा खासगीकरणाचा सपाटा
मुंबई विमानतळ विकासात घोटाळा
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अवस्था बिकट
सरकारी कर्मचार्‍यांचा पगार करणं कठीण, येऊ शकते कर्ज काढण
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper