×

एलएसीवरून संघाने सरकारच्या निर्णयात खुपसले नाक

Published On :    29 Jun 2020  By : MN Staff
शेयर करा:


भारत-चीन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर उठाठेव, संघ व भाजपाची तातडीची बैठक





नवी दिल्ली: भारत-चीन दरम्यान एलएसीवरून तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर संघाने सरकारच्या निर्णयात नाक खुपसले आहे. याबाबत संघ व भाजपाची तातडीची बैठक घेण्याची उठाठेव केली आहे. चीनच्या मुद्यावर संघ सरकारला मदत करणार असल्याचा कांगावा करण्यात आला आहे. मात्र या बैठकीचा इन्कार करण्यात आला आहे. अशा प्रकारे संघाची घटनाबाह्य शक्ती निर्माण करूणे हे घातक असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करत नाही अशा प्रकारचा संघाकडून ढोल बडवला जातो तो ढोल आता फुटला असल्याचे समोर आले आहे.


भारत-चीन या दोन देशांमध्ये एलएसीवरून तणाव निर्माण झाला आहे. या मुद्यावर संघ सक्रीय झाला आहे. त्यामुळे मागच्या आठवड्यात संघ आणि भाजपा नेत्यांमध्ये ताबडतोड बैठक झाली. चीनच्या विस्तारवादी नीतीविरोधात सामाजिक दबाव बनवण्यासाठी संघ केंद्र सरकारला मदत करण्यार असल्याचा कांगावा करण्यात आला आहे.


हे पण वाचा: श्रमिक ट्रेनमध्ये मृत झालेल्या मजुरांचा आकडा केवळ शंभर कसा काय?


इकॉनॉमिक टाईम्सच्या अनुसार ही बैठक लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या माजी निवासस्थानी झाली. परंतु या बैठकीचा संघ व भाजपा इन्कार करत आहे. संघ नेता भैय्याजी जोशी यांचा हा सर्वसाधारण दौरा होता असे तकलादू कारण भाजपा नेत्यांनी दिले. संघ व भाजपा नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रीय संघटन महासचिव बीएल संतोष सहभागी झाले होते.या बैठकीत देशाची सरहद्द, आंतरिक विषय, सांस्कृतिक विषयावर चर्चा झाली. चीनला वेगळे पाडण्यासाठी सामाजिक दबाव निर्माण करण्यात येणार असून त्यादिशेने काम सुरू असल्याचे संघाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.


संघाचा तो वरिष्ठ नेता म्हणाला की, याची सुरूवात भारतापासून होईल. आम्ही ऑस्ट्रेलिया, जपानसमवेत देशांशी सामरिक भागीदारी करत आहोत. मालदीव, श्रीलंका किंवा नेपाळ आणि अगदी मुस्लिम देशांच्या इस्लामिक कॉन्फरन्स ऑर्गनायझेशन या संघटनाही आपल्या विरोधात कशा काम करत आहेत असे स्पष्ट करण्यात आले.  या संदर्भात सरकार योग्य दिशेने वाटचाल करत आहे.


सरकारच्या निर्णयात संघाचा हस्तक्षेप कसा काय?

केंद्रात एक सरकार असेल. त्या सरकारचे नेतृत्व प्रधानमंत्री करतील. प्रधानमंत्री लोकसभेला व लोकांच्या प्रश्‍नांना उत्तर देण्यास बांधील असतील. परंतु ते कुठल्याही संघटनेला उत्तर देण्यास बांधील नाहीत. त्याचबरोबर कुठलीही संघटना सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्या निर्णयात संघाचा हस्तक्षेप वाढला आहे. २०१४ मध्ये प्रथमत: निवडून आल्यानंतर दुसर्‍या वर्षी नरेंद्र मोदींनी मोहन भागवत यांच्यासमोर लोटांगण घालून सार्‍या मंत्रीमंडळाची बैठक घेतली होती. आता पुन्हा एकदा एलएसी मुद्यावरून सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करत संघाने नाक खुपसले आहे. हे सारे घटनाविरोधी आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयात संघाचा हस्तक्षेप कसा काय? असा सवाल विचारला जात आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चीनच्या न्यूज ऍपवर बंदीसाठी इंडियन न्यूज पेपर सोसायटीच
किती दिवस धान्य पुरवणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प ब
कोकणात तुटपुंजी मदत, अनेक खेडी अंधारात
अर्थव्यवस्थेच्या चक्राने घेतला वेग
तबलीगी जमातीबाबत केंद्र सरकारचा दुराग्रह, कोरोना पसरवल
वीज दरवाढीमुळेच घरगुती ग्राहकांची बिले फुगली
मोदींचे निकटवर्तीय उद्योगपती अदानींचा चीनी कंपनीशी व्य
जनतेत संभ्रम निर्माण केल्यास पतंजलीवर कारवाई
मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत सरकारची अपुरी तयारी, मरा
इंदुरीकर महाराज हाजीर हो, ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्या
शाळा सुरू, शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच; अ
शाळांच्या फी माफीसाठी आठ राज्यातील पालक एकवटले, सर्वोच
मुस्लिम फोटोग्राफर नको, शिवसेनेच्या माजी आमदाराच्या भू
चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये
केंद्रातील भाजपा सरकारचा खासगीकरणाचा सपाटा
मुंबई विमानतळ विकासात घोटाळा
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अवस्था बिकट
सरकारी कर्मचार्‍यांचा पगार करणं कठीण, येऊ शकते कर्ज काढण
मानसिक गुलामी आणि लाचारी
तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ऍपवर बंदी घालतोय, काय पोर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper