×

धनगर व मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचा भाजपचा छुपा अजेंडा, माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप

Published On :    29 Jun 2020  By : MN Staff
शेयर करा:


धनगर समाजातील काही तरुणांना हाताशी धरून आणि शरद पवारांच्या जातीचा उल्लेख करून धनगर समाजाला मराठा समाजाविरोधात भडकविण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. हा छुपा अजेंडा राबवण्याचे काम शाखा-शाखांमधून कुजबुज आंदोलनाद्वारे सुरू आहे असा घणाघाती आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.





धुळे: धनगर समाजातील काही तरुणांना हाताशी धरून आणि शरद पवारांच्या जातीचा उल्लेख करून धनगर समाजाला मराठा समाजाविरोधात भडकविण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. हा छुपा अजेंडा राबवण्याचे काम शाखा-शाखांमधून कुजबुज आंदोलनाद्वारे सुरू आहे असा घणाघाती आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.


भाजपचा धनगर समाजातील नवा चेहरा असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पवारांनी छोट्या समूहांना राजकारणासाठी वापरून घेतले. पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेले करोना आहेत, असं पडळकर म्हणाले होते. 


हे पण वाचा: एलएसीवरून संघाने सरकारच्या निर्णयात खुपसले नाक



पडळकरांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रक काढून पडळकर व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. भाजपनंही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या टीकेचा प्रतिवाद केला. त्यानंतर गोटे यांनी पुन्हा एकदा पत्रक काढून भाजप जाती-जातींमध्ये भांडणं लावत असल्याचा आरोप केला आहे.


नरेंद्र मोदी व अमित शहा जोडीनं कोरोनाचा आधार घेऊन हिंदू-मुस्लिम समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे मतांच्या गाठोड्याची बांधाबांध सुरू केली आहे. तर, राज्यातील भाजप नेते पडळकरांच्या नथीतून मराठा समाजावर तीर चालवत आहेत. धनगरांना चिथावणी देत आहेत असा आरोप गोटे यांनी केला आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चीनच्या न्यूज ऍपवर बंदीसाठी इंडियन न्यूज पेपर सोसायटीच
किती दिवस धान्य पुरवणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प ब
कोकणात तुटपुंजी मदत, अनेक खेडी अंधारात
अर्थव्यवस्थेच्या चक्राने घेतला वेग
तबलीगी जमातीबाबत केंद्र सरकारचा दुराग्रह, कोरोना पसरवल
वीज दरवाढीमुळेच घरगुती ग्राहकांची बिले फुगली
मोदींचे निकटवर्तीय उद्योगपती अदानींचा चीनी कंपनीशी व्य
जनतेत संभ्रम निर्माण केल्यास पतंजलीवर कारवाई
मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत सरकारची अपुरी तयारी, मरा
इंदुरीकर महाराज हाजीर हो, ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्या
शाळा सुरू, शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच; अ
शाळांच्या फी माफीसाठी आठ राज्यातील पालक एकवटले, सर्वोच
मुस्लिम फोटोग्राफर नको, शिवसेनेच्या माजी आमदाराच्या भू
चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये
केंद्रातील भाजपा सरकारचा खासगीकरणाचा सपाटा
मुंबई विमानतळ विकासात घोटाळा
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अवस्था बिकट
सरकारी कर्मचार्‍यांचा पगार करणं कठीण, येऊ शकते कर्ज काढण
मानसिक गुलामी आणि लाचारी
तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ऍपवर बंदी घालतोय, काय पोर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper