×

कोहिनूर हिरा भारतात आणण्यासाठी काय केले?

Published On :    5 Jun 2018  By : MN Staff
शेयर करा:


कोहिनूर हिरा आणण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली, असा सवाल केंद्रीय माहिती आयोगाने प्रधानमंत्री कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला विचारला आहे.





नवी दिल्ली: कोहिनूर हिरा आणण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली, असा सवाल केंद्रीय माहिती आयोगाने प्रधानमंत्री कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला विचारला आहे. 


याशिवाय महाराजा रणजीत सिंह यांचे सोन्याचे सिंहासन, शाहजहानचा मद्यपानाचा ग्लास आणि टिपू सुलतानची तलवार यांच्यासारख्या प्राचीन वस्तू भारतात आणण्यासाठी नेमके काय प्रयत्न करण्यात आले, असा प्रश्‍नदेखील केंद्रीय माहिती आयोगाने उपस्थित केला आहे. 


कोहिनूर हिरा भारतीय लोककथेचा भाग समजला जातो. या हिर्‍यासह अनेक मौल्यवान वस्तू इंग्रज भारतातून मायदेशी घेऊन गेले होते. या वस्तूंसोबतच इतरही अनेक वस्तू भारताबाहेर नेण्यात आल्या. 


सध्या या वस्तू जगभरातील संग्रहालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंबद्दलची माहिती मिळवण्यासाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने प्रधानमंत्री कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज केला होता. मात्र त्या व्यक्तीचा अर्ज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे (एएसआय) पाठवण्यात आला. 


या वस्तू भारतात आणण्याचे प्रयत्न करणे आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही असे उत्तर पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या माहिती अधिकार कार्यकर्त्याला दिले.


माहिती अधिकार कार्यकर्ते बी. के. एस. आर. अय्यंगार यांनी कोहिनूर हिर्‍यासह अनेक मौल्यवान वस्तूंची माहिती सरकारकडे मागितली होती. 


सुलतानगंज बुद्धा, टिपू सुलतान यांची तलवार, महाराजा रणजीत सिंह यांचे सोन्याचे सिंहासन, शाहजहान मद्यपान करण्यासाठी वापरत असलेला ग्लास या वस्तू भारतात आणण्यासाठी सरकारने कोणते प्रयत्न केले, असा प्रश्‍न अय्यंगार यांनी माहिती अधिकारातून उपस्थित केला होता.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य
लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली?
शरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार
एससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही
भगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही !
११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत
टीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड
संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी
मराठवाड्यावर गडद दुष्काळछाया !
भाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खू
योजनांच्या दिरंगाईने रेल्वेला आर्थिक फटका
पुणे ‘एटीएस’चा सातार्‍यात छापा
भरत कुरणे, वाघमारेसह सर्व संशयितांना‘कोका’
धनगर आरक्षणासाठी चक्का जाम
भोजन पुरविणार्‍या पुरवठादारांचे पैसे देऊ नका
धनगर समाजाचा आरक्षणासाठी रास्ता रोको
एकत्र निवडणुकांसाठी भाजपची आक्रमक भूमिका
सनातन संस्था, भिडेंना राजाश्रय
...तर भारतीयांचे आयुर्मान चार वर्षांनी वाढेल
२०१९ मध्ये ईव्हीएम मशीन फोडणारच
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper