×

प्रश्‍न सुटतोय असे दिसले की भाजपवाले आंदोलन करायला निघतात

Published On :    31 Jul 2020  By : MN Staff
शेयर करा:


राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची टीका





अहमदनगर: दूध प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारची दोन ते तीन वेळा मीटिंग झाली आहे. राज्य सरकार याबाबत लवकरच धोरण ठरवणार आहे. पण जेव्हा एखादा विषय मार्गी लागण्याच्या टप्प्यात असतो, तेव्हा भाजप त्या विषयावर आंदोलन करते, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांनी पुकारलेल्या दूध आंदोलनावर केली. दुधाचा विषय मांडत आहात, तर केंद्र सरकारने जी पंधरा हजार टन दूध पावडर मागितली आहे, त्याचाही मुद्दा मांडा, असा टोलाही त्यांनी लगावला.


आज नगरच्या जिल्हा रुग्णालयात रोहित पवार यांनी भेट देत करोना अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी भाजपने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. एखादा विषय मार्गी लावण्याच्या स्तरावर असेल तेव्हा भाजप आंदोलन करत असते. ही भाजपची सवय आहे. भाजपचे जे नेते महाराष्ट्रात आंदोलन करतात ते केंद्र सरकार दहा ते पंधरा हजार टन दूध पावडर आणत आहे, त्याबद्दल केव्हा आंदोलन करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 


जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात तेव्हा तुम्ही शांत बसता, असे सांगतानाच सोयीचे राजकारण भाजपाचे नेत्यांकडून होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकारच्या बाबतीत भाजपने काळजी करू नये. राज्य सरकार हे लोकांच्या हिताचे सरकार असून ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोदींची स्तुती करणार्‍या बबिता फोगटवर सरकार मेहरबान
मेक इन इंडियाची व्याख्याच बदलावी लागेल
वैदिक धर्म मानणारे अन्य धर्मांवर करतायेत अतिक्रमण
संशोधन, रिसर्च,आणि मूलभूत शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओ
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांचं जगणं मुश्कील
सरन्यायाधीशांवरची टीका ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान क
मराठा आरक्षणाकडे महाआघाडी सरकारचे दुर्लक्ष, संघटनांचा
विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतरही काश्मीरातील परिस्थ
मुंबईतील उद्योग लवकरच सुरू करणार
‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा
बोगस धान व्यापार्‍यांची चौकशी करून शेतकर्‍यांची लूटमार
चिनी घुसखोरीची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर
धर्म आणि मंदिरं टीकवण्यासाठी हिंदूंकडे सत्ता असणे गरजे
फडणवीस सरकारची बळीराजा चेतना योजना ठाकरे सरकारने केली र
नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी मिळताचा शिक्षणाच्या ब्राह्म
विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब, सर्वोच्च न्याय
कॉंग्रेसद्वारा राम मंदिर उभारणीचे जाहीरपणे समर्थन
प्रशांत भूषण यांनी माफी मागावी किंवा स्पष्टीकरण द्यावे
भाजप आमदाराचा सुटला तोल, मतदाराशी बोलताना केली शिविगाळ
दहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच, विद्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper