×

निळ्या आकाशातील चमकता लाल तारा

Published On :    1 Aug 2020  By : MN Staff
शेयर करा:


भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या लढाईत त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वाटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या.





भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या लढाईत त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वाटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णाभाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली. शाहीर अमर शेख,शाहीर गव्हाणकर हे देखील त्यांच्या सोबत असत. लोकगायनातून लोकप्रबोधन करीत असताना त्यांनी त्यांच्या अनुभव लिहायला सुरुवात केली. अजरामर साहित्य निर्माण झाले. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना देशभर प्रसिद्धी मिळत गेली.असंघटीत समाजाला आपल्या शाहिरीतून जागृत करणारा लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णभाऊ साठे म्हणजे निळ्या आकाशातील चमकता लाल तारा होता .


मुंबईत अण्णांच्या आयुष्याला १९४५ साली कलाटणी मिळाली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्‍या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली.या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची आवड असल्यामुळे त्यांना लेखन करायला खूप मेहनत करण्याची गरज पडली नाही. अण्णांभाऊचे लिखाण नेहमी कष्टकरी कामगार मजूर डोळ्यासमोर ठेऊन होत होते.त्यातील नायक हा अन्याय अत्याचाराविरोध लढणार आणि जातिव्यवस्थे विरोधी बंड करून उठणाराच होता. त्याच्या प्रत्येक कथा,कांदबर्‍या,वगनाट्यचा नायक हा सर्व सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळे लोकांच्या,वाचकांच्या गळ्यातील ताईत बनत होता.


भारत देश स्वतंत्र झाल्याच्या १९५० ते १९६२ साल म्हणजे अण्णभाऊंच्या साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत गेले. मुंबई सरकारने तमाशावरही बंदी आली. त्यामुळे तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागला. अण्णांभाऊनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ ,फकिरा अशा अनेक कादंबर्‍या लिहिल्या. ३५ कादंबर्‍या लिहल्या, त्यात ८ कांदबरीवर चित्रपट निर्माण झाले ते तुफान लोकप्रिय झाले. १२ च्यावर कथासंग्रह लिहले त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक साहित्यावर अण्णाभाऊंचे प्रभुत्व होते. अण्णाभाऊंच्या साहित्याचे हिंदी,गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी अनेक भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती.


अण्णाभाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या मागासवर्गीय-शोषितांच्या वस्तीत चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खर्‍या अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कार्यकर्ते आर.बी. मोरे, के.एम. साळवी, शंकर नारायण पगारे यांच्यासोबत ते काम करू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला होता. अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी विचारापासून मातंग समाज लांब आहे. शेवटी अण्णाभाऊंनी भीमराव( बाबासाहेब )सांगितला पण त्यांच्या समाजाने आजही तो स्वीकारला नाही. ज्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची चळवळ उभी केली पाहिजे होती त्याने समाजाचे शोषण करणारी फळी उभी केली आणि समाजाला विकलांग बनविले. मातंग समाजाच्या तरुणांना आकर्षित केले. समाजाचा विकास व कल्याण करण्यासाठी असलेल्या महामंडळाचा राजकीय अड्डा बनविला.अण्णाभाऊ साठेंचा वैचारिक वारसा सांगणारा तरुण घडविण्याऐवजी राष्ट्रवादी मातंग कार्यकर्ता घडला.त्यामुळे आज सर्वच पक्षात मातंग आघाडी निर्माण झाली. तेच नेते समाजाला आंबेडकरी चळवळीपासुन चार हात लांब राहण्याचा सतत मार्ग दाखवितात. स्वतःच्या जाती पुरते वेगळे आरक्षण मागतात त्याकरिता आता आंदोलन तीव्र करून ते कोणाविरोधात कोणासाठी लढतात हाच मोठा प्रश्न त्यांच्या व इतर समाजासमोर आहे. त्यामुळे खेड्या पाड्यातील मातंग समाज शोषण मुक्त झाला नाही. गावांत किंवा शहरातील आण्णाभाऊ साठे नगरातील तरुण शिक्षण,आरोग्य आणि रोजगार यापासुन वंचित आहे.तो मोठ्या प्रमाणात देव,देवी,मरीआईच्या चक्रात अडकलेला असून अज्ञान अंधश्रद्धा यातून तो मुक्त नाही.


पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर नसून असंघटीत कष्टकरी कामगारांच्या तळ हातावर तरली आहे. हे आण्णाभाऊ साठे यांनी छातीठोकपणे सांगितले,लिहिले आणि गायिले. हे त्यांचा समाजच आजही मान्य करीत नाही. म्हणुन अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याचा अधिकार तो समाज गमावून बसला. त्यांच्या विचारांची जयंती जोपर्यंत होत नाही तो प्रर्यंतत मातंग समाजाचा शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक विकास होणार नाही.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम !

सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोदींची स्तुती करणार्‍या बबिता फोगटवर सरकार मेहरबान
मेक इन इंडियाची व्याख्याच बदलावी लागेल
वैदिक धर्म मानणारे अन्य धर्मांवर करतायेत अतिक्रमण
संशोधन, रिसर्च,आणि मूलभूत शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओ
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांचं जगणं मुश्कील
सरन्यायाधीशांवरची टीका ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान क
मराठा आरक्षणाकडे महाआघाडी सरकारचे दुर्लक्ष, संघटनांचा
विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतरही काश्मीरातील परिस्थ
मुंबईतील उद्योग लवकरच सुरू करणार
‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा
बोगस धान व्यापार्‍यांची चौकशी करून शेतकर्‍यांची लूटमार
चिनी घुसखोरीची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर
धर्म आणि मंदिरं टीकवण्यासाठी हिंदूंकडे सत्ता असणे गरजे
फडणवीस सरकारची बळीराजा चेतना योजना ठाकरे सरकारने केली र
नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी मिळताचा शिक्षणाच्या ब्राह्म
विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब, सर्वोच्च न्याय
कॉंग्रेसद्वारा राम मंदिर उभारणीचे जाहीरपणे समर्थन
प्रशांत भूषण यांनी माफी मागावी किंवा स्पष्टीकरण द्यावे
भाजप आमदाराचा सुटला तोल, मतदाराशी बोलताना केली शिविगाळ
दहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच, विद्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper