×

पोलिसांसमोरच कथित गो-रक्षकांकडून मुस्लीम तरुणाला हातोड्याने बेदम मारहाण

Published On :    1 Aug 2020  By : MN Staff
शेयर करा:


गुरूग्राममधील धक्कादायक प्रकार





गुरूग्राम : बकरी ईदच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. दिल्लीनजिक गुरुग्राममध्ये शुक्रवारी पोलिसांसमोरच कथित गोरक्षकांकडून एका मांस विक्रेत्या मुस्लीम तरूणाला हातोडीने बेदम मारहाण करण्यात आली. शुक्रवारी घडलेली ही घटना व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समोर आली. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली. मारहाण करण्यात आलेला २५ वर्षांचा तरुण हा मेवातच्या लुकमानचा रहिवासी आहे. तो मांस विक्रीचा व्यवसाय करतो. पोलिसांच्या उपस्थितीत त्याला मारहाण कशी झाली? असा प्रश्न उपस्थितीत करत अनेकांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.


हे पण वाचा: खासगी रेल्वे ऑपरेटर्स कितीही भाडे आकारू शकतात



जखमी लुकमाननं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.०० वाजता सेक्टर ४-५ मधल्या चौकात तो पोहचला होता. त्याच्या पिकअप व्हॅनमध्ये म्हशीचे मांस भरलेले होते. याचवेळी पाच दुचाकींवरून आलेल्या काही तरुणांनी त्याला रोखले. ते जवळपास ८-१० लोक असतील. त्यांनी आरडा-ओरडा करत प्रथम गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हेतू लक्षात आल्यानंतर मी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, गुंडांनी सदर बाजारात गाठले आणि गाडीतून खेचून बाहेर काढले, अशी माहिती लुकमानने दिली. 


गुंडांच्या हातात असलेल्या हातोडीने लुकमानवर वार करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, ही मारहाण सुरू असताना काही पोलिसही घटनास्थळी उपस्थित झाले होते परंतु, त्यांनी लुकमानला वाचवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही बघ्याची भूमिका घेतली.


मारहाणीनंतर गुंडांनी लुकमानला गाडीत टाकून सोहनाकडे नेले. पोलिसांच्या एका टीमने ट्रकचा पाठलाग करून लुकमानची सुटका केली. यावेळी, आरोपींनी पोलिसांवरही हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी लुकमानला रुग्णालयात दाखल केले. त्याच्या गाडीतील मांस जप्त करून फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. लुकमानच्या शरीरावर हातोडीने हल्ला केल्यामुळे त्याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोदींची स्तुती करणार्‍या बबिता फोगटवर सरकार मेहरबान
मेक इन इंडियाची व्याख्याच बदलावी लागेल
वैदिक धर्म मानणारे अन्य धर्मांवर करतायेत अतिक्रमण
संशोधन, रिसर्च,आणि मूलभूत शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओ
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांचं जगणं मुश्कील
सरन्यायाधीशांवरची टीका ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान क
मराठा आरक्षणाकडे महाआघाडी सरकारचे दुर्लक्ष, संघटनांचा
विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतरही काश्मीरातील परिस्थ
मुंबईतील उद्योग लवकरच सुरू करणार
‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा
बोगस धान व्यापार्‍यांची चौकशी करून शेतकर्‍यांची लूटमार
चिनी घुसखोरीची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर
धर्म आणि मंदिरं टीकवण्यासाठी हिंदूंकडे सत्ता असणे गरजे
फडणवीस सरकारची बळीराजा चेतना योजना ठाकरे सरकारने केली र
नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी मिळताचा शिक्षणाच्या ब्राह्म
विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब, सर्वोच्च न्याय
कॉंग्रेसद्वारा राम मंदिर उभारणीचे जाहीरपणे समर्थन
प्रशांत भूषण यांनी माफी मागावी किंवा स्पष्टीकरण द्यावे
भाजप आमदाराचा सुटला तोल, मतदाराशी बोलताना केली शिविगाळ
दहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच, विद्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper