×

मराठा आरक्षण प्रकरणाचे राज्यसभेत पडसाद

Published On :    15 Sep 2020  By : MN Staff
शेयर करा:


खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार राजीव सातव यांनी उपस्थित केला प्रश्‍न





नवी दिल्ली: मराठा आरक्षणाबाबतचे पडसाद आज राज्यसभेत दिसून आले. कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांनी ‘झिरो तासां’च्या प्रश्‍नोत्तरात मराठा आरक्षणबाबत नोटीस दिली.  सातव यांनी या नोटीशीद्वारे मराठा समाजाच्या आरक्षणावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले. तसेच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रश्‍न उपस्थित केला.


मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी राज्यसभेत करण्यात आली. तसेच मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र वटहुकूम काढावा, अशीही मागणी छत्रपती संभाजीराजे आणि राजीव सातव यांनी राज्यसभेत केली. त्यावेळी मराठा आरक्षण प्रकरणाचे राज्यसभेत पडसाद उमटल्याचे दिसून आले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. हा निर्णय घेतल्याने मराठा समाजाच्या भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीवरुन आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.


मराठा आरक्षण प्रश्‍नावरुन संसदेत चर्चा करण्यात यावी यासाठी राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी चर्चेची नोटीस दिली. त्याचवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सभागृहात शून्य प्रहरात चर्चा करण्यात यावी अशी मागणी राजीव सातव आणि छत्रपती संभाजीराजे यांनी केली.


सरकारी नोकर्‍या आणि शैक्षिणक प्रवेशात मराठा आरक्षम देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१८ मध्ये बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यालयाने बुधारी स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा  लभा मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, नव्याने शिक्षण प्रवेश घेणारे आणि नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे मराठा समाज अधिक आक्रमक झाला आहे. कोल्हापूर येथे दि. २३ सप्टेंबरला राज्यस्तरीय गोलमेज परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत निर्णय घेण्यात येणार आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेणार
विजय मल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करा
मी चिथावणीखोर भाषण दिले नाही
देश आर्थिक दिवाळखोरीकडे मात्र मोदींच्या विदेश दौर्‍याच
मुंबईत डॉक्टर्स ४७ आणि पॅरा मेडिकलची ४३ टक्के पदे रिकामी
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यावर आली मोलमजुरीची वेळ
कॉंग्रेस-भाजपा सरकारच्या कालखंडात शेतकर्‍यांची दुर्दश
एम. एम. कलबुर्गींच्या हत्येचे उलगडले कोडे
देशाच्या संपत्तीचे मूल्यांकन करून मित्रांना विकण्याची
कोरोना फैलावण्याचे खापर पुन्हा एकदा तबलींगींवर फोडले
आसाममधील ८६ हजारांपेक्षा अधिक नागरिक विदेशी म्हणून घोष
देशाच्या बँकिंग क्षेत्राला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज
नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतक
देशात गरीबांची माहिती ठेवण्याचे काम नीती आयोगाचे
शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस
मराठा आरक्षण : अध्यादेश काढायचा की नाही किंवा दुसरा मार्
आइस्क्रीम बनवणार्‍या कंपनीने ९ बँकांना घातला १ हजार ४००
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रक्रियेतून स्त्री स
आरक्षणासाठी आता धनगर समाजाचा एल्गार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper