×

कॉंग्रेस-आरएसएसच्या गुप्त समझोत्यामुळेच ईव्हीएम घोटाळ्यावर कॉंग्रेसची चुप्पी

Published On :    15 Sep 2020  By : MN Staff
शेयर करा:


सेकंड लिडरशीपने ईव्हीएमचा मुद्दा उठवूनही कॉंग्रेसच्या शिर्ष नेतृत्वाने ब्र देखील काढले नाही





नवी दिल्ली:  कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल केले आहेत. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय समितीत युवकांना संधी दिली आहे. २३ सेंकड लीडरशीपने पक्षात युवा नेतृत्वाला संधी द्यावी अशा प्रकारचे पत्र लिहले होते याचा तो परिणाम आहे. या पत्रात एकूण १० मुद्दे होते. त्या मुद्यांवर ब्राम्हण-बनिया प्रसार माध्यमांनी चर्चा केली, परंतु जो महत्वपूर्ण मुद्दा आहे त्या ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात चर्चा झालेली नाही. सेकंड लिडरशीपने ईव्हीएमचा मुद्दा उठवूनही कॉंग्रेसच्या शिर्ष नेतृत्वाने ब्र देखील काढलेला नाही. कारण कॉंग्रेस-आरएसएसच्या गुप्त समझोत्यामुळेच ईव्हीएम घोटाळ्यावर कॉंग्रेसने चुप्पी साधली आहे.


कॉंग्रेसच्या २३ नेत्यांनी पत्र लिहले आहे त्यामध्ये गुलाम नबी आझाद अग्रणी आहेत. त्यांनीच या विषयाला वाचा फोडली. नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी कॉंग्रेसकडे मजबूत नेतृत्व नाही असा पहिला मुद्दा होता. नेतृत्व तयार करण्याचे काम करावे लागेल. हे २३ नेते राहुल गांधी यांना पर्याय मानत नाहीत. दुसरा मुद्दा देशातील तमाम राजनितीक आणि गैर राजनितीक संघटना व जनमत असे मानत आहे की, ईव्हीएममध्ये घोटाळा करून भाजपा सत्तेवर आली आहे. तर कॉंगेस ईव्हीएमला विरोध का करत नाही? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


गांधी-नेहरू परिवाराशिवाय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनु.जाती, जनजाती किंवा अल्पसंख्यांक वर्गाकडे कॉंग्रेसचे नेतृत्व द्यायला हवे. कॉंग्रेसने असे केले नाही तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला वाईट पध्दतीने पराभवाला सामोरे जावे लागेल. लोकांचा कॉंग्रेसवर जो विश्‍वास आहे, तो समाप्त होऊन जाईल. जिल्हा आणि तहसील स्तरावरील कार्यकर्त्यांचे मनोबल हरले आहे, त्यांच्यासाठी गांधी-नेहरू परिवाराने जनसंपर्क करायला हवे, त्यांनी फिल्डवर रहायला हवे. कॉंग्रेसला पुन्हा एकदा जनाधार मिळवायचा असेल तर अनु.जाती, मुस्लीम अन्य छोट्या जातींची लढाई कॉंग्रेसने लढायला हवी. आता भाजपा ज्याप्रकारे सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करत आहे, त्याचा दोष कॉंग्रेसवरही येत आहे. त्यासाठी शेतीपूरक उद्योगासाठी कॉंग्रेसने काम काम करायला हवे. भाजपावर दबाव टाकायला हवे. खासगीकरणाला विरोध करायला हवे. आणखी तीन मुद्दे आहेत, ते कॉंग्रेसच्या अंतर्गत मुद्दे आहेत. त्या मुद्यांचा समाजाशी काहीच संबंध नाही.


प्रसार माध्यमे आणि कॉंग्रेसने ईव्हीएमचा मुद्दा लोकांपासून का लपवून ठेवला? असा पहिला प्रश्‍न आहे. त्यांनी असे पहिल्यांदाच असे केले? प्रसार माध्यमे व कॉंग्रेसने हे पहिल्यांदाच केलेले नाही. तर अनेकदा असे केले आहे. २००९ लोकसभा निवडणूक निकाल आल्यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी ईव्हीएमवर प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळीही कॉंग्रेस ईव्हीएमवर बोलली नाही. सुब्रमण्यम स्वामी यांनी ईव्हीएमच्या विरोधात ज्यावेळी खटला दाखल केला त्यावेळी ८ ऑक्टोबर, २०१३ रोजी महत्वपूर्ण निर्णय दिला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमबरोबर व्हीव्हीपॅट मशीन लावली पाहिजे. या निर्णयावरही कॉंग्रेसने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. तर प्रसार माध्यमांनीही काही वाच्यता केली नाही. हा एवढा महत्वपूर्ण निर्णय होता की, प्रसारमाध्यमांनी लेख, संपादकीय, कव्हर स्टोरी बनवायला हवी होती. प्राईम टाईम डिबेट करायला हवे होते. परंतु कुठल्याही प्रसार माध्यमांनी यावर आवाज उठवला नाही. अन्य न्यूज चॅनेलपेक्षा स्वत:ला वेगळे दाखवणारा एनडीटीव्ही देखील या मुद्यावर काहीच बोललेला नाही. २०१३ च्या निर्णयावर आज २०२० पर्यंत ७ वर्षात कुठल्याही मीडिया हाऊसने यावर चर्चा केलेली नाही.


असेच काम कॉंग्रेस आणि मीडियावाले आजदेखील करत आहेत. कॉंग्रेसच्या ज्या २३ नेत्यांनी १० मुद्यांवर पत्र लिहले त्यामध्ये ईव्हीएमचा मुद्दा दोन नंबरवर आहे. परंतु कॉंग्रेसच्या शिर्ष नेतृत्वासह मीडियानेदेखील यावर चुप्पी साधली आहे. ईव्हीएमच्या मुद्यावर कॉंग्रेस व मीडिया गप्प का? तर त्याचे दोन उत्तर आहेत. पहिले उत्तर कॉंग्रेसला धरून आहे.  २००४ आणि २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने घोटाळा करून निवडणूक जिंकली. ज्यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांच्या समर्थनात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यावेळी कॉंग्रेसने आरएसएससोबत गुप्त समझोता करत २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत घोटाळा करून निवडणूक जिंका. आम्ही त्याबाबत बोलणार नाही. म्हणजेच कॉंग्रेसच्या ईव्हीएम घोटाळ्याबाबत संघ परिवार तर भाजपाच्या ईव्हीएम घोटाळ्याबाबत कॉंग्रेस गप्प बसेल. आपल्या नेत्यांनी ईव्हीएमबाबत लिहून देऊनही कॉंग्रेसचे शीर्ष नेतृत्व गप्प राहण्यामागे हेच कारण आहे.


आता मीडिया यावर का बोलत नाही? तर मीडियावर ब्राम्हण-बनियांचा कब्जा आहे. ते असे मुद्दे उठवतात की, व्यवस्थेसाठी फायद्याचे आहेत. जसे सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या, कंगना राणावत हिची चर्चा, परंतु शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबाबत ते गप्प आहेत. देशात धार्मिक माहोल निर्माण करणे त्यांचे काम असते. त्याचा फायदा कॉंग्रेस, भाजपा व कम्युनिस्टांना होतो. तर दुसर्‍या बाजूला स्वत:ला सेक्युलर समजणारे एनडीटीव्ही बेरोजगारी, आत्महत्यांबाबत बोलेल, मात्र त्याची मूळ असलेल्या ईव्हीएमबाबत बोलत नाही. आज देशातील २३ विरोधी पक्षातील नेत्यांनी आवाज उठवूनही ईव्हीएमबाबत एनडीटीव्ही बोलत नाही. कारण तेदेखील व्यवस्थेला वाचवण्याचे काम करत आहेत.


कॉंग्रेस वर्कींग कमिटीने प्रेस क्लब ऑफ इंडियाला पत्र लिहले आहे की, वर्तमान मीडिया पक्षाच्या अंतर्गत बाबींवर चुकीच्या पध्दतीने भाष्य करत आहे. आमच्या अंतर्गत एकात्मता भंग करत आहे. जो प्रेस ऍक्टचे उल्लंघन आहे.  वर्तमान ब्राम्हणी मीडिया २३ नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर न बोलता दुसर्‍याच मुद्यांवर चर्चा करत आहे. कॉंग्रेस ईव्हीमच्या मुद्याला बगल देत आहे. सत्ताधारी भाजपा, विरोधी पक्ष कॉंग्रेस व मीडिया ईव्हीएम घोटाळ्यावर लोकांना माहिती देण्याऐवजी त्यापासून पळ काढत आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेणार
विजय मल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करा
मी चिथावणीखोर भाषण दिले नाही
देश आर्थिक दिवाळखोरीकडे मात्र मोदींच्या विदेश दौर्‍याच
मुंबईत डॉक्टर्स ४७ आणि पॅरा मेडिकलची ४३ टक्के पदे रिकामी
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यावर आली मोलमजुरीची वेळ
कॉंग्रेस-भाजपा सरकारच्या कालखंडात शेतकर्‍यांची दुर्दश
एम. एम. कलबुर्गींच्या हत्येचे उलगडले कोडे
देशाच्या संपत्तीचे मूल्यांकन करून मित्रांना विकण्याची
कोरोना फैलावण्याचे खापर पुन्हा एकदा तबलींगींवर फोडले
आसाममधील ८६ हजारांपेक्षा अधिक नागरिक विदेशी म्हणून घोष
देशाच्या बँकिंग क्षेत्राला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज
नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतक
देशात गरीबांची माहिती ठेवण्याचे काम नीती आयोगाचे
शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस
मराठा आरक्षण : अध्यादेश काढायचा की नाही किंवा दुसरा मार्
आइस्क्रीम बनवणार्‍या कंपनीने ९ बँकांना घातला १ हजार ४००
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रक्रियेतून स्त्री स
आरक्षणासाठी आता धनगर समाजाचा एल्गार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper