×

भारतीय अर्थव्यवस्थेत होईल नऊ टक्के कपात

Published On :    16 Sep 2020  By : MN Staff
शेयर करा:


आशियाई बॅँकेची भीती





नवी दिल्ली : कोरोनाच्या फटक्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात नऊ टक्क्यांनी कमी होण्याची भीती आशियाई विकास बॅँकेने व्यक्त केली आहे. चार वर्षांत प्रथमच भारतीय अर्थव्यवस्था घसरणार असून, पुढील वर्षात तिच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


आशियाई विकास बॅँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ यासुयुकी सावडा यांनी भारतासह आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेबाबतचा अहवालात त्यांनी ही माहिती दिली आहे.भारतामध्ये मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका भारताला मोठ्या प्रमाणात बसला असून, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ९ टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


लॉकडाऊनमुळे भारताच्या खासगी क्षेत्रातील खर्च पूर्णपणे थांबला होता. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. जसजसे उद्योग सुरू झाले तशा प्रमाणात अर्थव्यवस्था वेग घेऊ लागली. जूनमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ४ टक्के घसरण्याची शक्यता आशिया विकास बँकेने व्यक्त केली होती. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेल्याने ही घसरण आता ९ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आशियामध्ये ६० वर्षांतील मोठी घट

आशियामधील विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये चालू वर्षामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आशियाई विकास बॅँकेने व्यक्त केली आहे. गेल्या ६० वर्षांमधील ही सर्वात भीषण परिस्थिती असल्याचे मतही वर्तविले आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये आशियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ०.७ टक्क्यांनी घट होणार आहे. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेणार
विजय मल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करा
मी चिथावणीखोर भाषण दिले नाही
देश आर्थिक दिवाळखोरीकडे मात्र मोदींच्या विदेश दौर्‍याच
मुंबईत डॉक्टर्स ४७ आणि पॅरा मेडिकलची ४३ टक्के पदे रिकामी
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यावर आली मोलमजुरीची वेळ
कॉंग्रेस-भाजपा सरकारच्या कालखंडात शेतकर्‍यांची दुर्दश
एम. एम. कलबुर्गींच्या हत्येचे उलगडले कोडे
देशाच्या संपत्तीचे मूल्यांकन करून मित्रांना विकण्याची
कोरोना फैलावण्याचे खापर पुन्हा एकदा तबलींगींवर फोडले
आसाममधील ८६ हजारांपेक्षा अधिक नागरिक विदेशी म्हणून घोष
देशाच्या बँकिंग क्षेत्राला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज
नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतक
देशात गरीबांची माहिती ठेवण्याचे काम नीती आयोगाचे
शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस
मराठा आरक्षण : अध्यादेश काढायचा की नाही किंवा दुसरा मार्
आइस्क्रीम बनवणार्‍या कंपनीने ९ बँकांना घातला १ हजार ४००
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रक्रियेतून स्त्री स
आरक्षणासाठी आता धनगर समाजाचा एल्गार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper