×

१७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार अथवा जुमला दिन साजरा करण्यामागे कॉंग्रेसचे षड्यंत्र

Published On :    16 Sep 2020  By : MN Staff
शेयर करा:


मूलनिवासी बहुजन महापुरूषांचे महान कार्य अंंधारात ठेवण्याचा डाव





पुणे: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर हा जन्मदिन राष्ट्रीय बेेरोजगार अथवा जुमला दिन म्हणून साजरा करण्याचे कॉंग्रेसने ठरवले आहे. परंतु हा दिन साजरा करण्यामागे कॉंग्रेसचे मोठे षड्यंत्र आहे. कारण १७ सप्टेंबरला अनागारिक धम्मपाल यांची १५६ वी जयंती, ई.व्ही.पेरीयार रामास्वामी यांची १४१ वी जयंती, प्रबोधनकार ठाकरे यांची १३५ वी जयंती तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव उर्फ  भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४३ वा स्मृतीदिन आहे. म्हणजेच मूलनिवासी बहुजनांसाठी हा महत्वपूर्ण दिवस आहे. मूलनिवासी बहुजन महापुरूषांचे महान कार्य अंंधारात ठेवण्याचा डाव आखून पुन्हा एकदा कॉंग्रेसने आपले दात दाखवले आहेत.



१७ सप्टेंबर हा नरेंद्र मोदींचा जन्मदिन आहे. त्यासाठी कॉंग्रेसने जुमला अथवा बेरोजगार दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. म्हणजेच कॉंग्रेसच्या लोकांना वाटते की, हा दिवस बेरोजारी संदर्भात मोदींच्या नावाने लक्षात रहायला हवा. परंतु १७ सप्टेंबर हा दिवस अनागारिक धम्मपाल, ई.व्ही.पेरीयार रामास्वामी, प्रबोधनकार ठाकरे व यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच ओळखला जाईल. राष्ट्रीय बेरोजगार अथवा जुमला दिन साजरा करायचा होता तर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जन्मदिनी तो करायला होता. परंतु त्यांनी तो केला नाही. मोदी केवळ मुखवटा आहेत. पडद्यामागे वर्तमान केंद्र सरकार संघाच्या इशार्‍यावर चालत आहे. सरकारचे रिंगमास्टर सरसंघचालक आहेत.



मोदींच्या जन्मदिनाच्यादिवशी जुमला अथवा बेरोजगार दिन साजरा करायला नको असे आमचे म्हणणे नाही तर हाच दिवस बहुजन महापुरुषांच्या जयंतीचा दिवस आहे. आम्ही मोदींच्या जन्मदिनाला महत्व देत नाही तर आमच्या महापुरूषांच्या जयंतीला जास्त महत्व देत आहोत. बहुजन समाज १७ सप्टेंबरला पेरीयार यांची जयंती साजरी करतीलच, त्याचबरोबर सोशल मीडियावर खास करून ट्विटरवर एक हॅशटॅगही चालवणार आहेत. ‘१७ सितम्बर पेरीयार जयंती मनायेंगे’ असा हॅशटॅग चालवतील.



कॉंग्रेसने नेहमीच मूलनिवासी बहुजन महापुरुषांचा जन्मदिन अथवा एखाद्या खास दिवसाला बदनाम करण्याचे काम केले आहे.  हे काम कॉंग्रेस करत नाही तर बहुजन समाजातील लोकांच्या हातून केले जाते. त्याचा दोष कॉंग्रेसवर येऊ नये यासाठी. बेरोजगार दिनाचा प्रचार खुद्द कॉंग्रेसने केला नाही तर हंसराज मीना नावाच्या आदिवासी व्यक्तीच्या माध्यमातून करण्यात आला. हंसराज मीना राजस्थानचे असून कॉंग्रेसचे समर्थक आहेत. परंतु त्यांना कॉंग्रेसचा इतिहास माहित नाही. कॉंग्रेसने आदिवासींना मारण्यासाठी ऑपरेशन ग्रीन हंट सुरू केले होते. आदिवासींना नक्षलवादी घोषित करून त्यांना मारण्याचे काम कॉंग्रेस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात झाले. जसे आतंकवादी घोषित करून मुसलमान बांधवांना जेलमध्ये बंद करण्याचे कामही कॉंग्रेसनेच केले होते. देशात ५० वर्षापेक्षा जास्त कॉंग्रेसचेच सरकार होते. परंतु त्यांनी आदिवासींच्या कुठल्याही समस्याचे समाधान केले नाही. एवढेच नव्हे तर संविधानाने ज्या समस्यांचे समाधान केले होते त्या समस्या पुन्हा निर्माण केल्या. तर आदिवासींसाठी ५ वी व ६ वी अनुसूची आदिवासींसाठी बाबासाहेबांनी संविधानात अंतर्भूत केली आहे याची माहितीदेखील कॉंग्रेसने दिलेली नाही.


बहुजन महापुरूषांच्या महत्वपूर्ण दिवसांना बदनाम करण्याचे काम कॉंग्रेसने केले आहे. हा त्यांचा जुनाच डाव आहे. २६ जून १९७५ ला इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली. याच दिवशी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिन आहे. याच शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वात पहिले आरक्षण लागू केले. त्यांनी कॉंग्रेसला बकर्‍यांची झुंड अशा शब्दात फटकारले होते. आणीबाणीमुळे लोक काळा दिवस पाळतील व शाहू महाराजांच्या जन्मदिनाला विसरतील हेच यामागे षड्यंत्र होते.


६ डिसेंबर १९९२ रोजी कॉंग्रेसने बाबरी मशीद पाडली. या दिवशी मुस्लीम लोक काळा दिवस पाळतील आणि संघ परिवाराचे लोक विजयी दिन साजरा करतील. कारण त्यावेळी केंद्रात कॉंग्रेसचे सरकार होते. बाबरी मशीद वाचवायची असती तर कॉंग्रेसला ते करता आले असते. परंतु कॉंग्रेसने तसे केले नाही. बेराजगारी, भूमबळी, उपासमारीला भाजपा जबाबदार असेल तर बाबरी मशीद पाडायला कॉंग्रेस जबाबदार आहे.


२६ नोव्हेंबर २००८ रोजी आंतकवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्यावेळी महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार होते. हल्ल्यचा दिवस असा निवडला की, २६ नोव्हेंबरला काळा दिवस म्हणून मानतील. हा दिवस लोकशाही इतिहासात खासकरून बहुजन समाजासाठी महत्वपूर्ण आहे. कारण याच दिवशी देशाला संविधान अर्पण करण्यात आले होते. म्हणजे हा संविधान दिन आहे.  या दिवसाला बदनाम करण्यासाठी कॉंग्रेसने योजना बनवली होती. कॉंग्रेस आणि भाजपा मूलनिवासी बहजनांच्या महत्वपूर्ण दिवसांना बदनाम करत आहेत. त्याच दिवशी लोकांनी काळा दिवस पाळला पाहिजे, तशा प्रकारे घटना घडवल्या जात आहेत. १७ सप्टेंबर बेरोजगार अथवा जुमला दिन साजरा करण्यामागेही हेच षड्यंत्र आहे. परंतु बहुजन समाजातील लोक जागृत होत आहेत. या ब्राम्हणवादी षड्यंत्राला लोक सफल होऊ देणार नाहीत. १७ सप्टेंबरला अनागारिक धम्मपाल, पेरीयार रामास्वामी, प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करतील.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेणार
विजय मल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करा
मी चिथावणीखोर भाषण दिले नाही
देश आर्थिक दिवाळखोरीकडे मात्र मोदींच्या विदेश दौर्‍याच
मुंबईत डॉक्टर्स ४७ आणि पॅरा मेडिकलची ४३ टक्के पदे रिकामी
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यावर आली मोलमजुरीची वेळ
कॉंग्रेस-भाजपा सरकारच्या कालखंडात शेतकर्‍यांची दुर्दश
एम. एम. कलबुर्गींच्या हत्येचे उलगडले कोडे
देशाच्या संपत्तीचे मूल्यांकन करून मित्रांना विकण्याची
कोरोना फैलावण्याचे खापर पुन्हा एकदा तबलींगींवर फोडले
आसाममधील ८६ हजारांपेक्षा अधिक नागरिक विदेशी म्हणून घोष
देशाच्या बँकिंग क्षेत्राला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज
नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतक
देशात गरीबांची माहिती ठेवण्याचे काम नीती आयोगाचे
शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस
मराठा आरक्षण : अध्यादेश काढायचा की नाही किंवा दुसरा मार्
आइस्क्रीम बनवणार्‍या कंपनीने ९ बँकांना घातला १ हजार ४००
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रक्रियेतून स्त्री स
आरक्षणासाठी आता धनगर समाजाचा एल्गार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper