×

बांग्लादेशही जीडीपीबाबत भारताला टाकणार पिछाडीवर

Published On :    14 Oct 2020  By : MN Staff
शेयर करा:


चार टक्क्यांनी होणार वाढ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आकडेवारी





नवी दिल्ली: आधीच भारताची अर्थव्यवस्था उणे २३.९ इतकी घसरली असताना आणखी भारताला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारताच्या शेजारील राष्ट्र बांग्लादेशही  ‘सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात जीडीपी) बाबत भारताला पिछाडीवर टाकणार आहे. २०२० च्या आर्थिक वर्षात कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) आकडेवारीनुसार बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.


सन २०२० मध्ये बांग्लादेशचा जीडीपी १.८८८ डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या भारताचा जीडीपी उणे १०.५ टक्क्यांपर्यंत घसरणार असून ते १.८७७ डॉलरपर्यंत घसरणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील चार वर्षांमध्ये ही भारताची सर्वात वाईट कामगिरी असणार आहे. असे झाल्यास भारत हा दक्षिण आशियामधील तिसरा सर्वात गरीब देश ठरेल. सध्या दक्षिण आशियातील गरीब देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ भारताच्या वर असतील. बांग्लादेशबरोबरच भूतान, श्रीलंका आणि मालदीवही जीडीपीच्या बाबतीत भारतापेक्षा सरस कामगिरी करतील असे सांगितले जात आहे.


आयएमएफच्या आकडेवारीनुसार दक्षिण आशियामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश आहे. श्रीलंकेला सर्वाधिक फटका बसला असून त्या खालोखाल भारताचा क्रमांक लागत असल्याचे आयएमएफची आकडेवारी सांगते. नेपाळ आणि भूतानच्या अर्थव्यवस्थेमध्ये या वर्षी सकारात्मक वाढ होणे अपेक्षित असल्याचे दिसून येत आहे. आयएमएफने पाकिस्तानच्या आर्थिक विकासाची आकडेवारी मात्र उघड केलेली नाही. भारताची आर्थिक परिस्थिती आता पुढील आर्थिक वर्षात सावरेल असा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे. त्यामुळे भारताचा जीडीपी बांग्लादेशच्या पुढे जाण्यासाठी सन २०२१ चे आर्थिक वर्षापर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यानंतरही अगदी थोड्या फरकानेच भारत बांग्लादेशच्या पुढे असेल.


सन २०२१ मध्ये भारताचा जीडीपी ८.२ टक्क्यांपर्यंत असेल तर बांग्लादेशचा जीडीपी ५.४ टक्क्यांपर्यंत असेल. म्हणजेच पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी हा दोन हजार ३० डॉलर तर बांग्लादेशचा एक हजार ९९० डॉलर इतका असेल.


पाच वर्षांपूर्वी भारताचा जीडीपी हा बांग्लादेशपेक्षा ४० टक्क्यांनी अधिक होता. मागील पाच वर्षांमध्ये बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दर वर्षी बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये ९.१ टक्क्यांनी वाढ होत आहे. भारताच्या जीडीपीवाढीचा याच काळातील दर ३.२ टक्के इतका आहे. यामुळेच भारत आणि बांग्लादेशमधील जीडीपीमधील तफावत वेगाने कमी झाली आहे. निर्यात क्षेत्रात बांग्लादेशने मोठी मजल मारली आहे. देशातील गुंतवणूक आणि बचत याचा ताळमेळ उत्तम पद्धतीने साधण्यात आल्याने हे परिणाम दिसून येत असल्याचे तज्ज्ञ मंडळी बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात बोलताना सांगतात. या उलट मागील काही वर्षांमध्ये भारताची निर्यात मंदावली आहे. त्याचप्रमाणे देशातील गुंतवणूकही कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएए लागू करण्याच्या हालचाली
जेएनपीटी बंदरही खासगीकरणाच्या कचाट्यात
ओबीसींना अतिरिक्त सवलती देताना भटके -विमुक्त, एसबीसी बेद
गुन्हा दाखल झाल्याने अर्णब गोस्वामींची पाचावर धारण
कोश्यारींना स्वाभीमान असेल तर त्या पदावर राहायचे की नाह
प्रत्येक चार लोकांमागे तीन भारतीयांना मिळत नाही पौष्टि
सरकारी बँकांच्या खासगीकरणाला अभय
४०० मीटर वर्ग मीटर नव्हे तर १३ हजार ३०० मीटर जमीन हवी
घटनादुरुस्ती ऐवजी ‘बदल’ हा शब्द निघाला असेल, मी खेद व्यक
भूमाफियांनी हडपली आदिवासींची जमीन, सरकारचीही डोळेझाक
वीजेच्या झटक्याने मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचार्‍या
‘नीट’मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक शेवटून दुसरा
६ लाख ८५ हजार ६१६ सर्वाधिक ‘फिंगर प्रिंट’ महाराष्ट्रात
गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्य चालवतोय
राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर
राजस्थानात गुर्जर समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक
बहोत अच्छे मोदीजी...!
मुंबईचा वीज पुरवठा खंडीत का झाला?
आरटीआयला कमजोर बनवण्याच्या हालचाली
बलिया हत्याकांडातील फरार मुख्य आरोपीला बेड्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper