×

जगात जास्त निरक्षर भारतात

Published On :    14 Oct 2020  By : MN Staff
शेयर करा:


युनेस्कोच्या मानांकनानुसार भारतीय साक्षरता दर जगाच्या साक्षरतेपेक्षा कमी, केंद्र सरकारच्या साक्षर भारत, आत्मनिर्भर भारत योजनेचा फज्जा





नवी दिल्ली: युनोस्कोच्या मानांकनानुसार भारतीय साक्षरता दर जगाच्या साक्षरतेेपेक्षा कमी असून भारतात जास्त निरक्षर आहेत. दरम्यान केंद्रातील भाजपा सरकारने साक्षर भारत, आत्मनिर्भर भारत अशा प्रकारची साक्षरतेसाठी योजना बनवली होती. परंतु या याजनेचा फज्जा उडाला आहे. राष्ट्रीय साक्षरता दर वाढवणे हे मोठे भारतासमोर आव्हान निर्माण झाले आहे.


केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून प्रौढ साक्षरतेसाठी ‘पढना-लिखना’ अभियान सुरू केले. २०३० पर्यंत देशातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के गाठणे असे या अभियानाने उद्दीष्ट आहे. महिलांच्या साक्षरतेला प्रोत्साहन देणे तसेच अनु.जाती, जमातीसहित वंचित घटकांना शिक्षणासाठी जागृत करणे होय. या अभियानाच्या माध्यमातून लोकांना साक्षर बनवणे त्याचबरोबर कौशल्य विकासाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्यासाठी साक्षर भारत, आत्मनिर्भर भारत अशा प्रकारच्या योजनेचा ढोल बडवला होता. देशाला संपूर्ण साक्षर करण्यासाठी २००९ मध्ये साक्षर भारत कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. त्यावेळी ८० टक्क्यांपर्यंत साक्षरता दर पोहचवण्याचे उद्दीष्ट ठरवण्यात आले होते. २०११ च्या जनगणनेनुसार देशात साक्षरता दर ७४ टक्के होता. तर आता राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्वेक्षणानुसार देशाची आजची साक्षरता ७७.७ टक्के झाली आहे.


युनेेस्कोच्या मानांकनानुसार जगात सर्वात जास्त निरक्षर भारतात आहेत. भारताचा आजचा साक्षरता दर जगाच्या साक्षरता दरापेक्षा कमी आहे. जगाचा साक्षरतेचा दर ८४ टक्के आहे.  आज भारतात साक्षरता दर केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आसाम राज्यात चांगला आहे. तर आंध्र प्रदेश, राजस्थान, बिहार, तेलंगणा, उत्तर प्रदेशचे आकडे निराशाजनक आहेत. या राज्यात साक्षरता दर वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच १०० टक्के साक्षरता गाठणे शक्य होणार आहे. भारतात स्त्री-पुरूष साक्षरतेचे अंतर कमी करणेही आव्हान आहे. गेल्या जनगणनेनुसार स्त्री-पुरूष साक्षरता दरात १७ टक्क्यांचे अंतर आहे.


भारतात निरक्षर जास्त का आहेत? याचीही समीक्षा व्हायला हवी. त्याला कारण येथे असलेला ब्राम्हणवाद. ब्राम्हणवादाने येथील बहुजन समाजाला शिक्षणाची दारे बंद केली होती. जो कोणी शिक्षण घेईल त्याच्या कानात शिसे ओतणे, डोळे काढणे, जीभ छाटणे अशाप्रकारे अघोरी सजा मनुस्मृतीत लिहल्या होत्या. म्हणजे मनुस्मृतीने केवळ ब्राम्हणांना शिकण्याचा अधिकार दिला होता. त्यामुळे येथील बहुजनांना शिक्षण मिळणेच दुरापास्त झाले होते. शिक्षण मिळूच नये म्हणून ब्राम्हणांनी अनेक तर्‍हेच्या कुलंगड्या केल्या. परिणामी आजही भारतात साक्षरता कमी असल्याचे दिसून येत आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएए लागू करण्याच्या हालचाली
जेएनपीटी बंदरही खासगीकरणाच्या कचाट्यात
रेटिंग एजन्सीची दिशाभूल करणारी माहिती दाखवली प्रेक्षका
ओबीसींना अतिरिक्त सवलती देताना भटके -विमुक्त, एसबीसी बेद
गुन्हा दाखल झाल्याने अर्णब गोस्वामींची पाचावर धारण
कोश्यारींना स्वाभीमान असेल तर त्या पदावर राहायचे की नाह
प्रत्येक चार लोकांमागे तीन भारतीयांना मिळत नाही पौष्टि
सरकारी बँकांच्या खासगीकरणाला अभय
४०० मीटर वर्ग मीटर नव्हे तर १३ हजार ३०० मीटर जमीन हवी
घटनादुरुस्ती ऐवजी ‘बदल’ हा शब्द निघाला असेल, मी खेद व्यक
भूमाफियांनी हडपली आदिवासींची जमीन, सरकारचीही डोळेझाक
वीजेच्या झटक्याने मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचार्‍या
‘नीट’मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक शेवटून दुसरा
६ लाख ८५ हजार ६१६ सर्वाधिक ‘फिंगर प्रिंट’ महाराष्ट्रात
गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्य चालवतोय
राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर
राजस्थानात गुर्जर समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक
बहोत अच्छे मोदीजी...!
मुंबईचा वीज पुरवठा खंडीत का झाला?
आरटीआयला कमजोर बनवण्याच्या हालचाली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper