×

कट कारस्थाने रचणार्‍यांना सोडणार नाही

Published On :    14 Jun 2018  By : MN Staff
शेयर करा:


आमदार एकनाथ खडसे यांचा इशारा





जळगाव: मला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यासाठी कट कारस्थान रचणारे मोठे धुरीन आहेत. अजंली दमानिया त्यातील केवळ प्यादे आहेत. षडयंत्र रचणारे कितीही मोठे धुरीन असोत त्यांना सोडणार नाही, असा इशारा आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.


खडसे मंत्रिमंडळाच्या बाहेर गेल्याने ज्यांना लाभ होईल, त्यांच्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आले आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत माझी बदनामी सुरू ठेवण्याचा हा कट होता. यामागे कोण कोण आहेत हे आता हळूहळू समोर येत आहे, असेही खडसे म्हणाले. बुधवारी भुसावळला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


मंत्रिमंडळात माघारी येण्यापेक्षा मला दोन वर्षे जो त्रास झाला त्याचा हिशोब चुकता करणे महत्त्वाचे आहे. या काळात ऍन्टीकरप्शन, इन्कम टॅक्ससह अनेक यंत्रणांनी माझी कसून चौकशी केली, मात्र त्यांना काहीच चुकीचे आढळले नाही. आता कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांची परतफेड करायची आहे. मी कुणालाही सोडणार नाही, असेही खडसेंनी स्पष्ट केले आहे.
 


खडसे यांना फसविण्यासाठी अंजली दमानिया यांनी आमिष दिल्याचे कल्पना इनामदार यांनी यापूर्वीच जाहीरपणे सांगितले आहे. तसेच या प्रकरणात एक मंत्रीदेखील असल्याचे कल्पना इनामदार यांनी म्हटल्याचे खडसे यांनी सांगितले. 


आपणास दोन वर्षे या कथित व बनावट आरोपांमुळे त्रास झाला असून, या लोकांना नागडे केल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आपला संघर्ष सुरूच राहील, असेही ते म्हणाले. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आतंकवाद आणि हिंसाचाराला भाजप पीडीपी सरकारने संधी दिली. -
गुन्हा अन्वेषणने चौकशी करताच बलात्कारी दाती महाराज ढसा
नशेली पदार्थांची तस्करी करताना भाजपा नेत्याला अटक...
आतंकवाद्यांना फंड पुरविणारा रमेश शाहला अटक.
अमित शहाने हिंदूंवर अन्याय झाल्याचा बडवला ढोल.
एचआरटीसीच्या युनियनच्या नेत्याला महिलांनी दिला चपलाचा
भाजपच्या अध्यक्षांना वाचविण्याचा खटाटोप-कॉंग्रेसचा आर
ध्रुवीकरणासाठी दंगली घडविण्याचा कट -डॉ.राजू वाघमारे यां
बालाघाट जिल्ह्यात किडनी चोरीची अफवा, मुलांना शाळेत पाठव
निकालाच्या १५ दिवसानंतरही विद्यार्थी गुणपत्रिकेपासून
उद्या संभाजी भिडेंविरोधातील याचिकेवर सुनावणी
जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार केल्याचा वैज्ञानिका
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षक, मुख्या
माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूसं
मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची जाण नाह
आजपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू
बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी
अनुसूचित जातीतील शेतकर्‍यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले
पोलिसांचा ससेमिरा वाचविण्यासाठी विक्रम कोठारीची रुग्ण
२०१४ च्या धुंदीतून बाहेर पडा, ही २०१९ ची निवडणूक आहे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper