×

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही

Published On :    16 Oct 2020  By : MN Staff
शेयर करा:


सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली





मुंबई: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांने फटकारले असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे म्हटले आहे. राज्यातील उद्धव ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती शासन लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. राज्य सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, याचिकाकर्त्याने ही मागणी केली होती. विशेषत: मुंबईतील घटनांना अनुसरुन ही याचिका दाखल करण्यात आली होती.


महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यातील सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षांकडून हालचाली करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे हे सरकार म्हणजे तीन पायांची शर्यत असून जास्त काळ टिकणार नाही, असेही अनेकदा विरोधी पक्षातील काही नेत्यांनी म्हटले होते. त्यातच, सरकारच्या स्थापनेपासून राज्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या संकटांचा सामना करताना, सरकार अपयशी ठरल्याचं सांगत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही होत आहे. मात्र, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.


मुंबईतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबईतील काही मुद्दे लक्ष्य ठेऊन राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांवरुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल झाली होती. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच, केवळ मुंबईतील घटनांवरुन राज्यात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही. महाराष्ट्र राज्य किती मोठे आहे, हे तरी तुम्हाला माहिती आहे का? असे म्हणत याचिकाकर्त्याला न्यायालयाने सुनावले. सरन्यायाधीश बोबडे यांनी ही याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना फटकारले.  



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएए लागू करण्याच्या हालचाली
जेएनपीटी बंदरही खासगीकरणाच्या कचाट्यात
ओबीसींना अतिरिक्त सवलती देताना भटके -विमुक्त, एसबीसी बेद
गुन्हा दाखल झाल्याने अर्णब गोस्वामींची पाचावर धारण
कोश्यारींना स्वाभीमान असेल तर त्या पदावर राहायचे की नाह
प्रत्येक चार लोकांमागे तीन भारतीयांना मिळत नाही पौष्टि
सरकारी बँकांच्या खासगीकरणाला अभय
४०० मीटर वर्ग मीटर नव्हे तर १३ हजार ३०० मीटर जमीन हवी
घटनादुरुस्ती ऐवजी ‘बदल’ हा शब्द निघाला असेल, मी खेद व्यक
भूमाफियांनी हडपली आदिवासींची जमीन, सरकारचीही डोळेझाक
वीजेच्या झटक्याने मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचार्‍या
‘नीट’मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक शेवटून दुसरा
६ लाख ८५ हजार ६१६ सर्वाधिक ‘फिंगर प्रिंट’ महाराष्ट्रात
गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्य चालवतोय
राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर
राजस्थानात गुर्जर समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक
बहोत अच्छे मोदीजी...!
मुंबईचा वीज पुरवठा खंडीत का झाला?
आरटीआयला कमजोर बनवण्याच्या हालचाली
बलिया हत्याकांडातील फरार मुख्य आरोपीला बेड्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper