×

केंद्राविरोधात काश्मीरमध्ये सर्वपक्षीय आघाडी

Published On :    16 Oct 2020  By : MN Staff
शेयर करा:


गेल्या वर्षी जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम हटवले होते. हे कलम पुन्हा लागू करण्यासाठी जम्मू व काश्मीरच्या राजकारणातील सर्व विरोधी पक्षांनी गुरुवारी आपली एकजूट दाखवली.





नवी दिल्लीः गेल्या वर्षी जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम हटवले होते. हे कलम पुन्हा लागू करण्यासाठी जम्मू व काश्मीरच्या राजकारणातील सर्व विरोधी पक्षांनी गुरुवारी आपली एकजूट दाखवली. ही एकजूट दाखवताना परंपरागत शत्रू असलेले नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, डाव्या पक्षांच्या नेत्यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीत सर्व पक्षांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतला.


१४ महिन्यानंतर बुधवारी पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेतून सोडल्यानंतर दुसरच दिवशी ही बैठक झाल्याने काश्मीरमधल्या राजकीय घडामोडींना आता वेग येऊ लागला आहे. हे सर्व पक्ष ‘गुपकार जाहीरनाम्या’वर सहमत झाले असून ही सुद्धा काश्मीरच्या राजकारणात नवी सुरूवात झाल्याचे निदर्शक आहे.


गेल्या वर्षी ४ ऑगस्टला नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, कॉंग्रेस, पीपल्स कॉन्फरन्स, सीपीआय (एम) आणि अवामी नॅशनल कॉन्फरन्स या सहा पक्षांनी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या विरोधात गुपकार जाहीरनाम्यावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. त्यानंतर याच जाहीरनाम्याचा पुढील टप्पा म्हणून या वर्षी २२ ऑगस्टला आणखी एक संयुक्त ठराव तयार करण्यात आला होता.


या ठरावात, सरकारने लादलेल्या प्रतिबंधांमुळे तसेच शिक्षांमुळे गुपकार जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करणार्‍यांना मूलभूत संवाद प्रस्थापित करणेही कठीण झाले होते. यामुळे सगळेच सामाजिक व राजकीय संवाद थांबले होते. या सगळ्या परिस्थितीत झालेल्या मर्यादित संवादाद्वारे आम्ही एका मतावर आलो आहोत, असे म्हटले होते.


२२ ऑगस्टच्या संयुक्त ठरावावर स्वाक्षर्‍या करणार्‍यांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती, कॉंग्रेसचे जम्मू-काश्मीर अध्यक्ष जी. ए. मीर, पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन, कम्युनिस्ट नेते एम. वाय. तारिगामी आणि आवामी नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख मुझफ्फर शाह यांचा समावेश होता. आमच्याखेरीज आमच्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकत नाही याचा आम्ही एकमुखाने पुनरुच्चार करतो, असे ठरावात नमूद करण्यात आले होते. ५ ऑगस्ट २०१९ रोजी झालेला निर्णय हा अत्यंत लघुदृष्टीने घेतलेला तसेच घटनाबाह्य आहे. यामुळे जम्मू-काश्मीर व नवी दिल्लीच्या संबंधांत खूप मोठा बदल झाला आहे, असे या ठरावात म्हटले होते.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएए लागू करण्याच्या हालचाली
जेएनपीटी बंदरही खासगीकरणाच्या कचाट्यात
ओबीसींना अतिरिक्त सवलती देताना भटके -विमुक्त, एसबीसी बेद
गुन्हा दाखल झाल्याने अर्णब गोस्वामींची पाचावर धारण
कोश्यारींना स्वाभीमान असेल तर त्या पदावर राहायचे की नाह
प्रत्येक चार लोकांमागे तीन भारतीयांना मिळत नाही पौष्टि
सरकारी बँकांच्या खासगीकरणाला अभय
४०० मीटर वर्ग मीटर नव्हे तर १३ हजार ३०० मीटर जमीन हवी
घटनादुरुस्ती ऐवजी ‘बदल’ हा शब्द निघाला असेल, मी खेद व्यक
भूमाफियांनी हडपली आदिवासींची जमीन, सरकारचीही डोळेझाक
वीजेच्या झटक्याने मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचार्‍या
‘नीट’मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक शेवटून दुसरा
६ लाख ८५ हजार ६१६ सर्वाधिक ‘फिंगर प्रिंट’ महाराष्ट्रात
गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्य चालवतोय
राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर
राजस्थानात गुर्जर समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक
बहोत अच्छे मोदीजी...!
मुंबईचा वीज पुरवठा खंडीत का झाला?
आरटीआयला कमजोर बनवण्याच्या हालचाली
बलिया हत्याकांडातील फरार मुख्य आरोपीला बेड्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper