×

भारतात उपासमारी गंभीर, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत ९४ व्या स्थानी

Published On :    17 Oct 2020  By : MN Staff
शेयर करा:


नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियापेक्षाही भारत मागे





नवी दिल्ली:  ग्लोबल हंगर इंडेक्स २०२० चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. १०७ देशांच्या यादीत भारत ९४ व्या क्रमांकावर आहे. नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियापेक्षाही भारत मागे असल्याचे म्हटले आहे. २०१९ मध्ये भारत ११७ देशांच्या यादीत १०२ क्रमांकावर होता. याबाबतचा अहवाल ‘कन्सर्न वल्र्डवाइड’ ही आयरिश संस्था तसेच ‘वेल्ट हंगर हिल्फी’ ही जर्मन संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. भारतात उपासमारीची परिस्थिती गंभीर असल्याचे या अहवालात म्हटले आहे. २०१८ मध्ये ११९ देशांच्या यादीत भारत १०३ क्रमांकावर होता.


कमी पोषण, उंचीच्या तुलनेत कमी वजन, पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, उपासमारी, बालमृत्यू दर, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर हे घटक यात विचारात घेतले जातात. जगभरातील स्थिती मध्यम असल्याचा उल्लेख ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये करण्यात आला आहे. जगभरातील ६० कोटींहून अधिक लोक उपासमारीच्या विळख्यात असल्याचा इशारा देण्यात आला आहे.



देशातील भुकेच्या स्थितीवरून देशांना ० ते १०० असे गुण दिले जातात. त्यानुसार त्यांची क्रमवारी ठरवली जाते. यामध्ये ० गुण हे सर्वोत्तम समजले जातात, याचा अर्थ एकप्रकारे त्या देशात भुकेची स्थिती काळजी करण्यासारखी नाही असाच होतो. भारताला ५० पैकी २७.२ गुण देण्यात आले असून परिस्थिती गंभीर असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ९.९ पेक्षा कमी गुण असल्यास परिस्थिती गंभीर नाही. १० ते १९.९ मध्ये गुण असल्यास परिस्थिती मध्यम आहे. २० ते ३४.९ गुण असल्यास भुकेची परिस्थिती गंभीर आहे. ३५ ते ३९.९ गुण म्हणजे धोक्याची घंटा तर ५० हून अधिक गुण म्हणजे धोका खूप वाढला असून परिस्थिती भयावह आहे असा अर्थ होतो. भारतातील पाच वर्षाखाली मुलांचा मृत्यूदर २००० ते २०१८ दरम्यान कमी झाल्याचाही  अहवालात उल्लेख आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियापेक्षाही मागे आहे. फक्त १३ देशांमध्ये भारतापेक्षा वाईट परिस्थिती आहे.


भारताचा ग्लोबल हंगर इंडेक्स का वाढतोय?

भारताचा ग्लोबल हंगर इंडेक्स का वाढतोय याचा विचार करायला हवा. सेनगुप्ता कमिटीच्या अहवालानुसार भारतात ८३ कोटी लोक उपासमारीच्या खाईत लोटले गेले आहेत. त्यांना खायला काही मिळत नसूनही सरकार त्याकडे लक्ष का देत नाही? तर त्याला शासक वर्ग जबाबदार आहे. एवढेच कशाला आठ दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक बातमी प्रसिध्द झाली होती. कोरोना लॉकडाऊनदरम्यान उपाशीपोटी हजारो कि.मीची पायपीट करणार्‍या गरीब मजुरांना धान्य वाटले नाही. उलट सरकारी गोदामांमध्ये मात्र १ हजार ६०० टन धान्य अक्षरश: सडवले. यावरून केंद्र सरकार गरीब मजुरांविरोधी नीती कशी राबवते याचे उदाहरण समोर आले होते. मे महिन्यात २६ टन, जून महिन्यात १ हजार ४५२ टन, जुलै महिन्यात ४१ टन तर ऑगस्ट महिन्यात ५१ टन अन्न सडवण्यात आले. शासक वर्गाने जाणीवपूर्वक येथील बहुजनांना उपासमारीच्या खाईत लोटून व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.

उपासमारीच्या खाईत लोटलेले लोक बहुजन आहेत. ज्यावेळी तथाकथित स्वातंत्र्य मिळाले तेव्हा केवळ गरीबीची रेषा होती. आता शासक वर्गाने उपासमारीची नवीन रेषा निर्माण केली. ब्राम्हणवादी उपासमारीने मरत नाहीत. त्यांना खायला चांगले अन्न मिळत आहे. पिण्यासाठी पाणी, घर, चांगल्या सुविधा मिळत आहेत. परंतु बहुजनांना काहीच मिळत नाही. उपासमारीच्या समस्यामागेही ब्राम्हणवाद आहे. त्यामुळे दिवसेंदिवस उपासमारी वाढत चालली आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएए लागू करण्याच्या हालचाली
जेएनपीटी बंदरही खासगीकरणाच्या कचाट्यात
रेटिंग एजन्सीची दिशाभूल करणारी माहिती दाखवली प्रेक्षका
ओबीसींना अतिरिक्त सवलती देताना भटके -विमुक्त, एसबीसी बेद
गुन्हा दाखल झाल्याने अर्णब गोस्वामींची पाचावर धारण
कोश्यारींना स्वाभीमान असेल तर त्या पदावर राहायचे की नाह
प्रत्येक चार लोकांमागे तीन भारतीयांना मिळत नाही पौष्टि
सरकारी बँकांच्या खासगीकरणाला अभय
४०० मीटर वर्ग मीटर नव्हे तर १३ हजार ३०० मीटर जमीन हवी
घटनादुरुस्ती ऐवजी ‘बदल’ हा शब्द निघाला असेल, मी खेद व्यक
भूमाफियांनी हडपली आदिवासींची जमीन, सरकारचीही डोळेझाक
वीजेच्या झटक्याने मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचार्‍या
‘नीट’मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक शेवटून दुसरा
६ लाख ८५ हजार ६१६ सर्वाधिक ‘फिंगर प्रिंट’ महाराष्ट्रात
गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्य चालवतोय
राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर
राजस्थानात गुर्जर समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक
बहोत अच्छे मोदीजी...!
मुंबईचा वीज पुरवठा खंडीत का झाला?
आरटीआयला कमजोर बनवण्याच्या हालचाली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper