×

६५० देवणी शहरातील घरकुल लाभधारकांची बांधकाम परवाना फी माफ करावी

Published On :    17 Oct 2020  By : MN Staff
शेयर करा:


बहुजन मुक्ती पार्टी व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी





 लातूर: जिल्हा प्रशासनाने देवणी शहरातील ६५० घरकुल लाभधारकांची बांधकाम परवाना फी माफ करावी आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी  लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी अशासकीय सदस्य पांडुरंग रामराव कदम व  बहुजन मुक्ती पार्टी देवणी शहर अध्यक्ष अखिल खादरसाब सय्यद  यांनी लातूर जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.


मागील सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारी अर्जात लातूर मनपामध्ये घरकुल लाभधारकांची बांधकाम परवाना व इतर शुल्क  माफ केल्याचे  पुरावे सादर करण्यात आले आहेत. याच आधारावर देवणी शहरातील घरकुल लाभधारकांची फी इतर शुल्क माफ करावेत अशी आमची मागणी आहे. सतत पाठपुरावा केल्यानंतर देवणी मुख्याधिकार्‍यांनी २८ ऑगस्ट २०२० रोजी पत्र पाठवले. जिल्हा प्रशासनाने निर्देश दिल्यास बांधकाम परवाना व इतर शुल्क माफी संदर्भात विचार करण्यात येईल असे देवणी मुख्याधिकार्‍यांनी निर्णयाचा चेंडू जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात टोलावला आहे.



देवणी शहरातील घरकुल लाभधारकांच्या न्याय हक्कासाठी मंजुर प्रत्येकी एका लाभार्थ्यांकडून बांधकाम परवाना व इतर मारकोट फीस च्या नावाखाली वीस ते पंचवीस हजार रुपये नगरपंचायतकडून आर्थिक लूट केली जात आहे. ती लूट थांबवावी. लातूर मनपामध्ये बांधकाम परवाना व इतर शुल्क   माफ केले असून याच आधारावर देवणी शहरातील घरकुल लाभधारकांना लादलेली  चौरस फूट साईट प्रमाणे पंधरा ते वीस हजार रुपये होत असलेली बांधकाम परवाना फीस माफ करावी.  


बांधकाम नकाशा फीस १ हजार ७५० रुपये घेतलेले असून  याच फिसमध्ये मार्क आउट टाकावे. अतिरिक्त लावलेली मार्क आउट फीस पाच हजार रुपये रद्द करावी. ५१० चलन फीस औसा नगरपरिषदेला आदेश दिल्याप्रमाणे  देवणी नगरपंचायतीने परत करण्याचे निर्देश द्यावेत. लातूर औसाच्या धर्तीवर प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिला हप्ता विनाअट खात्यावर जमा करावे. प्रधानमंत्री आवास लाभधारक मंजूर ५७५ पैकी १८४. घरकुलचे काम सुरू आहे. उर्वरित ३९१ लाभधारक मागील दोन वर्षापासून प्रतीक्षेत आहेत.  डीपीआर नंबर तीन प्रलंबित यादी प्रसिद्ध करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


 देवणी नगरपंचायत अंतर्गत घरकुल लाभधारकांना शासन नियम लागू होतो.लातूर मनपा अंतर्गत घरकुल लाभधारकांना नियम लागू होत नाही. असे भेदभाव करण्याचे संविधानात तरतूद केलेले नाही. तालुकानिहाय  स्वतंत्र कायदा अस्तित्वात  आलेला नाही. नगर विकास विभागाकरिता  अतिरिक्त  आयुक्त सतीश शिवणे यांच्याकडून लोकशाही चा अवामान करणारे व अर्जदाराची दिशाभूल करणारे पत्र देऊ नये. मुख्याधिकारी देवणी यांनी  मागील तक्रार अर्जातील सात मुद्याची चौकशी न करता एकच मुद्याची बांधकाम फी माफी संदर्भात दोन ओळींचा अहवाल सादर केला. जिल्हा प्रशासनाने जशाच्या तसे कळवून अर्ज निकाली काढणे ही एक अतिशय गंभीर व लाजिरवाणी बाब असल्याचे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती लातूर जिल्हाधिकारी, सचिव गृहनिर्माण, सचिव नगर विकास यांना पाठवण्यात आल्या आहेत. या  निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कदम,  बहुजन मुक्ती पार्टी देवणी शहराध्यक्ष अखिल खादरसाब  सय्यद यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएए लागू करण्याच्या हालचाली
जेएनपीटी बंदरही खासगीकरणाच्या कचाट्यात
रेटिंग एजन्सीची दिशाभूल करणारी माहिती दाखवली प्रेक्षका
ओबीसींना अतिरिक्त सवलती देताना भटके -विमुक्त, एसबीसी बेद
गुन्हा दाखल झाल्याने अर्णब गोस्वामींची पाचावर धारण
कोश्यारींना स्वाभीमान असेल तर त्या पदावर राहायचे की नाह
प्रत्येक चार लोकांमागे तीन भारतीयांना मिळत नाही पौष्टि
सरकारी बँकांच्या खासगीकरणाला अभय
४०० मीटर वर्ग मीटर नव्हे तर १३ हजार ३०० मीटर जमीन हवी
घटनादुरुस्ती ऐवजी ‘बदल’ हा शब्द निघाला असेल, मी खेद व्यक
भूमाफियांनी हडपली आदिवासींची जमीन, सरकारचीही डोळेझाक
वीजेच्या झटक्याने मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचार्‍या
‘नीट’मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक शेवटून दुसरा
६ लाख ८५ हजार ६१६ सर्वाधिक ‘फिंगर प्रिंट’ महाराष्ट्रात
गेल्या सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्य चालवतोय
राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर
राजस्थानात गुर्जर समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक
बहोत अच्छे मोदीजी...!
मुंबईचा वीज पुरवठा खंडीत का झाला?
आरटीआयला कमजोर बनवण्याच्या हालचाली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper