×

२०२० मध्ये बँकांची ६७ हजार कोटींची फसवणूक

Published On :    12 Jan 2021  By : MN Staff
शेयर करा:


सीबीआयच्या अहवालात धक्कादायक माहिती





नवी दिल्ली : आर्थिक फसवणुकीला आळा बसला असेल हा तुमचा समज वस्तुस्थिती समजताच धक्का देणारा आहे. केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) वर्ष २०२० साठीच्या अहवालात म्हटले आहे की, २०१९ मध्ये बँकांच्या फसवणुकीचे ९१ प्रकार घडले होते ते पुढच्या वर्षी १९६ झाले. वर्ष २०२० मध्ये सीबीआयकडे  फसवणुकीची ५४३ प्रकरणे आली त्यातील १९६ ही बँकांच्या फसवणुकीची होती. २०२० मध्ये बँक फसवणुकीची रक्कम होती ६७ हजार ३१९.४० कोटी रुपयांची, तर २०१९ मध्ये ही रक्कम होती १९ हजार ८३०.१४ कोटी रुपये.


लक्षणीय बाब म्हणजे गेल्या वर्षी बँक फसवणुकीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले. सीबीआयने बँक फसवणुकीचे ५० पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले. त्यातील जवळपास ३० मुंबईतील होती. पुणे, नागपूर आणि चेन्नईत १७, गुजरातच्या गांधीनगरमध्ये १६ गुन्हे दाखल झाले. गेल्या वर्षी फसवणुकीत लक्षवेधी होते येस बँक, डीएचएफएल, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स, टीडीपीचे नेते रायापाती सांबशिव राव यांच्याशी संबंधित ट्रान्सट्रोयचे ७ हजार ९२६.०१ कोटी रुपये.


सीबीआयने बँक फसवणुकीचे जे २७ प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून घेतले त्यांची एकूण रक्कम होती ५३ हजार ३७९.३८ कोटी रुपये (७९.२९ टक्के) होती.  प्रत्येक एफआयआर हा ५०० कोटी रुपयांच्या वरील फसवणुकीचा होता. ४७ गुन्ह्यांतील रक्कम ही १०० ते ५०० कोटी रुपयांची होती व ती एकूण रक्कम ९ हजार ४२३.७८ कोटी रुपये(१३.९९ टक्के) होती.  २०१७ मध्ये जे आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडले त्यात बँक फसवणुकीचे प्रमाण होते फक्त ३ टक्के. २०२० मध्ये ही टक्केवारी ३६ वर गेली.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
१ टक्का व्यक्तींकडे देशाची ७३ टक्के संपत्ती
टाइम्स नाऊ व रिपब्लिक वृत्तवाहिन्यांना उच्च न्यायालयान
बळाचा वापर केल्यास २६ जानेवारीला त्सुनामी येईल
अर्णव गोस्वामींच्या विरोधात भाजपचे ‘तांडव’ कधी?
शेतकरी आंदोलनाचा धसका
‘जय श्रीराम’चे नारे देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड
मराठा आरक्षणाबाबत गोंधळात गोंधळ
आतापर्यंत १०० हून अधिक शेतकर्‍यांच्या सरकारकडून हत्या
बंजारा समाजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणार्‍या लेखक भालचं
प्रबोधनकार ठाकरे भट-भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुना
थकबाकी न भरणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणार
मोदी व योगी यांच्याविरोधात पोस्ट, कायद्याच्या विद्यार्
इतके दिवस शेतकर्‍यांचे आंदोलन समाजासाठी चांगले नाही
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आंदोलनाचा मुद
वारंवार सुनावणी पुढे ढकलत मराठा आरक्षणाला ठेंगा
२ परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे १० चिमुरड्यांचा बळी
इम्पाचा मराठवाडा विभागस्तरीय २४ जानेवारीला कार्यक्रम
कोव्हॅक्सीन लसीविषयी धास्ती
प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper