×

राष्ट्राची मातृशक्ती जिजाई !

Published On :    12 Jan 2021  By : MN Staff
शेयर करा:


महाराष्ट्राचा इतिहास हा जगाच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे. या महाराष्ट्रात अनेक स्त्रियांपैकी महान इतिहास घडविणारी एक महान शक्ती म्हणजे आमची तत्त्वनिष्ठ व संस्कारक्षम जिजामाता होय !





महाराष्ट्राचा इतिहास हा जगाच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे. या महाराष्ट्रात अनेक स्त्रियांपैकी महान इतिहास घडविणारी एक महान शक्ती म्हणजे  आमची तत्त्वनिष्ठ व संस्कारक्षम जिजामाता होय ! जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ ला याच आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजी जाधव आणि  म्हसाळबाई उर्फ गिरिजाबाई यांच्या घरी झाला. मराठा मुलीप्रमाणे जिजाऊ चे संगोपन झाले. जिजाऊचे  बालपण निघून गेले आणि जिजाऊ विवाह योग्य झाल्यावर सोळाशे पाच (१६०५) मध्ये तिचा  विवाह मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव शहाजी भोसले यांच्याशी झाला. जिजाऊंच्या वडीलांची व बंधूची हत्या झाल्यानंतर जिजाऊवर दुःखाचा डोंगर कोसळला. दुःखाचा डोंगर पार करता-करता अनेक अनुभवातून  तावून- सुलाखून ती पर्वता सारखी उभ्या राहिल्या होत्या. संस्कारक्षम घराण्याचे उच्च  संस्कार त्यांच्या नसानसांत मुरले होते .


जिजाऊच्या कुशीत वाढत असलेले बाळ संस्काराचे आकार-उकार घेऊन तेजस्वीपणे शिवाजीराजे म्हणूनच मॉं जिजाऊच्या उदरी जन्माला आले. जिजामाते सारखी माय भाग्यवंतानांच लाभते. सार्‍या जगातील महामानवांनी आपल्या मातेलाच गुरुचे अग्रस्थान दिले. माता कशीही असो ती आपल्या मुलाला श्रेष्ठच असते. जिजामाता तर  केवळ महाराष्ट्राच्या  नव्हे तर राष्ट्राच्या मातृशक्ती ठरल्या, अशी माता जगी विरळच !


 बालसंस्कारापासून ऐहिक व्यवहारापर्यंत, परमार्थापासून यथार्थ ज्ञान देण्यापर्यंत, पतीनिष्ठेपासून स्वराज्यनिष्ठे पर्यंत, अन्यायाच्या प्रतिकारापासून सत्याच्या विजयापर्यंत, स्व:रक्षणापासून धर्माचरणा पर्यंत, डोळसपणे राबणारी, जिद्दी, धडाडी, जिजाऊ  एक बाणेदार राजमाता होती. जिजामाता नुसती कारुण्य मुर्तीस नव्हती तर ती परखड कृतीची विलक्षण अगाध शक्ती होती. हिंदू स्त्रियांच्या किंकाळ्या  ऐकून त्यांच्यावर होत असलेला अन्याय पाहून त्यांचे मन हळहळत होते. सार्‍या महाराष्ट्राला राक्षशी  राजवटीचे अमानुषपणाचे ग्रहण लागले होते. त्यांचे धार्मिक हळवे मन पेटून उठत होते. विचारांनं त्या ग्रस्त झाल्या होत्या. माझा पुत्र शिवबा यांच्या हातून परकीय राजवटीचा नायनाट करावा,  हा ध्यास त्यांना लागलेला होता. बाल शिवाजीच्या  बालमनात त्यांनी अमानुष  कारकीर्दची भावना जागृत केली. त्यांनी शिवाजीला कठोर व चांगली शिस्त लावली. आपले तत्व आपले ध्येय त्यांनी कधीच ढळू दिले नाही. त्यांनी शिवबाच्या मनावर चांगले संस्कार केले. त्यांना बालपणीच युद्धाचे शिक्षण दिले. शिवबाला सर्व प्रकारचे ज्ञान, प्रशिक्षण देऊन, बहुजनांच्या उध्दारा करीता, राजसत्ता मिळविण्याकरीता, जिजाऊने आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.


स्त्रियांनी फक्त चूल व मूल न सांभाळता  त्यांनी राज्यकारभार आपल्या हातात घ्यावा असे त्यांना वाटायचे. म्हणूनच जिजाऊंनी मनुस्मृतीच्या विचारांचे खंडन करून आपल्या हातात शस्त्र घेतले. त्यांनी राज्यकारभार चालविला. ज्ञानदानाचे काम केले. प्रसंगी शहाजीराजे पुणे जहागिरीची संपूर्ण व्यवस्था जिजाऊंनी सांभाळली. पतीच्या प्रत्येक मोहिमेत त्या मनाने, धैर्याने आनंदित होऊन सहभागी होत असायच्या. आपल्या शिवबाला त्यांनी मातेचे पित्याचे प्रेम देऊन सर्वगुणसंपन्न आणि जाणता राजा घडविले.जिजाऊ खर्‍या अर्थाने शिवबाला प्रोत्साहन देणारी त्यांची जिद्द, चिकाटी व ध्येय निष्ठा वाढविणारी, प्रतिकूल परिस्थितीतही शत्रूला झुंज देणारी व झुंज देण्याची क्षमता इतरांमध्ये निर्माण करणारी, बहुजनांच्या मुक्तीचे स्वराज्य निर्माण करणारी, आदर्शवादी राज्यकर्त्यांची माता राज्यकर्ती होती. 


स्वराज्य निर्माण करून  कोणत्याही प्रजेवर अन्याय अत्याचार होणार नाही याची स्वतः दखल घेऊन, स्वराज्यातील खून, दरोडे,गुंड प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी कठोर शिस्त वक्तशीरपणा हा त्यांच्या प्रशासनाचा स्थायीभाव होता. अनेक संघर्षाला तोंड देऊन कुणाला न घाबरता शूरवीर जिजाऊने लोककल्याणकारी जनतेचे, रयतेचे राज्य निर्माण केले. ती स्वराज्य ज्योती होती म्हणूनच तिच्या संस्कारातून जडणघडणीतून राजे शिवछत्रपती घडले. लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी त्यांना स्वतःला तयार करावे लागले. शिवबांना तयार करावे लागले,तेव्हा कुठे सार्‍या बहुजनाला ब्राह्मणशाहीच्या  विषमतावादी समाजव्यवस्थेच्या गुलामगिरीतून मुक्त करता आलेे. ही महानता मॉं  जिजाऊ या कर्तृत्वात होती. तिच्या ध्येयनिष्ठ प्रेरणेत होती, ही महानता जिजाऊच्या हातातील शस्त्रात होती, तिच्या कठोर शिस्तीत होती, तिच्या मुसद्दी पणात होती, तिच्या कुशल नेतृत्वात होती, सामान्य जनतेच्या उत्थानाकरीता  राजसत्ता प्राप्त करणे आणि लोककल्याणकारी कार्य करणे हा उद्देश त्यांनी सफल केला. खरे तर जिजाऊ या शिवबाच्या माता, गुरु, सारथी, पिता व मित्रही होत्या. कर्तव्यदक्ष, थोर, मुसद्दी, शूरवीर, समताधिष्ठ धुरंधर, समताधिष्ठित राजकारणी, उत्तुंग कर्तृत्वाचे गड रचणारा करारी बाण्याचा, स्वाभिमानी, सुपुत्र जिजाऊने घडवून स्त्री वर्गासमोर एक महान आदर्श ठेवला. त्या  आदर्श मातेला वंदन करून त्यांच्या विचाराला आत्मसात करून, प्रत्येक स्त्रीने आपल्या सुपुत्राला सुसंस्कार देऊन, शिवाजी राजा सारखे महान, कर्तृत्वशाली व लोककल्याणकारी बनवावे. अशा महान त्यागी तत्वनिष्ठ कर्तृत्वशाली जिजाऊ मॉं साहेबांना माझा मानाचा मुजरा  !

माया दामोदर
८८८८६७४२६१



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
१ टक्का व्यक्तींकडे देशाची ७३ टक्के संपत्ती
टाइम्स नाऊ व रिपब्लिक वृत्तवाहिन्यांना उच्च न्यायालयान
बळाचा वापर केल्यास २६ जानेवारीला त्सुनामी येईल
अर्णव गोस्वामींच्या विरोधात भाजपचे ‘तांडव’ कधी?
शेतकरी आंदोलनाचा धसका
‘जय श्रीराम’चे नारे देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड
मराठा आरक्षणाबाबत गोंधळात गोंधळ
आतापर्यंत १०० हून अधिक शेतकर्‍यांच्या सरकारकडून हत्या
बंजारा समाजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणार्‍या लेखक भालचं
प्रबोधनकार ठाकरे भट-भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुना
थकबाकी न भरणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणार
मोदी व योगी यांच्याविरोधात पोस्ट, कायद्याच्या विद्यार्
इतके दिवस शेतकर्‍यांचे आंदोलन समाजासाठी चांगले नाही
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आंदोलनाचा मुद
वारंवार सुनावणी पुढे ढकलत मराठा आरक्षणाला ठेंगा
२ परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे १० चिमुरड्यांचा बळी
इम्पाचा मराठवाडा विभागस्तरीय २४ जानेवारीला कार्यक्रम
कोव्हॅक्सीन लसीविषयी धास्ती
प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper