×

भारतासह ब्राझील, दक्षिण आफ्रिका या देशांमधील २५ कोटी लोक तीव्र गरिबीत जाऊ शकतात

Published On :    13 Jan 2021  By : MN Staff
शेयर करा:


लॉकडाऊनचा भीषण परिणाम, लंडन विद्यापीठाचे अर्थतज्ञ स्टीव्ह शिफेरेज यांची भीती





लंडन: कोरोनाच्या नावाखाली करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जगातील अनेक अर्थव्यवस्था ढासळल्या आहेत. त्याचा परिणाम विकसनीशील देशांना जास्त बसणार आहे. भारतासह ब्राझील, दक्षिण आफ्रिका अन्य विकसनशील देशांमधील २५ कोटी लोक तीव्र गरिबीच्या खाईत लोटले जाऊ शकतात. यातून भारतीय अर्थव्यवस्थेला सावरणे कठीण होऊन बसेल अशी भीती लंडन विद्यापीठाचे अर्थतज्ञ स्टीव्ह शिफेरेज यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान चीनची अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ८ टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज आहे.  परंतु ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या वेगाने वाढणार्‍या अर्थव्यस्थांच्या देशांसाठी सद्यस्थितीतून मार्ग काढणे मोठे आव्हान आहे. किंबहुना, फार कठीण होऊन बसले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


अमेरिका, ब्रिटन आणि कॉंटिनेंटल युरोपमधील श्रीमंत देश यांची स्थिती फार वाईट दिसत आहे. २०२० या वर्षातील उन्हाळ्यात थोड्याफार भरपाईनंतर या देशांच्या अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा चिखलात रुतली आहेत. २०२१ मध्ये विकसनशील देशांना सर्वात मोठे नुकसान सहन करावे लागण्याची भीती आहे. बर्‍याच विकसनशील देशांकडे लस खरेदी करण्यासाठी वित्तीय स्त्रोत सुद्धा नाहीत आणि त्यांची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुद्धा अशी नाही की, संसर्ग झालेल्या लोकांवर उपचार करू शकतील. हे विकसनशील देश मोठ्या प्रमाणात अनुदानही देऊ शकत नाहीत. युरोप आणि अमिरेकेने तसे केले आहे. मात्र, हे विकसनशील देशात शक्य नाही. पाश्चिमात्य देशांमधील मंदीमुळे विकसनशील देशांमधील कच्च्या मालाची मागणी कमी होईल.


विकसनशील देशांमध्ये नोकर्‍या गेल्याने किंवा काम नसल्याने बराच मोठा वर्ग पुन्हा आपापल्या गावाकडे किंवा शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये परतू लागला आहे. यामुळे गरिबीत कधी नव्हे एवढी प्रचंड वाढ होत असल्याचे शिफेरेज यांनी म्हटले आहे. ज्यांच्या नोकर्‍या गेल्यात किंवा व्यवसाय ठप्प झाला आहे, त्यांना पुन्हा नोकर्‍या मिळवणे फार कठीण आहे.  रिटेल किंवा हॉस्पिटॅलिटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये हे जास्त दिसू शकते. कारण यात पूर्णपणे नुकसान भरून काढणे फार कठीण आहे. या वर्गात तरुण, महिला आणि अल्पसंख्यांक लोक जास्त येतात. असमानतेत वाढ होऊ शकते. कारण श्रीमंत देश आपले अनुदान कमी करू शकतात. तसेच, कर्मचारी, कंत्राटी कामगार यांच्यात कपातही केली जाऊ शकते असे शिफेरेज यांनी म्हटले आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
१ टक्का व्यक्तींकडे देशाची ७३ टक्के संपत्ती
टाइम्स नाऊ व रिपब्लिक वृत्तवाहिन्यांना उच्च न्यायालयान
बळाचा वापर केल्यास २६ जानेवारीला त्सुनामी येईल
अर्णव गोस्वामींच्या विरोधात भाजपचे ‘तांडव’ कधी?
शेतकरी आंदोलनाचा धसका
‘जय श्रीराम’चे नारे देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड
मराठा आरक्षणाबाबत गोंधळात गोंधळ
आतापर्यंत १०० हून अधिक शेतकर्‍यांच्या सरकारकडून हत्या
बंजारा समाजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणार्‍या लेखक भालचं
प्रबोधनकार ठाकरे भट-भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुना
थकबाकी न भरणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणार
मोदी व योगी यांच्याविरोधात पोस्ट, कायद्याच्या विद्यार्
इतके दिवस शेतकर्‍यांचे आंदोलन समाजासाठी चांगले नाही
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आंदोलनाचा मुद
वारंवार सुनावणी पुढे ढकलत मराठा आरक्षणाला ठेंगा
२ परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे १० चिमुरड्यांचा बळी
इम्पाचा मराठवाडा विभागस्तरीय २४ जानेवारीला कार्यक्रम
कोव्हॅक्सीन लसीविषयी धास्ती
प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper