×

पेट्रोल-डिझेलच्या भडक्याने ग्राहकांचे मोडणार कंबरडे

Published On :    13 Jan 2021  By : MN Staff
शेयर करा:


मुंबईतील दर ९१ रुपयांवर, गेल्या दोन वर्षातील उच्चांक





मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमूल्यन याचा पेट्रोलियम कंपन्यांवर दबाव वाढल्याने आज (बुधवारी) इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल २५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ९१ रुपयांवर गेले आहे.


पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने गेल्या दोन वर्षातील उच्चांक गाठला असून, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये पेट्रोलचे दर नव्वद रुपयांवर गेले आहेत. मुंबईत पेट्रोल ऐतिहासिक पातळीच्या दिशेने पुढे सरकत आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर ९१.०७ रुपये तर, डिझेलचा दर ८१.३४ रुपये झाला आहे. यापूर्वी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलने ९१.३४ रुपयांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला होता.  


दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८४.४५ रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर ७४.६३ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोल दर ८७.१८ रुपये असून, डिझेल ७९.९५ रुपये आहे. कोलकात्यात प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८५.९२ रुपये असून, डिझेल ७८.२२ रुपये आहे. बेंगळुरूमध्ये एक लीटर पेट्रोलचा दर ८७.३४ रुपये असून, डिझेलचा भाव ७८.९८ रुपये आहे.


दरम्यान, देशात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठवड्यात कंपन्यांनी दोन दिवस इंधन दरवाढ केली होती. त्यानंतर सलग पाच दिवस इंधन दर स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचा भाव ०.२९ डॉलरने वधारला आणि ५३.५० डॉलर झाला. गेल्या १० महिन्यात पेट्रोल  १४ रुपये, तर डिझेल १२ रुपयांनी महागले आहे. धीम्या गतीने होत असलेली इंधन दरवाढ ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे, असे सांगितले जात आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
१ टक्का व्यक्तींकडे देशाची ७३ टक्के संपत्ती
टाइम्स नाऊ व रिपब्लिक वृत्तवाहिन्यांना उच्च न्यायालयान
बळाचा वापर केल्यास २६ जानेवारीला त्सुनामी येईल
अर्णव गोस्वामींच्या विरोधात भाजपचे ‘तांडव’ कधी?
शेतकरी आंदोलनाचा धसका
‘जय श्रीराम’चे नारे देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड
मराठा आरक्षणाबाबत गोंधळात गोंधळ
आतापर्यंत १०० हून अधिक शेतकर्‍यांच्या सरकारकडून हत्या
बंजारा समाजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणार्‍या लेखक भालचं
प्रबोधनकार ठाकरे भट-भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुना
थकबाकी न भरणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणार
मोदी व योगी यांच्याविरोधात पोस्ट, कायद्याच्या विद्यार्
इतके दिवस शेतकर्‍यांचे आंदोलन समाजासाठी चांगले नाही
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आंदोलनाचा मुद
वारंवार सुनावणी पुढे ढकलत मराठा आरक्षणाला ठेंगा
२ परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे १० चिमुरड्यांचा बळी
इम्पाचा मराठवाडा विभागस्तरीय २४ जानेवारीला कार्यक्रम
कोव्हॅक्सीन लसीविषयी धास्ती
प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper