×

बांगलादेशने दहा वर्षात ८० लाख लोकांना गरीबीतून वर काढले

Published On :    15 Jan 2021  By : MN Staff
शेयर करा:


भारतात मात्र गरीबीचा आलेख उंचच, श्रीमंतांचे मात्र इमल्यावर इमले





नवी दिल्ली: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसारित केलेल्या व्हिडिओवरून बांगलादेश जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे दिसून आले. त्यात म्हटले आहे की बांगलादेशची अर्थव्यवस्था भारतापेक्षा वेगाने वाढत आहे. २०१० पासून ८० लाख लोकांना बांगलादेशने गरीबीतून वर काढले आहेत आणि दरडोई उत्पन्न अवघ्या दहा वर्षात तिप्पट झाले आहे. एकीकडे भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशाची अर्थव्यवस्था सुदृढ होत असताना भारतात मात्र दिवसेंदिवस गरीबीचा आलेख उंचच वाढताना दिसत आहे. एवढेच नाही तर श्रीमंतांचे मात्र इमल्यावर इमले चढताना दिसत आहेत.



याबाबत सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत बांगलादेशाची झेप ही प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. आपल्या देशानेही यापासून धडा घेण्याची गरज आहे. आता आपले बजेट बनविण्याची वेळ आली आहे, म्हणून आपण अशी धोरणे आखण्याची गरज आहे की आपण असे निर्णय घेऊ शकू. आपण शेजारी देशांपासून मागे राहता कामा नये.


या व्हिडिओत बांगलादेशची अर्थव्यवस्था इतक्या वेगाने कशी वाढत आहे? याचे उत्तर देण्यात आले आहे. त्यामध्ये चार कारणे देण्यात आली आहेत. चीननंतर बांगलादेशात जगातील दुसर्‍या क्रमांकाचा कापड उद्योग आहे. त्याची निर्यात दर वर्षी १६ टक्के दराने वाढत आहे. दुसरे म्हणजे, त्याच्याकडे प्रचंड तरूणांची संख्या आहे. बांगलादेश हा जगातील आठवा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे तर देशातील एकूण लोकसंख्येपैकी निम्मे लोक २५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तसेच, तरूण कर्मचारी लवकर नवीन तंत्रज्ञान शिकतात.


तिसरे म्हणजे त्याची डिजिटल शक्ती. बांगलादेशात सहा लाख आयटी फ्रीलांसर आहेत, जे जगातील सर्वाधिक आहेत. हे डिजटिल तंत्रज्ञान बांगलादेशला नवीन अर्थव्यवस्था वाढण्यास मदत करत आहे. देशात अधिकाधिक लोक ऑनलाइन बँक खाती स्वीकारत आहेत. चौथे म्हणजे ज्ञान घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. शेती आणि उत्पादनाच्या पलीकडे बांगलादेश वैविध्यपूर्ण आहे. देशाची राजधानी ढाका येथे आपले तांत्रिक केंद्र बनविले आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी १०० विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) विकसित केले जात आहेत. यावर्षी आर्थिक वाढ आठ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. वाढत्या समुद्राच्या पातळीमुळे विस्थापित होण्याचा धोका असणार्‍या लोकसंख्येच्या एक तृतीयांश असूनही बांगलादेशच्या आर्थिक यशापासून बरेच काही शिकले जाऊ शकते.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आता संसदेला घेरणार, ४० लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणणार
आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारताना चीनच भारताचा सर्वांत मो
शेतीशी काडीमात्र संंबंध नसलेले आरएसएसचे ब्राम्हण कृषी
सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीच्या फंडात तब्बल पाच पटीन
पतंजलीच्या ‘कोरोनील’ विक्रीस परवानगी नाही
रस्त्यावरील अपघातांनी भारतात ७५ टक्के गरीब परिवार आणखी
सिलिंडरच्या भाववाढीने गरीबांचे जगणे बनले कठीण, स्वयंपा
राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा
मराठा आरक्षणाची राज्याची भूमिका केंद्राला कळवणार
नालासोपार्‍यातील एका ग्राहकाला दोन महिन्याचे वीजबिल ८०
पतंजली पुन्हा वादाच्या भोवर्‍यात
सरकारने न ऐकल्यास ७ मार्चला साष्टपिंपळगावात लाखो मराठ्
भारतात केंद्रातील भाजपा सरकारने ‘लोकशाही’ संपवली
दिशा रविला तातडीने सोडावे, पर्यावरण कार्यकर्त्यांचा छळ
चौफेर टीकेनंतर ‘राष्ट्रीय गो-विज्ञान परीक्षा’ स्थगित
नागरिकांना कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार
महाविकास आघाडी सरकारला संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचे वा
आंदोलन तीव्र करण्याची शेतकर्‍यांची रणनीती
इंधन दरवाढीचा मुद्दा धर्मसंकट
लॉच्या परीक्षेचा गोंधळ, हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper