×

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी

Published On :    20 Jan 2021  By : MN Staff
शेयर करा:


सुनावणीकडे सार्‍या राज्याचे लक्ष





नवी दिल्ली:  राज्याच्या राजकारणात ज्वलंत बनत चाललेल्या मराठा आरक्षण प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. मागील सुनावणी वेळी न्यायालयानं मराठा आरक्षणावरील स्थगित हटवण्यास नकार देत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, या प्रकरणावर पाच दिवस आधी म्हणजेच आजपासून (२० जानेवारी) सुनावणी होणार आहे.


सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारनं हे प्रकरण पाच सदस्यीय घटनांपीठाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. मात्र, ९ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला होता. 


तसेच २५ जानेवारीपासून मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असं सांगितलं होतं. मात्र, आजपासूनच या प्रकरणावर सुनावणी सुरू होत आहे. न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. अब्दुल नजीर, न्या.हेमंत गुप्ता, न्या. रवींद्र भट यांचा समावेश असलेल्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. राज्याच्या अनुषंगानं आणि महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीनं हा मुद्दा महत्त्वाचा बनलेला असल्यानं सगळ्याचं या सुनावणीकडं लक्ष असणार आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीमागे सात वर्षात १३७ टक्क्यांच्या करवाढीचा ब
विधानसभा निवडणुकांसाठी कोरोना आड येत नाही का?
मराठी शाळांचे कोट्यवधी रुपये सरकारच्या ताब्यात
आता शिव संवादातून होणार आक्रोश मेळावा
रेल्वे भाडे न सांगता तीन पटीने वाढवले
छत्तीसगडमध्ये दहा महिन्यांत १४१ शेतकर्‍यांच्या आत्महत
जातनिहाय जनगणनेवर न्यायालयाची केंद्राला नोटीस
शेतकरी आणि कृषी बिलाशी आपला काय संबंध ही धारणा सोडा..!
शोषणकारी व्यवस्थेला म्हणावे लागेल पुन्हा चलेजाव
‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ या पुस्तकाच
केंद्राने राज्याचे २९ हजार कोटी जीएसटीचे थकवले
राज्याचा ८ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
आर्य भारताचे मूलनिवासी नाहीत, ते स्थलांतरित
भारतातील तब्बल ३७.५ कोटी बालकांच्या आरोग्य आणि शिक्षणाच
भारत उपासमारीच्या खाईत असताना अब्जाधीशांच्या श्रीमंती
जास्त वेळ काम करूनही भारतीयांना मिळते तुटपुंजी मजुरी
...तर भाजपाला मोजावी लागेल मोठी किंमत
इंधन दरवाढीचा फटका पालेभाज्यांवर
केंद्रातील भाजपा सरकारने देश काढला विक्रीला
गेल्या वर्षी भारतावर झाले सर्वाधिक सायबर हल्ले
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper