×

पतंजली पुन्हा वादाच्या भोवर्‍यात

Published On :    23 Feb 2021  By : MN Staff
शेयर करा:


WHO च्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप, कारवाईची मागणी





नवी दिल्ली: बाबा रामदेवची पतंजली पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली असून  WHO च्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे बाबा रामदेववर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.


जागतिक आरोग्य संघटनेची ही माहिती पतंजलीने औषध लॉन्च केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी आली आहे. यात असे दिसून आलंय की WHO च्या सर्टिफिकेशन स्कीमअंतर्गत आयुष मंत्रालयाचे सर्टिफिकेट मिळाले आहे. कोरोना व्हायरसशी लढणारं औषध शोधण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरू असतानाच बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ ने कोविड-१९ आजारावर ‘कोरोनिल’ या आयुर्वेदिक औषधाची घोषणा केली होती. अश्‍वगंधा, गुळवेल, श्‍वासारी, तुळशी अशा वनौषधींपासून तयार करण्यात आलेले औषध कोरोनारुग्णांना ठणठणीत बरं करू शकतं, त्याची यशस्वी चाचणीही आपण घेतलीय, असा बाबा रामदेव यांचा दावा होता.


लॉंचिंगपासूनच ‘कोरोनिल’ वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा पतंजलीचं टेन्शन वाढलं असून Twitter वर बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. WHO   च्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे.


जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या उपचारांसाठी कोणत्याही पारंपारिक उपचारांना परवानगी दिलेली नाही तसंच अशा उपचारांचा दावा करत असलेल्या कोणत्याही संस्थेला सर्टिफिकेट्ही दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेची ही माहिती पतंजलीनं औषध लॉन्च केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी आली आहे. यात असं दिसून आलंय की  WHO  च्या सर्टिफिकेशन स्कीमअंतर्गत आयुष मंत्रालयाचे सर्टिफिकेट मिळाले आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या  WHO  दक्षिण पूर्व एशियाच्या रीजनल अधिकार्‍यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, कोरोनाच्या औषधाचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्टिफिकेशन करण्यात आलेलं नाही.


रामदेव बाबा यांनी अशी घोषणा केली होती की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोविडवर  उपचार होतील. आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली. यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.जागतिक आरोग्य संघटनेच्या या ट्विटच्या आधारे बाबा रामदेव यांनी फसवणूक केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. माजी आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.


सूर्य प्रताप सिंह यांनी बाबा रामदेव यांना  WHO  च्या नावे खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी दिल्ली पोलीस तुम्ही अटक करणार का? असा सवाल विचारला आहे. तसेच याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी असं देखील म्हटलं आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
केंद्राने राज्याचे २९ हजार कोटी जीएसटीचे थकवले
राज्याचा ८ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
आर्य भारताचे मूलनिवासी नाहीत, ते स्थलांतरित
भारतातील तब्बल ३७.५ कोटी बालकांच्या आरोग्य आणि शिक्षणाच
भारत उपासमारीच्या खाईत असताना अब्जाधीशांच्या श्रीमंती
जास्त वेळ काम करूनही भारतीयांना मिळते तुटपुंजी मजुरी
...तर भाजपाला मोजावी लागेल मोठी किंमत
इंधन दरवाढीचा फटका पालेभाज्यांवर
केंद्रातील भाजपा सरकारने देश काढला विक्रीला
गेल्या वर्षी भारतावर झाले सर्वाधिक सायबर हल्ले
तिसर्‍यांदा सिलेंडरचे दर वाढवून सर्वसामान्यांना जगू न
‘आत्मनिर्भर भारत’ची फोडणी देऊन या ‘चिनी कम’ धोरणाला राष
इंधनाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर
जमीन वाचवण्यासाठी ही लढाई
केंद्रातील आरएसएसच्या भाजपा सरकारने प्रत्येक समाजात नि
राज्यावर विक्रमी महसुली तुटीचे संकट
जितेंद्र आव्हाडांनी नाव न घेता प्रधानमंत्री नरेंद्र मो
आता संसदेला घेरणार, ४० लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणणार
आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारताना चीनच भारताचा सर्वांत मो
शेतीशी काडीमात्र संंबंध नसलेले आरएसएसचे ब्राम्हण कृषी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper